रामदासी कदम पडले चुकीचे!
-पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे भर पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी जी काय प्रत्यक्ष शिवीगाळ आगपाखड बडबड गडबड सर्व श्री अनिल परब सूर्यकांत दळवी संजय कदम उदय सामंत इत्यादींवर थेट आकांडतांडव शिवीगाळ पद्धतीने गरळ ओकली संताप व्यक्त केला ओकारी काढली अपशब्द वापरून आय बहीण घेतली प्रत्यक्षात रामदास कदम यांची हि पत्रकार परिषद या नेत्यांना टार्गेट करणारी नव्हती वास्तवात त्यांनी तेही अगदी उघड आपला राग उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्त केला हे राजकीय पत्रकारितेतील अगदी शेम्बडा मुलगा म्हणजे आमचा उदय तानपाठक देखील सांगून मोकळा होईल. रामदास कदम यांची पार पडलेली पत्रकार परिषद फक्त आणि फक्त थेट उद्धव ठाकरे यांच्याच विरुद्ध होती लेकी बोले सुने लागे पद्धतीची होती आणि रामदास कदम या दिवसात हे असे काहीतरी करतील शिमगा नसतांना भर हिवाळ्यात तो साजरा करतील हे आम्हा जाणकारांना माहित होते किंबहुना आगपाखड करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही कुठलाही मार्ग उरला नव्हता आणि हा शाब्दिक हल्ला अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याने केवळ उद्धव यांच्याच सांगण्यावरून अगदी सामान्य शिवसैनिकाने देखील या शाब्दिक हल्ल्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने कदम यांच्या पत्रकार परिषदेची म्हणाल तर माती झाली म्हणाल तर त्यांच्या बोलण्याला सेनेत अजिबात महत्व दिल्या गेले नाही त्यामुळे रामदास कदम रिस्पॉन्स न मिळाल्याने पूर्वीपेक्षा अधिक आता अस्वस्थ झालेले असतील ते उद्धव यांना जखमी करायला निघाले खरे पण या त्यांच्या स्वतःच्या पत्रकार परिषदेतून ते स्वतःच रक्तबंबाळ झाले हि वस्तुस्थिती आहे. रामदास कदम यांच्याकडून हे असे उघड बोलणे किंवा थेट पत्रकार परिषद घेणे उद्धव ठाकरे आणि अन्य सेना नेत्यांना अपेक्षित असल्याने त्यांनी कदमांच्या बोलण्या शिव्या देण्या कडे दुर्लक्ष करण्याचे आधीच ठरविले होते आणि या दुर्लक्ष करण्यामुळे कदम होते त्यापेक्षा कितीतरी पटीने नेतृत्वात झपाट्याने खाली आले त्यात चूक त्यांची स्वतःची आहे…
रामदास कदम किंवा सेनेतल्या काही मंत्र्यांचा पाय खोलाकडे हे माझ्या आधीच लक्षात आलेले होते कारण संघटनेकडे लक्ष कमी पण वैयक्तिक फायद्याकडे अधिक लक्ष हे युती सरकार सत्तेत असतांना ज्या मंत्र्यांच्या बाबतीत घडत होते चतुर चाणाक्ष कठोर उद्धव ठाकरे फडणवीस सरकारचा कालावधी पूर्ण होताच किंवा पूर्ण होतांना अशा मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना पुढल्या पंचवार्षिक योजनेत थेट घरचा रस्ता दाखवतील हे भाकीत मी त्याचवेळी केले होते जे नंतर जसेच्या तसे घडले आणि त्यातलेच एक पर्यावरण खात्यात मंत्री म्हणून गोंधळ घालणारे रामदास कदम होते अन्य काही मंत्र्यांना तसेच राज्यमंत्र्यांना देखील कठोर उद्धव ठाकरे यांनी घरचा रस्ता दाखविला पण त्या साऱ्यांचा रामदास कदम न झाल्याने पुढल्या काही दिवसात महिन्यात अशा शांत भूमिका घेणाऱ्यांचे उद्धव शंभर टक्के राजकीय पुनर्वसन करून मोकळे होतील किंबहुना याच उद्धव ठाकरे यांनी तेही थेट दसरा मेळाव्यात मोठ्या आदराने दिवाकर रावते यांचे नाव घेऊन तसा त्यांचा थेट भाषणातून उल्लेख करून तसे संकेत दिलेच आहेत. रामदास कदम यांनी देखील शांत भूमिका घेत आपण नेमके कुठे चुकलो कशाचा सतत आजतागायत अतिरेक केला त्यावर विचार मंथन करून पुन्हा अशा चुका न करण्याचे मनापासून ठरवायला हवे होते पण कायम श्रीमंतीच्या मोहाला बळी पडणारे रामदास कदम उद्धवजींना अंडर एस्टीमेट करते झाले अप्रत्यक्ष त्यांनी तेही थेट पत्रकार परिषदेत उद्धव यांच्यावर तोफ डागली आणि स्वतःचे व पोटच्या दोन्ही मुलांचे फार मोठे राजकीय नुकसान करवून घेतले आहे. वास्तविक सिद्धेश व योगेश यांनी वडिलांच्या राजकीय भूमिकेशी किंवा आगपाखड करण्याच्या भूमिकेवर आम्ही अलिप्त आहोत असे निदान जाहीर जरी सांगितले असते तरी उद्धव यांनी त्या दोघांचे किमान राजकीय नुकसान केले नसते यापुढे मात्र सिद्धेश यांना आदित्य ठाकरे यांच्या गोतावळ्यात स्थान नसेल बाहेर बाजूला त्यांना काढलेले असेल आणि पुढला आमदार योगेश यांच्या ऐवजी कोण याची चाचपणी उद्धव यांनी केव्हाच सुरु केली असेल कदाचित उमेदवारी सूर्यकांत दळवी यांना देण्याचे त्यांनी ठरविले असेल….
ज्या अनिल परब आणि अन्य अनेक सेना नेत्यांवर रामदास कदम यांनी तेही थेट पत्रकार परिषद घेऊन अगदी खालच्या शब्दात आगपाखड केली त्यातला एकही नेता स्वतःच्या मनाने रामदास कदम यांचा राजकीय बदला घेणारा नव्हता आणि ज्या अनिल परब यांचा थेट बाप रामदास कदम यांनी काढला अप्रत्यक्ष त्यांनी उद्धव यांचा बाप काढला असल्याने यापुढे रामदास कदम यांचा किमान शिवसेनेत कायमस्वरूपी नारायण राणे झाला आहे म्हणजे कदाचित गणेश नाईक किंवा छगन भुजबळ यांच्यासारख्या सेना सोडून गेलेल्या अनेकांना उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेत घेतील पण जे नारायण राणे यांचे झाले तेच रामदास कदम यांचेही होणार आहे जरी उद्धव यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नसली तरी कदम यांना शंभर टक्के आपणहून शिवसेना सोडावी लागणार आहे यापुढे रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांना शिवसेनेत पूर्वीचे मानाचे स्थान मिळणे मिळविणे अवघड आणि अशक्य असे काम आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे युतीच्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कदम यांच्या कार्यपद्धतीवर एवढे नाराज होते की महाआघाडी सरकारात पर्यावरण खात्याला पुन्हा बरे दिवस आणण्यासाठी उद्धव यांनी थेट आदित्य यांनाच त्या खात्याचे मंत्री केले अर्थात आदित्य यांनी त्या खात्याचे नेमके काय केले हा विषय येथे महत्वाचा नाही त्यावर पुन्हा कधीतरी लिहिता येईल. आगपाखड नारायण राणे देखील करायचे पण ते सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना जसे इतर सर्व राजकीय पक्षांचे दरवाजे सताड उघडे होते ती परिस्थिती रामदास कदम यांना मात्र नक्की अनुकूल नाही म्हणजे भाजपाला व राणे यांना ते आपल्याकडे नको आहेत आणि राष्ट्रवादी व काँग्रेस तर कदम कुटुंबियांना कोसो दूर ठेवून आहे. यापुढे कदमांचे काही खरे नाही….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी