खडसे : राजकारण सुडाचे आपल्यातले संपविण्याचे…
-पत्रकार हेमंत जोशी
किस्सा तसा फार जुना आहे पण सांगण्यासारखा. पूर्वी मी 7 बंगल्याला राहात असतांना सकाळी ठीक आठ वाजता यासाठी आमच्या कंपाउंडमध्ये फिरत असे कारण त्याच दरम्यान एक देखणी तरुणी समोर स्कुटर पार्क करून मला मस्त स्माईल देऊन निघून जात असे किंवा शाळेत असतांना आमचे कोल्हटकर सर मधल्या सुट्टीत पटकन शेजारच्या बस स्टॅन्डवर मिसळ खायला निघाले कि मी पण अधून मधून त्यांच्या पाठी यासाठी जात असे त्यांच्या समोर यासाठी घुटमळत असे कारण त्यांनी मला बघितले रे बघितले कि माझा चेहरा बघून मला पण ते मिसळ खाऊ घालायचे. असे कितीतरी द्वाड पुरुषांचे असते कि त्यांची लाडकी उफाडी मोलकरीण निघून जाईपर्यंत ते तिच्या आसपास त्या दरम्यान सारी कामे बाजूला ठेवून कधी घुटमळतात तर कधी गाणी गुणगुणतात इत्यादी. माझे वडील त्यांच्या लाडक्या मोलकरणीमागे शीळ वाजवायचे संघाची गाणी मोठ्यांदा गुणगुणायचे, घरातल्यांनी कटाक्षाने हि एक चांगली सवय माझ्यात मुद्दाम रुजू दिली नाही. माझी आणखी एक चांगली सवय, जळगावला काहीतरी मुद्दाम निमित्त काढून जायचे आणि साक्षात स्वर्ग असलेल्या जैन हिल्स मध्ये किमान एक दोन रात्री राहून परतायचे. अभय जैन आणि अशोक जैन यांचे त्यासाठी मनापासून आभार आणि हो, तुम्हीही ओळख काढा मुद्दाम जळगावला जा आणि कसेही करून जैन हिल्स मध्ये काही क्षण घालवा, स्वर्ग सुख घेतल्याचा थेट अमेरिकेत असल्याचा फील आला नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका वाट्टेल त्या माणसाची उपमा द्या, अगदी प्रेम चोप्रा म्हणा अमरीश पुरी म्हणा हेलन म्हणा आशिष मोहदरकर म्हणा अगदी काहीही म्हणा पण जैन हिल्सचा अनुभव एकदा तरी नक्की घ्या….
अलीकडे जळगावला अगदी थोड्या क्षणांसाठी गेलो आणि मुक्ताईनगर चे शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील ( हे चंद्रकांत पाटील वेगळे ते भाजपावाले वेगळे अगदी त्या दोन सोनाली कुलकर्णी सारखे एक खूप सेक्सी एक अजिबात नाही असेही नाही म्हणजे भाजपावाल्या चंद्रकांत पाटलांच्या तोंडात एखादीने जबरदस्तीने साखर कोंबली म्हणून त्यांना ती कडू तर नक्की लागणार नाही आणि या अपक्ष चंद्रकांत पाटलांना साखरेचे पोते देखील म्हणे प्रसंगी कमी पडेल असे मी नाही एकनाथ खडसे अगदी जाहीर तेही डोळा मारून चारचौघात सांगतात ) आणि रोहिणी व एकनाथ खडसे या बाप लेकीचा वाद कानावर पडला. जळगावातच मी असल्याने नेमके काय घडले कोणाचे चुकले कोणाचे चुकते तेही पुराव्यांसहित कानावर आले पडले. एक मात्र नक्की जळगाव जिल्ह्यात महाआघाडीच्या नेत्यांमध्ये आपापसात मोठे वाद आहेत सतत काहीतरी वाईट घडते आहे एकमेकांना तुरुंगात धाडण्यात त्यांना असुरी आनंद मिळत असल्याने म्हणजे महाआघाडीच्या नेत्यांचे जळगाव जिल्ह्यात सुडाचे राजकारण पेटलेले असल्याने जर या वादाचा, भांडणाचा नेमका मोठा फायदा चतुर धूर्त उत्साही गिरीश महाजन यांना उचलता आला नाही तर जाणकार त्यांना अगदी थेट मूर्ख नेता म्हणून उपमा देऊन मोकळे होतील. गिरीश महाजन यांनाच आवडणारे उदाहरण देतो म्हणजे ज्या तरुणीवर तुमचा डोळा नेमका तिचा नवरा मेल्यानंतर जर तुम्ही तिच्यासमोर राखी बांधण्यासाठी हात पुढे करणार असाल तर हे असे महाजन यांच्याकडून या दिवसात अजिबात घडायला नको. सुरेशदादा जैन ते गुलाबराव देवकर असे कितीतरी नेते ज्यांना एकनाथ खडसे यांनी थेट तुरुंगात धाडून त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य खडसे यांनी पार उध्वस्त केले आहे अर्थात तुरुंगात धाडण्यावर आता त्यांचा डोळा गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर असल्याने या सार्या दिग्गज ताकदवान नेत्यांना पुरून उरणाऱ्या एकनाथ खडसे या वयस्क वृद्ध आजारी नेत्याचे करावे तेवढे कौतुक कमी….
नाही म्हणायला जरी थेट भाजपाचे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना जरी रायसोनी पतपेढी प्रकरणी खडसे यांनी अद्याप तुरुंगात धाडले नसले तरी सुनील झंवर यांच्यासारखे महाजन यांचे कितीतरी उजवे डावे हात त्यांनी तुरुंगात धाडून महाजन यांच्या नाकात नक्की दम आणलेला आहे. दिवंगत पुत्र निखिल खडसे यांना विधान परिषदेला पराभूत करणाऱ्या मनीष जैन आणि त्यांच्या कुटुंबाला किंवा मनीष यांना साथ देणार्या सुरेशदादा जैन या दोन्ही प्रचंड श्रीमंत असलेल्या व्यापारी कम नेत्यांना देशोधडीला लावणाऱ्या एकनाथ खडसे यांचे यावेळी उद्दिष्ट आहे त्यांच्या रोहिणीला विधान सभेला पराभूत करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील या शिवसेनेच्या बलाढ्य मराठा नेत्याला आणि हे घडवून आण्यासाठी किंवा जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील गुलाबराव देवकर चंद्रकांत पाटील सतीश पाटील इत्यादी बहुसंख्य मराठा नेत्यांना राजकारणातून उध्वस्त करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट महाआघाडी दावणीला बांधलेले आहे, शरद पवार यांनी म्हणे एकनाथ खडसे यांचे हे घातकी राजकारण बघून कपाळावर हात मारून घेतला आहे कारण सुडाने पेटलेल्या एकनाथ खडसे यांनी कट्टर शत्रू भाजपाकडे दुर्लक्ष करून आपल्याच महाआघाडीला जणू जळगाव जिल्ह्यातून संपविण्याचा विडा उचलला आहे, रवींद्र भैया पाटलांसारखे काहीसे बावळट मराठा नेते चंद्रकांत पाटील यांना किंवा मराठा नेत्यांना किंवा जिल्ह्यात महाघाडीला संपविणार्या संपवायला निघालेल्या एकनाथ खडसे यांना अद्याप कडेवर घेऊन मिरवून आणण्यात का स्वतःला धन्य समजताहेत हे जळगाव जिल्ह्यातील चाणाक्ष लोकांना पडलेले एक गहन असे कोडे आहे…
अपूर्ण : हेमंत जोशी