बदल बदला कि बादल : भाग २
-पत्रकार हेमंत जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या मुशीतून जन्मलेला भारतीय जनता पक्ष हे दोघे एकमेव भारतीय असे कि ते एखादे उद्दिष्ट गाठताना मिशन सर करण्याचे ते खूप आधीपासून ठरवतात त्यादृष्टीने मग त्यांची प्रत्येक चाल असते, मला वाटते त्यांनी हि किमया ख्रिश्चन मिशनसरीज पासून त्यांनी आत्मसात केली असावी कारण अमुक एखाद्या भागात जेव्हा धर्मांतर घडवून आणायचे असते तेव्हा मिशनरीज देखील वर्षांनुवर्षे तपश्चर्येला बसल्यासारखे त्यांनी ठरवलेल्या भागात शिरकाव करून पद्धतशीर धर्मांतर घडवून आणतात, वाटल्यास या दिवसात आंध्रा प्रदेशातल्या कडव्या हिंदूंना विचारा कि त्यांचा मुखमंत्री कसा मोठ्या प्रमाणावर मिशनरीजच्या साहाय्याने आंध्रा प्रदेश ख्रिश्चनमय करू पाहतो आहे. संघ आणि भाजपा दोघांनी या राज्यात हेच ठरविलेले दिसते कि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करून राज्यातली शिवसेना कमकुवत करायची आणि ते करतांना जमेल तसे राज ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य घ्यायचे थोडक्यात भाजपाला एकवेळ राज यांना ताकद देताना हरकत नसावी पण त्यांना यापुढे सेनेचे सहकार्य घ्याचे नाही शिवसेनेला व उद्धव यांना जवळ करायचे नाही विशेष म्हणजे यात भाजपा संघाचे काही चुकते आहे चुकले आहे असे अजिबात वाटत नाही. या दिवसातल्या बदलाच्या घडामोडी म्हणून त्यांच्याकडून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याशिवाय सुरु आहेत आणि एक दिवस ते त्यात नक्कीच यश मिळवून मोकळे होतील, त्यानंतरचा कांही काळ शिवसेनेसाठी मोठा कठीण असेल यात शंका नाही. आधी चंद्रकांत पाटील त्यानंतर अगदी अलीकडे देवेंद्र फडणवीस सहपरिवार राज ठाकरे यांना भेटून बोलून आले त्यानंतर हेच फडणवीस दिल्लीत अमित शहा यांना शरद पवारांना घेऊन भेटले तिघांनीही भेटीत प्रदीर्घ चर्चा केली, यात शिवसेना किंवा उद्धवजी कोठेही नव्हते कोठेही नाहीत, तेच यापुढे दीर्घकाळ संघ आणि भाजपाला घडवून आणायचे त्या शिवसेनेला जवळ घ्यायचे नाही एवढे ते उद्धवजींवर अगदी मनापासून नाराज आहेत पण माझे कायम सांगणे असते कि शरद पवार यांच्या राजकीय संन्यासानंतर राज्यातल्या राष्ट्रवादीचे आधी छकले होतील नंतर सोयीनुसार राष्ट्रवादीचे नेते विविध वेगळ्या राजकीय पक्षात विलीन होतील मात्र या राज्यातली भाजपा आणि काँग्रेस जशी कधीही अस्ताला जाणार नाही जशी कधीही संपणार नाही तेच शिवसेनेच्या बाबतीत देखील घडेल म्हणजे या राज्यातली शिवसेना लयाला गेली पार संपली संपुष्टात आली, असे घडणे अशक्य आहे अशक्य वाटते…
लयाला गेलेल्या या राज्यात सत्ता बदल अत्यावश्यक आहे अन्यथा महाराष्ट्राचे काही खरे नाही कारण सत्ता आणि जात या दोन भरवशावर राज्यातले मूठभर नेते दलाल आणि अधिकारी हे राज्य झपाट्याने विकू लागले आहेत त्यांना ना कसली लाज आहे ना कोणाची भीती आहे. सरकारी नोकरीत नेमके कोण मोठ्या प्रमाणात घुसखोरी करताहेत याकडे दुर्दैवाने कोणाचेही लक्ष नाही आणि इतरांच्या दुर्लक्षाचा गैरफायदा मूठभर जातीयवादी अधिकारी व नेते घेऊन मोकळे होताहेत. सध्या नेमक्या परीक्षेचा काळ राज्यातल्या भाजपा प्रमुख नेत्यांसाठी आहे म्हणजे नारायण राणे म्हणालेत तसे जर सत्ता बदल या राज्यात नजीकच्या काळात झाले घडले नाहीत तर इतरांचे सोडा पण खुद्द भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडून राज्यातले बाहेरून आलेले जवळपास सारे नेते भाजपमधून बाहेर पडतील आणि माझे हे सांगणे शंभर टक्के खरे ठरणारे आहे. पण मनासारखे बदल जर भाजपाने राज्यात घडवून आणले तर त्यांच्या सोबतीने युती करणारांचे तेवढे भले होईल, इतर राजकीय पक्षांचे मोठे नुकसान झालेले तुम्हाला दिसेल, घोडा मैदान जवळ आहे. काहीही झाले तरी एकमेकांनी घट्ट पकडलेला हात हातातून काढून घ्यायचा नाही असे जर यापुढे देखील महाआघाडीच्या नेत्यांनी अगदी मनापासून ठरविलेले असेल तर मात्र राज्यातली भाजपा फार मोठ्या फरकाने मागे पडेल. आतली समजलेली बातमी अशी कि यापुढे उद्धव यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे नाही त्यांना राजीनामा देऊन मोकळे व्हायचे आहे त्यानंतर त्यांच्या जागी कोण, म्हणजे रश्मी कि सुप्रिया त्यावर सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील अर्थात सुप्रिया मुख्यमंत्री होणे अजितदादा यांना आवडणारे आणि परवडणारे नाही, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री व्हाव्यात असे दादा म्हणे खाजगीत बोलून पण दाखवितात त्यामुळे सुप्रिया मुख्यमंत्री झाल्याच तर दादा कदाचित मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, आणि आदित्य प्रमुख खात्यांसह उपमुख्यमंत्री होतील तसेच अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम बघतील तेथेही सुप्रियाला नेतृत्वात आव्हान देत स्वतः नक्की फार पुढे निघून जातील असे सतत वाटत राहते. मुख्यमंत्री आमचाच हवा असा जर उद्धव यांचा आग्रह असेल तर इतक्यात आदित्य यांचे नाव पुढे न करता स्वतः उद्धव हे एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री करून मोकळे होतील पण सर्वात आधी विचार रश्मी ठाकरे यांच्याच नावाचा केला जाईल. पण ज्या विश्वासाने भाजपा नेते बदलाचे संकेत यादिवसात देताहेत त्यावरून हेच वाटते कि काहीतरी वेगळे घडेल वेगके घडते आहे वेगळे घडणार आहे आणि हे वाईट दिवस संपलेले मराठी माणसाला नक्की बघायला मिळणार आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी