नवाब नको समीर हवा…
-पत्रकार हेमंत जोशी
अपमान अनेकांनी केलेत आजवर कधी गरिबीने केले तर कधी नातलगांनी पण माझा आयुष्यातील सर्वात मोठा अपमान अलीकडे पुण्याला जातांना तेही एका तरुणीने केला. झाले असे, पुण्याला जातांना मी कळंबोलीच्या मॅक डोनाल्ड मध्ये थांबलो, तेथे दोन टॉयलेटस आहेत, वरच्या माळ्यावर साऱ्यांसाठी आणि तळ मजल्यावरचा केवळ सिनियर सिटीझन्स साठी, कॉफी घेतल्यानंतर मी तळ मजल्यावरच्या टॉयलेट मध्ये घुसणार तेवढ्यात तेथे काम करणारी तरुणी मला जवळपास बाहेर खेचत म्हणाली, मिस्टर हा केवळ वयस्कांसाठी आहे तुम्ही वरच्या माळ्यावर जा आणि तिच्या या वाक्यावर रांगेत असलेल्या इतर खडूस पुणेकर बुजुर्गांनी देखील री ओढली. मी तेथून काढता पाय घेतला आणि कार मध्ये बसून वेड्यागत कितीतरी वेळ मी स्वतःशीच हसत होतो. अर्थात हे असे प्रसंग मी बाहेर सांगितले कि का कोण जाणे पण आशिष मोहदरकर किंवा उदय तानपाठक सारख्या मित्रांचा चेहरा बघण्यालायक होतो. मागे एकदा नेमका दिवाळी दरम्यान घडलेला प्रसंग कदाचित मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे एकदा मी दुबईला मॉल मध्ये एका दुकानात कार्पेट्स घेण्यासाठी म्हणून गेलो. दोन कार्पेट्स पसंत केले पण पत्नीला देखील दाखवावेत म्हणून तिला घ्यायला ती जेथे शॉपिंग करीत होती तिथे गेलो आणि कार्पेट्स दुकानात जेव्हा घेऊन आलो, मी पसंत केलेले कार्पेट्स तिला दाखवतांना दुकानदार माझ्याकडे बघत म्हणाला, अलीकडे तुमच्यासारखी मुले क्वचित दिसतात जे आपल्या आईचा एवढा आदर करतात, सांगायला नकोच, त्यानंतर मुंबईला येईपर्यंत मी नेमका स्वर्गात आहे कि दुबई रुपी नरकात आहे, माझे मलाच कळत नव्हते. खोचक असला तरी अलीकडे एक छान चुटका वाचण्यात आला. गुरुजी खोडकर शरदला विचारतात, आज एवढा आनंदी का ? गुरुजी आज माझ्या बकरीने अंडे दिले, शरद म्हणतो. कसला हा फालतूपणा बकरी अंडे कसे देईल ? गुरुजी जेव्हा रागाने विचारतात बेरकी शरद नेहमीचा भाबडा चेहरा करीत म्हणतो, अहो गुरुजी मी माझ्या कोंबडीचे नाव बकरी आणि रेड्याचं नाव अजित ठेवलय. शरद हा असाच खोडकर पहिल्यापासून, नावे ठेवण्यात तर तो एवढा पटाईत कि त्याने गांजाचे नाव देखील हर्बल तंबाखू ठेवलय….
नटीचा इतिहास म्हणे कधीही उकरून शोधून काढायचा नसतो तरीही अलीकडे जितेंद्र आव्हाड क्रांती रेडकरला म्हणालेच, हमाममें सब नंगे होते है, वाक्य अजिबात चुकीचे नाही पण जितेंद्रजी एवढे लक्षात ठेवा जेव्हा आपण एक बोट दुसरीकडे दाखवतो तेव्हा उरलेली तिन्ही बोटे आपल्याकडे असतात. नवाब मालिकांची तर मला अजिबात बाजू घ्यायची नाही पण वानखेडे कुटुंबाचे देखील समर्थन करायचे म्हणून हे लिखाण नाही मात्र नवाब मलिक ज्यापद्धतीने मुद्द्याचे सोडून वानखेडे कुटुंबाची व्यक्तिगत अब्रू वेशीवर टांगण्याची जी सतत घाणेरडी भाषा वापरताहेत त्याचे कोणतेही दुष्परिणाम नवाब मलिक यांना अजिबात भोगावे लागणार नाहीत याउलट त्यांचे त्यांच्या मुस्लिम मताधिक्य असलेल्या मतदार संघात येणाऱ्या विधान सभा किंवा महापालिका निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचे नक्की मताधिक्य वाढणार आहे मात्र नवाब मलिक या जात्यंध मुस्लिम नेत्याच्या वागण्या बोलण्याचा मोठा विपरीत परिणाम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या लोकप्रियतेवर शंभर टक्के होणार आहे कारण या दोघांनी या राज्यातल्या जात्यंध मुस्लिमांचे चालविलेले लाड ज्याची मोठी चीड प्रत्येक मराठी मतदारांच्या मनात हृदयात निर्माण झालेली आहे. आमच्या विदर्भात किंवा या राज्यात असे अनेक महार आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यावर देखील बौद्ध धर्म स्वीकारला नाही अनेक नवबौद्ध झाले नाहीत अनेक आजतागायत हिंदू महार म्हणून वावरत आले आहेत त्यापैकी एक वाशीम जिल्ह्यातले वानखेडे कुटुंब जे वारकरी म्हणूनही जगत आले आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत आणि याच हिंदू महार कुटुंबात समीरचा जन्म झाला. अत्यंत महत्वाचे म्हणजे समीरच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेशी लग्न केल्याने त्यांच्या घरात कायम हिंदू आणि मुस्लिम असे मिक्स वातावरण जरी असले तरी समीरच्या आईचा घरात अधिक पगडा असल्याने पुढे तिने समीरचा आणि मुलीचा देखील मुस्लिमांशी निकाह विवाह लावून दिला. समीरला मुस्लिम पत्नीपासून एक मुलगा आहे आणि क्रांतीशी विवाह केल्यानंतर सरोगसी पद्धतीने त्यांना दोन मुली आहेत. या दिवसात उभा महाराष्ट्रात अतिशय गंभीर चित्र निर्माण झाले आहे म्हणजे ड्रग्स हे व्यसन आता मुंबई पुणे नागपूर एवढे मर्यादित राहिले नसून त्याचे मोठे लोण उभ्या राज्यात वेगाने पसरले आहे. कृपया समीर वानखेडे खचून जाऊन नोकरीतून बाहेर पडतील हि वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नका. लढणारा नेता असो किंवा पत्रकार, अधिकारी असो अथवा समाजसेवक, समस्त मराठी बांधवांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे दुर्लक्ष करून ते करीत असलेल्या सत्कार्याला सतत पाठिंबा द्यावा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी