सहज सुचले म्हणून…
-पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे मी कर्जतला फरझाद नावाच्या मित्राच्या फार्मवर सहजच गेलो होतो, माझ्या मर्सिडीज कडे बघताच तो म्हणाला, वर्ष उलटला का मर्सिडीज घेऊन? नाही, चार वर्षे उलटलीत घेऊन, मी म्हणालो. माझे निरीक्षण असे कि आपल्यापैकी फार कमी मराठी मंडळींना कार विषयी नेमके कळते आणि अशी फसगत ते स्वतःची नेहमी करून घेतात, त्यामुळे कार विकत घेतांना विशेषतः वापरलेली कार विकत घेतांना बहुतेकांची फसवणूक होत असते म्हणून शक्यतो किंवा कायम कधीही अत्यंत बेरकी आणि खोटे बोलण्यात तरबेज असणाऱ्या दलालांकडून कार विकत घेऊ नये वाटल्यास ओळखीतूनच एकमेकांना कार्स विकत द्याव्यात किंवा शक्यतो नव्या कार विकत घ्याव्यात. कार्स तीन सेगमेंट्स मध्ये येतात म्हणजे लोअर सेगमेंट थोडक्यात स्वस्तातल्या दहा लाखांपर्यंतच्या कार्स नंतर मिडल सेगमेंट्स म्हणजे दहा ते पंचवीस तीस लाख किंमत असणाऱ्या कार्स आणि हायर सेगमेंट्स म्हणजे तीस लाखांपासून तर थेट अगदी 12/13 कोटी रुपये किमतीच्या कार्स, माझा कार्स विकण्याचा घेण्याचा अनुभव दांडगा आहे कारण पहिली कार मी विकत घेतली तेव्हा केवळ 21 वर्षांचा होतो म्हणून मला कार्स खरेदी विक्रीच्या बाबतीत बऱ्यापैकी कळते. अलीकडे या वर्ष दोन वर्षात आपल्या राज्यात कार्स प्रचंड महागल्या आहेत म्हणजे जी मर्सिडीज अमेरिकेत समजा 50 लाखाला मिळत असेल तर तीच मर्सिडीज येथे आपल्या राज्यात तब्बल एक कोटी रुपयांना मिळते एवढा फरक या दोन देशांमध्ये आहे. कार एजंट अमुक एखादी कार समजा तुमच्याकडून पाच लाख रुपयांना विकत घेत असतील तर हे एजंट तीच कार पॉलिश करून सर्व्हिसिंग करून आपल्यातल्या भोळ्या ग्राहकांना दहा ते पंधरा लाख रुपयांना विकून मोकळे होतात एवढे ते बदमाश बेरकी हलकट असतात म्हणून कार विकत घेण्याची उगाच घाई करू नका हमखास फसवणूक होते विशेषतः जे लोवर सेगमेंट्स मधल्या कार्स विकत घेतात त्यांनी तर कधीही सेकंडहॅन्ड कार्स विकत घेऊ नये. तुम्हाला मी यापूर्वीच सांगितले आहे कि माझी पहिली कार सेकंड हॅन्ड होती विशेष म्हणजे त्या कारचे हॉर्न सोडून सगळे वाजायचे. एकमेकांच्या ओळखीतून कार विकत घेतल्यास विकणाऱ्याला देखील बरे पैसे मिळतात आणि विकत घेणाऱ्याला देखील कार स्वस्तात मिळते. विशेष म्हणजे मुंबई पुण्यातल्या कार्स बहुतेकवेळा ठोकलेल्या असतात, मी तर कायम गमतीने सांगतो देखील कि मुंबई पुण्यातल्या मुली आणि कार्स अत्यंत देखण्या पण दोन्ही अनटच मिळणे जवळपास शक्य नाही नसते. म्हणून आपल्याकडे आणण्यापूर्वी माहिती घ्या कि ती कितीवेळा नेमकी ठोकल्या गेली आहे, अर्थात हे मी कार बद्दल सांगतोय. लॉक डाऊन मुळे आपण कार विकत घेतांना या दिवसात नको तेवढे अधीर झालो आहोत पण कार जर नवीन विकत घेत असाल तरीही आधी तुम्हाला आवडणाऱ्या कार विषयी नेमकी माहिती जाणकारांकडून करवूंन घ्या तसेच नवी कार बुक करतांना हमखास खूप वेळ बार्गेनिंग करा, तुमचे त्यातून खूप पैसे नक्की वाचतील. कार घेतांना आणि लग्न करतांना नेमकी माहिती घेणे फार गरजेचे असते अन्यथा नंतर हमखास पश्चाताप करण्याची वेळ येते. एक अत्यंत महत्वाची माहिती येथे अशी कि आपल्यातले अगदी कर्ज काढून पोटाला चिमटा काढून उगाचच इम्प्रेस करण्यासाठी स्वस्तातल्या कार्स विकत घेतात आणि विकत घेतल्या घेतल्या सहकुटुंब एकतर गावाकडे जातात किंवा सहलीला जातात, राज्यात फारच कमी लोकांना मोटार गाडी नेमकी कशी चालवावी हे माहित असते त्यातून अनेक अपघात दर दिवशी रस्त्यांवर घडतात आणि अनेकदा अख्खे कुटुंब किंवा कुटुंबातले प्रमुख जीव गमावून बसतात कृपया कार्स विकत घेतांना आणि आयुष्यात नवरा किंवा नवरी शोधतांना अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका, त्यानंतर उरलेल्या आयुष्यात केवळ अश्रू ढाळण्याची वेळ अनेकांवर येते.
तूर्त एवढेच : हेमंत जोशी