दादागिरी आणि काकाजी : पत्रकार हेमंत जोशी
सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसेस मध्ये चार मित्र एकत्र आले कि बायका एकत्र जमल्या कि चार टाळकी एकत्र आलीत कि आता सॅनिटायझरचे तंबाखू घुटका माव्यासरखे झाले आहे म्हणजे खिशातून काढायचा अवकाश चार हात लगेच पुढे येतात. विशेषतः भारतीय म्हणे कोरोनामुळे नव्हे तर वाढलेल्या थकलेल्या उधारीमुळे मास्क लावून फिरताहेत. अलीकडे एका मित्राची बायको त्याच्याबरोबर दारावर बसायला म्हणे यासाठी गेली नाही कारण तिला वेळेवर मॅचिंग मास्क सापडला नाही. भारतीय आपल्या गाड्यांच्या मागे काय लिहून मोकळे होतील सांगता येत नाही. सासूची कृपा, काकांचा आशीर्वाद, अमुक देवाची पुण्याई, तमुक बुवा किंवा बाबांचा हात असे काय काय म्हणून आम्ही भारतीय आपापल्या घरांवर गाड्यांवर लिहून मोकळे होतो. उद्या समजा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आपापल्या खुर्च्यांच्या मागे आई किंवा बाबांचा आशीर्वाद अथवा पुण्याई असे लिहायचे ठरविले तर मला वाटते बहुतांश नेत्यांना हे असे लिहून मोकळे व्हावे लागेल कारण आपल्या देशातली हि तर मोठी विकृत मानसिकता आहे कि आधी आपापल्या कुटुंब सदस्यांचे भले करायचे साधायचे त्यातून चुकून उरले तरच इतरांच्या अंगावर भिकारी, किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यासारखे उरले सुरले भिरकवायचे, मलिदा तेवढा आपल्याला आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलायला…
या दिवसात शरद पवार यांची सर्वाधिक भीती कोणाला वाटते आहे किंवा सर्वाधिक परेशान कोण आहे किंवा सर्वाधिक धास्तावलेला घाबरलेला हादरलेला केविलवाणा कोण असावा असे तुम्हाला वाटते किंवा जळी स्थळी शरद पवार कोणाला एखाद्या चवताळलेल्या वाघासारखे किंवा भुकेल्या सिंहासारखे दिसत असावेत असे तुम्हाला वाटते. देवेंद्र फडणवीस अजिबात नाहीत, उद्धव ठाकरे दुरदुरपर्यंत नाहीत, जयंत पाटील ते फक्त तसा विनाकारण चेहरा करून फिरतात, दिलीप वळसे पाटील त्यांचा चेहरा तर त्यांच्या मधुचंद्राला पण असाच धास्तावलेला दिसत होता, हेमंत टकले ते तर बोलतांना हसताहेत कि नेमके हुंदके देताहेत हेच कळत नाही, जितेंद्र आव्हाड तो तर गब्बर चा अरे ओ सांभा असल्याने उनको पवारमियाँ का डर नाही लागत है, सुप्रिया सुळे त्या या दिवसात मेकअप शिवाय असल्याने त्यांचा चेहरा असा व्याकुळ ओढलेला थकलेला वाटतो म्हणजे नेमके त्यांच्या कडे बघून वाटते कि नवऱ्याचा चार महिन्यांपासून पगार झालेला नाही आणि उधाऱ्या तर खूप थकलेल्या आहेत. सुनील तटकरे त्यांचा तसाही चेहरा नेहमी मुळव्याध ग्रस्त आणि एखाद्या बाईला नेहमीच्या होणाऱ्या बाळंतपणाने त्रस्त असा दिसतो. छगन भुजबळ ते कायमच लग्नाआधी प्रियकरामुळे पाळी टळल्याच्या मुड मध्ये असतात. जाऊ द्या तुमची उत्सुकता फार ताणून धरत नाही. या दिवसात शरद पवार यांच्यामुळे अशांत अस्वस्थ परेशान डिस्टरब आहेत ते फक्त अजितदादा…
www.vikrantjoshi.com
जसा कोरोनाचा लॉक डाऊन कालावधी इकडे सुरु झाला तिकडे अजित पवार यांचा थेट जादूगार रघुवीर किंवा गुप्तहेर राजू झाला म्हणजे ते त्यानंतरच्या दिवसात नेमके कुठे आहेत कसे आहेत काय करताहेत हेच कळत नाही. नाही म्हणायला सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना छानपैकी कडेवर घेऊन नंतर डोक्यावर पण घेतले नंतर असे वाटायला दिसायला लागले कि याच उद्धव यांनी त्यांना आधी डोक्यावर घेऊन कौतुक केले पण लवकरच अजितदादांचा थेट बोळवायला आणलेला गणपती बाप्पा केला. उद्धव यांच्याकडून दादांच्या बाबतीत घडले आहे घडते आहे ते खरे आहे कारण तशा सूचनाच म्हणे शरद पवार यांनी उद्धव सारख्या संबंधितांना अप्रत्यक्ष दिल्या आहेत कि दादांचे स्तोम महत्व यापुढे फारसे वाढता कामा नये. वास्तविक अजितदादा अतिशय नियमित नेहमीप्रमाणे त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात येऊन बसतात पण त्यांचा आमच्या शाळेतल्या मानस्कर सरांसारखे झाले आहे म्हणजे मानस्कर सर निवृत्तीनंतरही शाळेतल्या टीचर्स रूममध्ये नुसतेच येऊन बसायचे आणि जमलेल्या इतर शिक्षकांचे छान मनोरंजन करमणूक करून मोकळे व्हायचे. हे सारे येथे अर्थात गमतीने घेण्याचे नाही, मॅटर सिरीयस आहे निदान अजितदादांनी अतिशय सिरियसली घेण्यासारखे आहे आणि थेट राजकारणातल्या बलाढ्य काकांशी दोन हात करायचे असतील तर अजितदादांनी जी चूक मागे केली ती निदान यावेळी तरी करू नये, निदान स्टाफ तरी लुच्चा भामटा लफंगा भ्रष्ट हरामखोर नीच असू नये. अशा थर्ड ग्रेड अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना चार हात लांब ठेवावे. चहापेक्षा किटली अधिक गरम असे या पद्धतीने दादांच्या सभोवतालचे कार्यालयातले वागायला लागले आहेत जे धोकादायक वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी