बावनकुळे का कमी पडले, कसे घडले ?
-पत्रकार हेमंत जोशी
चंद्रशेखर बावनकुळे जिंकून हरले चंद्रशेखर जिंकले पण माझ्या नजरेतून पराभूत झाले म्हणजे बावनकुळे विधान परिषद जिंकले तरीही ते माझ्या दृष्टीने यासाठी पराभूत वाटले झाले कारण त्यांनी मला जे सांगितले होते ते घडले नाही आणि मलाही जे नेमके त्यांच्याबाबतीत वाटले होते तसे घडले नाही म्हणजे बावनकुळे यांना त्यांनी जे मला सांगितले होते कि त्यांना निवडणुकीत किमान 400 मते पडतील ते तसे घडले नाही त्यांना 28 ते 30 मते पडली म्हणून मी येथे अगदी गमतीने म्हणालो कि बावनकुळे जिंकून देखील पराभूत झाले. आदल्या दिवशी देशमुख यांना केवळ संशयावरून नागपुरातल्या गोंधळलेल्या काँग्रेसने उमेदवारी दिली, आपला उमेदवार बदलला आणि अपक्ष देशमुखांना महाआघाडीने पाठिंबा जाहीर केला, ऐनवेळी हा पाठिंबा मिळून देखील त्यामानाने अगदीच लिंबूंतिंबू देशमुख यांनी प्रचंड तगड्या उमेदवारांसमोर त्यामानाने बऱ्यापैकी फाईट दिली आणि निदान काही काळ काही क्षण बावनकुळे यांना जरासे गोंधळात देशमुख यांनी टाकले. नागपुरातली आणि अकोला बुलढाणा विभागातली विधान परिषद निवडणूक हि केवळ बाजोरिया विरुद्ध वसंत खंडेलवाल किंवा बावनकुळे विरुद्ध देशमुख अशी नव्हती तर दोन्हीकडच्या विधान परिषद निवडणुका या गडकरी फडणवीस खंडेलवाल विरुद्ध बाजोरिया आणि बावनकुळे गडकरी फडणवीस विरुद्ध देशमुख पद्धतीने लढल्या गेल्या विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अचूक नियोजन आणि जाहीर केलेल्या बिनचूक उमेदवार्या केवळ त्यातूनच महाराष्ट्रात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाघाडीचा पचका आणि विचका झाला आणि भाजपाला सहा पैकी तब्बल चार जागा पदरात पाडून घेतल्या आल्या….
चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल हे दोघेही विदर्भांतले भाजपाचे अत्यंत तगडे उमेदवार, त्या दोघांना उमेदवारी देऊन फडणवीस व गडकरी दोघांनीही एकाच दगडात पुढल्या अनेक लढाया आजच जिंकलेल्या आहेत विशेष म्हणजे मी याच ठिकाणी कित्येक दिवस आधीच लिहून ठेवलेले आहे होते कि बावनकुळे विधान परिषद जिंकून मोकळे होतील ते नक्की आमदार होतील नेमके ते जसेच्या तसे घडल्याचे तुमच्या लक्षात आले आहेच. छगन भुजबळ आधी बदनाम झाले नेमके तुरुंगात देखील जाऊन आले त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राज्यतल्या ओबीसी मंडळींना नेमका त्यांच्याकडे तयाचें प्रश्न घेऊन लढणारा नेता नव्हता पण एक बरे झाले कि मागल्या विधान सभेला चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर विशेषतः विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र देखील पिंजून काढता आला आणि पक्षाचा प्रचार व प्रसार करतांना राज्यातल्या ओबीसी जनतेच्या लक्षात आले कि त्यांना त्यांच्या मनातला त्यांच्या नेत्याची भुजबळ यांच्या ऐवजी जागा घेणारा नेता सापडला आहे आणि तो नेता अर्थात चंद्रशेखर बावनकुळे हे होते विशेष म्हणजे बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून आपण मोठी चूक केली हे भाजपा श्रेष्ठींच्या देखील लक्षात आल्याने त्यांनी यावेळी ती कसर भरून काढली मोठ्या मनाने त्यांनी ओबीसी चे नव तडफदार नेतृत्व म्हणून बावनकुळे यांना पुढे केली आणि बावनकुळे यांनी ते लोकमान्य व लोकप्रिय कसे या विधाननपरिषद निवडणुकीत राज्याला दाखवून दिले ते निवडून आले विशेष म्हणजे तयाच्या रूपाने भाजपा आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचा नवनेता मिळाल्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला….
मतदारांना आणि जनतेला अगदी सहज उल्लू बनविता येते प्रसंगी नोटा फेकून अगदी सहज विकत घेता येते कदाचित गोपीकिशन बाजोरिया यांना झालेला हा गर्व त्यांचे घर खाली झाले आणि लोकांनी विशेषतः मतदारांनी प्रसंगी त्यांचे खिसे देखील खाली केले पण मतदान त्या वसंत खंडेलवाल यांना केले अत्यंत महत्वाचे म्हणजे अकोला भागातले नामवंत प्रकाश आंबेडकर हे खंडेलवाल व भाजपच्या मदतीला धावल्याने बाजोरिया तोंडावर पडले ते आमचे मित्र असल्याने मी ते ढुंगणावर आपटले असे अभद्र म्हणणार नाही पण खंडेलवाल यांच्या विजयाचा मार्ग पुष्कळसा त्या प्रकाश आंबेडकर यांनी सुकर करून दिला बघता बघता अतिशय कठीण अशी विधान परिषद निवडणूक भाजपाला खूप सोपी गेली वसंत खंडेलवाल निवडून आले एकाचवेळी शिवसेना आणि बाजोरिया दोघेही मोठया बॅक फूटवर गेले त्यांचे फार नुकसान झाले आणि गडकरी देवेंद्र जोडगळीने ते कसे नेतृत्वात वरचढ हे एकाचवेळी सार्या विरोधकांना दाखवून दिले. मी तुम्हा सर्वांना पुरून उरणारा नेता आहे हे विशेषतः फडणवीस यांनी या विधान परिषद निवडणुकी निमित्ते राज्यातल्या इतर सार्या प्रभावी नेत्यांना दाखवून दिले. येथे मला विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्वाची आठवण अशी करून द्यायची आहे कि ते जेव्हा ऊर्जा खात्याचे मंत्री होते तेव्हा ते जसे काम घेऊन आलेला कोण हे मान वर न करता तयाचे तेथल्या तेथे काम करून मोकळे व्हायचे यापूढे देखील ते केवळ भाजपाचे नागपुरातले नेते नसून संपूर्ण ओबीसी समाजाचे अग्रगण्य नेते आहे त्यांनी हे कायम लक्षात ठेवावे आणि नेहमीसारखी खालची मान वर न करता त्यांनी कायम साऱ्यांना सतत सहकार्य करून मोकळे व्हावे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी