सावधान : हिंदुत्व खतरेमे आहे…
-पत्रकार हेमंत जोशी
आघाडी किंवा युती म्हणजे विविध भिन्न आचार विचाराच्या मंडळींनी एकत्र येऊन स्थापलेले सरकार हे तुम्हाला सांगणे म्हणजे धोतरावर शर्ट इन करता येत नाही किंवा प्रत्यक्षात पॅन्ट आधी वरून अंडरवेअर घालता येत नाही हे तुम्हाला सांगण्यासारखे. आघाडी किंवा युती सरकार स्थापन करणे म्हणजे दोन घटस्फोटितांनी आपापल्या मुलांना एकत्र आणून पुनर्विवाह करण्यासारखे त्यात पुढे त्यांनाही मूल किंवा मुले झाली कि ते सारे ज्या पद्धतीने एकत्र येऊन एका छताखाली संसार करतात सेम ती पद्धत म्हणजे आघाडी किंवा युती सरकार. तीन भिन्न विचारांची मुले एका छताखाली येऊन अनेकदा जो आचार विचारांचा गोंधळ घालतात ती पद्धत म्हणजे युती किंवा आघाडी आणि येथे या राज्यात तर सध्या वास्तवात माझी मुले तुझी मुले आपली मुले पद्धतीची आघाडी सत्तेत अस्तित्वात असल्याने स्वाभाविक आहे कुठलेतरी दोघे एकत्र येऊन तिसऱ्याचा सत्यानाश करून मोकळे होतील, नेमके तेच घडते आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून एक कडवे हिंदुत्व काहीसे अपंग झालेले हिंदुत्व खड्ड्यात घालताहेत, येथे मी अर्थात उद्धवजी आणि त्यांच्या शिवसेनेबद्दल हे सांगतो आहे. एक व्हिडीओ मी अगदी अलीकडे सोशल मीडियावर बघितला त्यात या महाआघाडीमुळेच चार हिंदू किंवा चार मराठी त्या लोकल मध्ये अगदी गांडू होऊन उभे आहेत आणि एक मुसलमान अख्खी सीट अडवून तेही लोकल मध्ये सर्वांदेखत नमाज पढतो आहे. शिवसेना आणि भाजपा युती असती तर हे घडले नसते किंवा मुसलमानांची येथवर मजलही गेली नसती पण आता हे असे सर्हास घडते आहे यापुढे देखील घडणार आहे आणि तीन अतिशय भिन्न विचारांच्या पक्षांची आघाडी झाली कि हे असे घडणार आहेच, भीती वाटते ती धर्मांधांना प्राधान्य देणारे काँग्रेस व राष्ट्रवादी यापुढे बलवान होण्याची आणि मोठे राजकीय नुकसान अर्थात होणार आहे हिंदुत्व मानणार्या शिवसेना आणि भाजपाचे…
एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून हे राज्य चालविले तर कोणीही हे सरकार पाडू शकणार नाही हा शरद पवार यांनी महाआघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना दिलेला सांगितलेला महामंत्र त्यामुळे समोर वैयक्तिक मोठे नुकसान किंवा पक्षाची हानी होताना दिसत असली तरी मूग गिळून बसायचे हे उद्धवजींनी ठरविले असल्याने त्याचा नेमका गैरफायदा पुढच्या निवडणुकीत मुसलमानांची मते पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणावर घेते आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे ढासळलेली प्रकृती आणि असलेले कोरोना संकट, हरकत नाही महाआघाडी सरकार पुढे रेटायला पण सेनेतर्फे निदान मुख्यमंत्री अत्यंत कठोर व कणखर हवा पण तेही उद्धवजी करायला तयार नाहीत त्यामुळे अपंग झालेले हिंदुत्व असे चित्र सध्या राज्यात निर्माण झालेले आहे आणि यापुढे कोरोना व प्रकृतिस्वास्थ्यावर मात करून उद्धवजी मोठ्या उत्साहाने कामाला लागले असे चित्र निर्माण होणे नक्की अशक्य आहे. ज्याचा गैरफायदा अनेक जात्यंध शक्ती या राज्यात मोठ्या प्रमाणात घेताहेत जे घडायला नको होते. वक्फ बोर्डाचे लाड महाआघाडी सरकार करत असतांना शिवसेना शाखा दुबळ्या केल्या जाताहेत म्हणजे युवा सेना आणि सिनियर शिवसेना नेते यातील सुप्त संघर्ष नकळत मराठी हिंदुत्व दुबळे झाले आहे काहीसे घाबरले देखील आहे. मुंबईत तेही शिवसेना अजान स्पर्धा घेते म्हणजे काय किंवा शिवसेनेने काढलेले हिरवे उर्दू कॅलेंडर सारेच अनाकलनीय वरून टिपू सुलतानाच्या वाढदिवसाला जनाब उद्धव ठाकरे यांचा फोटो, ज्या बाळासाहेबांनी कधी हिरव्या रंगाच्या रुमालाने देखील नाक पुसले नाही त्या हिर्व्यांचे या महाआघाडी सरकारात एवढे लाड, चला माझ्या संगतीने मुंबई शहरात फेरफटका मारायला, दाखवता तुम्हाला पुराव्यांसहित कि कसे जात्यंध हिरव्यांनी या हिंदुत्वाला चहू बाजूंनी घेरले आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणजे अडीच वर्षे आटोपली म्हणून राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद अजिबात न देता याउलट उद्धव यांनी स्वतः अतिशय कठोर तेही हिंदूधार्जिणे निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे किंवा एखादा कठोर नेता पुढला मुख्यमंत्री असणे अत्यंत गरजेचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी