देशमुखांच्या गढीला खिंडार ..
-पत्रकार हेमंत जोशी
केवढा हा विचित्र योगायोग कसा हा नियतीचा क्रूर खेळ म्हणजे सतत ज्या अनिल देशमुख आणि कुटुंब सदस्यांनी काळा पैसा जमा करण्यासाठी मरमर केली त्यातल्या म्होरक्याला म्हणे अनिल यांना नेमके धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्तावर ईडीने अटक करावी यालाच म्हणतात देवाचिया द्वारी देर है लेकिन अंधेर नही है !! मला माहित आहे माझ्या वाचक मित्रांना माझ्या जगभरातल्या मराठी वाचकांना जे इतरत्र वाचायला ऐकायला मिळत नाही ते दुर्मिळ लिखाण प्रत्येक लेखातून माझ्याकडून अपेक्षित असते. आगळ्या माहितीची सुरुवात करतो. अगदी अलीकडे ज्या मंत्र्यांचा देखील अनिल देशमुख होणार आहे गप्पांच्या ओघात तो मंत्री मला म्हणाला, बघ साऱ्यांच्या नावाची बोंबाबोंब आहे पण माझ्या नावाची बोंबाबोंब हवेत विरली कि नाही आणि त्यासाठी मला माहित होते कि नेमके काय करायचे आहे ते मी नेमके केले म्हणून माझे नाव बाजूला पडले आता मी बिनधास्त आहे माझे आता काहीही होणार नाही कारण मी हे केले म्हणजे आधी भाजपावर टीका करणे कायम तोंडसुख घेणे बंद केले त्यानंतर मला माहित आहे भाजपामधल्या कोणत्या दोघांना गुपचूप भेटून त्यांच्या पायावर लोळण घेतली कि आपली ईडी आणि पीडा सारी संपते आणि मी ते केव्हाच केले साधारणत: वर्षभरापूर्वी. आणि हे असेच त्या अनिल देशमुख यांनाही वाटले असावे म्हणजे याच अनिल देशमुख यांनी म्हणे कुठल्या एका अमित शाह यांच्या जवळच्या माणसाशी ओळख काढली आणि त्या माणसाने अनिलबाबुंना निरोप दिला कि बिनधास्त तुम्ही ईडीला सरेंडर व्हा, तुमची केवळ दिवसभर जुजबी चौकशी केल्या जाईल आणि रात्री तुम्हाला सोडून देण्यात येईल त्या अनिल परब यांच्यासारखे आणि अनिलबाबू यांना वाटले कि आपण अगदी आनंदात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करूया त्यामुळेच त्यांना हि अवदसा आठवली, नेमके अनिलबाबू दिवाळीच्या एक दिवस आधी ईडीला आपणहून सरेंडर झाले, विशेष म्हणजे मी दिवाळीच्या दिवशी शंभर टक्के घरी येणार आहे हेअनिल देशमुख यांनी आपल्या कुटुंबाला सांगून ठेवले असल्याने धनत्रयोयदाशीला नागपुरातल्या त्यांच्या सिव्हिल लाईन मधल्या प्रसादावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती, अर्थात पुढले रामायण तुम्हाला माहित आहेच कि यापुढे अनिलबाबू आणि त्यांचे यापूर्वीच पकडल्या गेलेले दोन साथीदार सहजासहजी शंभर बाहेर येणार तर नाहीतच याउलट लवकरच त्यांचे आणखी काही निकटवर्ती ईडीआड होणार असल्याची माझी पक्की माहिती आहे…
अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे किरीट सोमय्या यांच्यासारखे अगदीच आणखी चार दोन या राज्यातल्या महा भ्रष्टाचार्यांच्या मागे लागले आहेत त्याच किरीट यांनी ज्यांना आपण ईडीच्या जाळ्यातून सटकलो व निसटलो आहे वाटले होते त्या दोघा तिघांची नावे याच किरीट यांनी अनिल देशमुख यांना ईडीने आत घेतल्यानंतर अगदी जाहीर म्हणजे वाहिन्यांसमोर येऊन घेतलेली आहेत, थोडक्यात अनेकांचा हा गैरसमज आहे कि भाजपा नेत्यांच्या पायावर डोके ठेवले कि आपली अगदी सहज सुटका होते जे अगदी अजित पवारांनाही वाटले होते, म्हणजे अजित पवार यांना तर असे सतत वाटत होते कि मी एकाचवेळी काका आणि देवेंद्र दोघांनाही मस्तपैकी उल्लू बनवून एकाकडून सत्ता हासील केली आहे तर देवेंद्र कडून आधी चौकशीतून सुटका नंतर त्यांची बाहेर पडूनही सिम्पथी मिळविलेली आहे आणि येथेच अजित पवार फसले आणि अनिलबाबू यांच्या अटकेबरोबर अजित पवार यांच्याही गळ्याभोवतालीचा फास घट्ट आवळल्या गेला आहे, आज त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांची केवळ एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता आयकर खात्याने जप्त केली आहे आणि हे तर हिमनगाचे एक टोक आहे हा केवळ एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी है दोस्तो, हि तर सुरुवात आहे, शेवट महाभयानक असेल. ज्यांनी परदेशात अगदी सुरुवातीपासून फार आधीपासून काळ्या धनाची फार मोठी गुंतवणूक करून ठेवलेली आहे त्या परमवीर सिंग यांच्या सारख्या काही अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सरकारच्या या खतरनाक एजन्सीजला काहीसे कठीण असे हे आव्हान आहे कि या मंडळींचे काळे धन नेमके कसे बाहेर काढावे ते, पण अनिल देशमुख यांच्यासारख्या ज्या नेत्यांची अधिकाऱ्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक या राज्यात या देशात आहे त्यांना यापुढे संकटातून वाचविणे कदाचित ब्रम्हदेवाला देखील शक्य होईल वाटत नाही आणि हेच या राज्यातल्या सामान्य लोकांना हवे आहे…..
अनिल देशमुख यांचा खाजगी सचिव म्हणून संजीव पलांडे केवळ दोन वर्षे आधी त्यांच्याकडे कार्यरत होता पण राजेंद्र अहिवार तर त्यांच्या कळपात गेली दहा बारा वर्षे सामील झालेला असतानाही म्हणजे अहिवार हा देखील त्यांचा खाजगी सचिव होता नंतर तो देशमुख यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शेवटपर्यंत काम बघत होता, विशेष म्हणजे तो देशमुख पलांडे पद्धतीनेच काळा पैसा जमा करीत असतांना त्याला का पकडण्यात आलेले नाही असा सवाल अनेकांना पडलेला आहे पडलेला होता आणि त्यावर माझी खतरनाक स्वतःची भयावह खतरनाक माहिती अशी कि राजेंद्र अहिवार ज्याला अनिल देशमुख यांच्याविषयी संजीव पलांडे पेक्षा अधिक खडा नि खडा माहिती होती तो म्हणे अगदी सुरुवातीलाच माफीचा साक्षीदार झाला असावा आहे आणि त्यानेच ईडी सारख्या शासकीय कंपन्यांना देशमुख आणि कुटुंबाची इत्यंभूत माहिती दिली असल्याने त्याला आत घेतल्या गेले नाही तो आजही निर्धास्त बिनधास्त जीवन जगतो आहे आणि हेच मला नेमके अनिल परब यांना देखील सुचवायचे आहे कि याच पद्धतीने तुमच्याही कार्यालयातील एखादा माफीचा साक्षीदार होऊन तुमच्याविषयी इत्यंभूत माहिती संबंधितांना पुरवीत तर नाही ना ? शोधा कि त्याला, जो तुमच्या कार्यालयात तुमचा निकटवर्तीय अधिकारी म्हणून काम करण्यापूर्वी नेमका कुठे कोणाकडे होता ? या देशात या राज्यात आजपर्यंत जनतेचा पैसे जनतेसाठी कधीही खर्च केल्या गेला नव्हता तर तो या राज्यातल्या प्रत्येक बदमाश व भ्रष्ट नेत्यांच्या दलालांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात जाम केल्या गेला आणि आपल्या या राज्याचे बघता बघता वरोले झाले, मोदी छान काम करताहेत त्यांच्या दीर्घायुषयाची प्रार्थना देवाकडे करूया….
तूर्त एवढेच: पत्रकार हेमंत जोशी