अजितदादा आणि फसविणारा वादा…
-पत्रकार हेमंत जोशी
जसे मुंगीला वयात आली आता ब्रा घाल सांगणे किंवा सिंहीणीच्या ओठांचे चुंबन घेणे, हत्तीला कडेवर घेऊन त्याच्या गालाचा मुका घेणे किंवा मच्छराला चड्डी घालणे, माशीला लिपस्टिक लावणे उंदराला साबण लावून अंघोळ घालणे वाघिणीला तिच्या नवऱ्यासमोर डोळा मारणे नागपुरातल्या गिरीश गान्धी यांना उठसुठ कार्यक्रम घेऊ नका सांगणे पत्रकार अनिल थत्ते यांना थापा मारणे बंद करा सांगणे किंवा विजय दर्डा यांना आता तुम्ही जक्खड म्हातारे झालात हे सांगणे किंवा एकनाथ खडसे यांना उसने अवसान आणू नका सांगणे किंवा कुटुंबासाठी नव्हे तर जनतेसाठी पैसे कमवा पैसे खर्च करा हे अनिल देशमुखांना आणि त्यांच्या दोन अतिशय उनाड बदमाश भामट्या मुलांना सांगणे जसे शक्य नाही तसे राज्यातल्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांना तुम्हाला राजकारणातले काही कळत नाही,असे म्हणणे म्हणजे संजय राऊत यांना यापुढे शांत बसा सांगण्यासारखे. मोजपट्टी लावून या तिघांत कोण अधिक बेरकी नेता अशी तुलना करणे तसे महा अवघड काम कारण तिघेही तोडीस तोड आहेत आणि या तिघांशी पंगा घेणे तेवढे अजिबात सोपे नाही हे कायम लक्षात ठेवा. जे शिवसेनेत एकेकाळी नेतृत्वात स्वतःला दारासिंग समजत होते त्या सर्वांना मोठ्या खुबीने अहिस्ता अहिस्ता उद्धव यांनी आधी दूर केले नंतर त्या साऱ्यांना पुन्हा इतरत्र नेतृत्व उभे करतांना त्यांच्या नाकात दम आणला अगदी छगन भुजबळ ते रामदास कदम साऱ्यांचा इतिहास पुन्हा एकवार तुम्ही चाळल्यास तुमच्याबते लगेच लक्षात येईल. रामदास कदम यांना अनेक सांगत होते कि कुटुंबासाठी पैसे मिळविण्याचा मोह आवरा आणि पक्षासाठी देखील आर्थिक बलिदान करायला शिका, माझ्यासारखे अनेक त्यांना वारंवार सांगत होते पण नको ती भाईगिरी करण्याच्या नादात हे महाशय गुंतले आणि काल पर्वा यापुढे कायमस्वरूपी बदनाम नेतृत्वाचे वाटोळे करून ते मोकळे झाले. यापुढे पोटच्या मुलाचे सेनेतले स्थान टिकवणे हेही आता रामदास यांच्या हाती नसून केवळ त्यांच्या आमदार झालेल्या मुलाने जर बापाच्या पावलावर पाऊल न ठेवता मातोश्री आणि मतदारांसमोर वेगळी तीही चांगली इमेज उभी केली तरच कदम राजकारणात टिकतील राहतील दिसतील अन्यथा त्यांना देखील एक दिवस सेनेतून बाहेर पडावेच लागेल आणि इतर कोणताही राजकीय पक्ष रामदास कदम यांना शंभर टक्के जवळ घेणार नाही, कदम कुटुंबाचे मग राजकीय वाटोळे नक्की ठरलेले आहे….
हा दोष केवळ अजित पवार यांचा आहे हि केलेली चूक केवळ अजितदादा यांचीच आहे ती केलेली गद्दारी आणि बेईमानी फक्त अजितदादा यांच्याच डोक्यातून उतरलेली आहे, तेव्हा केलेली फसवणूक आणि अडवणूक त्याचे सर्वेसर्वा फक्त आणि फक्त अजितदादा त्यास जबाबदार आहेत आणि ती घोडचूक ती फसवणूक होती फडणवीस प्रकरणातली. एकदा मी रस्त्यात भेटले तेव्हा फडणवीसांना म्हणालो देखील कि अजित पवार यांच्या चुकांचे लफड्यांचे जे पुरावे माझ्याकडे आहेत तसे खुद्द शरद पवार यांच्याकडे देखील नाहीत, करू का ते उघड, फडणवीस चक्क नाही म्हणाले आणि तसेही आमचे अजितदादा यांच्यावर नव्हे तर डिस्टरब असलेल्या पार्थवर मनापासून प्रेम असल्याने आम्ही मी शक्यतो अजितदादांच्या वाट्याला जात नाही आणि आम्ही दलाल पत्रकार नसल्याने तसेही अजित पवारांशी आमचे काहीही घेणे देणे नसते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक नेता, अजित पवारांच्या मागे लागू नका असे जेव्हा मला म्हणाला तेव्हा मला त्यांच्या त्या चुकीच्या दिलदार वृत्तीचा खरेतर मनापासून राग आला होता किंबहुना भाजपच्या या नेत्याचे गांधीछाप वागणे तसे मला आवडले नव्हते कारण ऐन उमेदीच्या काळात फडणवीसांना मोठी राजकीय हानी पोहोचविण्याचे मोठे पाप अजित पवार यांनीच केलेले आहे ज्यामुळे फडणवीस थोडेथोडके नव्हे अनेक वर्षे बऱ्यापैकी सत्तेच्या राजकारणातून मागे फेकल्या गेले आहेत आणि तीच वस्तुस्थिती आहे. मात्र अलीकडे जे केवळ अजितदादा आणि त्यांच्या नातेवाईकांत शरद पवार यांच्या नव्हे खळबळ उडाली आहे ते बघून आणि मिळालेल्या माहितीवरून त्यावेळी शांत बसलेल्या फडणवीसांनी आपला हिशेब चुकता केल्याचे मी येथे तुम्हाला ठासून सांगतो आहे. तेव्हा त्यांनी मोठे मन ठेवून मला शांत केले पण फडणवीस शांत नव्हते त्यांनी म्हणे अजितदादा आणि त्यांच्या जवळच्या नातलगांचा अतिशय सखोल आर्थिक अभ्यास केला पुरावे जमा केले आणि किरीट सोमय्या यांच्याकडे ते सुपूर्द केले, पुढल्या पडलेल्या धाडी जनतेला तुम्हाला माहित आहेतच. ज्यादिवशी आमचे पार्थवरून प्रेम कमी होईल, अजित पवार नेमके कसे मी तुम्हाला पुराव्यांसहित सांगून मोकळा होईल. आणि ज्या प्रेमापोटी अजितदादा यांनी फडणवीसांना चक्क फसविले पुढे काका शरद पवार देखील त्यांचे झाले नाहीत आणि तसेही फार आधीपासून शरद पवार अजितदादांच्या अनेक राजकीय व आर्थिक भानगडींना कंटाळले आहेत त्यांच्यात रागावले आहेत. दादांनी देखील स्वतःचा काका करून घेतला. पाठीत खंजीर खुपसण्याच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी विनाकारण कवटाळले….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी