चव्हाण तुमच्या डोक्यावर वहाण : भाग २
-पत्रकार हेमंत जोशी
मध्यंतरी एक विनोद सगळीकडे फिरत होता. एकदा राज्याच्या बांधकाम खात्याच्या मंत्र्याच्या आईला लागलेली उचकी काही केल्या थांबत नाही म्हणून तिला डॉकटरांकडे नेल्या जाते, तेव्हा डॉक्टर म्हणतात सध्या गणपती उत्सवामुळे कोकणातल्या रस्त्यावरची वाहतूक खूपच वाढलेली आहे, रस्त्यावरून गाडी चालवताना जो तो कोकणवासी रागातून तुमच्या आईला आठवतो म्हणून हि उचकी, एकदा का गणेशोत्सव उरकला कि त्रास कमी होईल पण यापुढे हा त्रास कायमचा थांबेल असे अजिबात वाटत नाही. जर एखादे राज्य प्रगत करायचे असेल तर सर्वप्रथम तेथले रस्ते चांगले करा राज्य आपोआप प्रगतीपथावर जाण्यास फार मोठी मदत होते पण जे सतत खाते ते बांधकाम खाते हे आज नाही अगदी सुरुवातीपासून राज्याच्या बांधकाम खात्याविषयी हि बोंबाबोंब आहे अपवाद नितीन गडकरी यांचा या खात्याचे मंत्री म्हणून कार्यकाळ किंबहुना गडकरी मंत्री होण्याआधी या राज्यातले रस्ते खराब आणि लहान म्हणजे नेहमीप्रमाणे नित्कृष्ट दर्जाचे असतांना देखील या खात्याविषयी एवढी बोंबाबोंब नव्हती कारण त्याकाळी रस्त्यावरून आजच्यासारखी वाहनांची गर्दी नव्हती, फारच कमी लोकांकडे मोटार गाड्या असायच्या पण विशेषतः १९९५ नंतर वाहन खरेदीला जोर चढला आणि रस्ते मात्र तसेच भिक्कार राहिल्याने वर सांगितलेला विनोद खरा वाटतो. केवळ कामे न करता पैसे खाता येतात हा या राज्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा, दलालांचा, कंत्राटदारांचा, मंत्र्यांचा आणि नेत्यांचा मोठा भ्रम आहे किंबहुना एक मंत्री म्हणून चांगले काम केले किंवा एक अधिकारी म्हणून चांगले काम केले तरी खूप श्रीमंत होता येते, वाटल्यास यासाठी सत्तेतल्या या संबंधित समस्त मंडळींनी टी चंद्रशेखर या निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याची आणि मंत्री नितीन गडकरी यांची अवश्य शिकवणी लावावी आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर त्यानंतर नक्की पाऊल उचलावे म्हणजे त्यातून श्रीमंत पण होता येते आणि राज्याची झपाट्याने मोठी प्रगती देखील होते…
केवळ यावेळच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना दोषी ठरविणे योग्य नाही तर गडकरी वगळता आजतागायत विशेषतः नव्वदीच्या दशकानंतर जे जे या बांधकाम खात्याचे मंत्री आणि अधिकार पदावर होते त्या सर्वांची ती मोठी चूक आहे आणि आजतागायतचे सारेच त्यात प्रचंड दोषी आहेत. विशेष म्हणजे गडकरी यांच्या कार्यकाळात या राज्यात बांधकाम खात्यात जे जे कंत्राटदार आणि अभियंते होते तेच म्हणजे त्याच भ्रष्ट वृत्तीचे आधीही होते पण तीच माणसे गडकरी यांच्या कारकिर्दीत जर चांगले काम करवून दाखवू शकतात इतर एकही मंत्र्याला अगदी भाजपच्या मंत्र्याला देखील ते जमले नाही कारण गडकरी किंवा चंद्रशेखर यांच्यासारखी मानसिकता एकातही नव्हती नाही आढळली नाही. काम करूनही खूप पैसे मिळविता येतात वाटल्यास हा चंद्रशेखर व गडकरी फॉर्म्युला मी तुम्हाला तुमच्याजवळ बसून समजावून सांगू शकतो फक्त हि मानसिकता मनाशी ठरवा कि राज्याच्या लोकांच्या हितासाठी नक्की काम करायचे आहे हे राज्य हा देश प्रगती पथावर न्यायचा आहे. जे मुख्यमंत्री झाले ज्यांना व्हायचे आहे आणि आज जे मुख्यमंत्री आहेत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत विशेषतः उद्धवजी आणि अशोकराव तुम्हा दोघांनाही तुमच्यावर मनापासून प्रेम करणारा एक मित्र म्हणून सांगायचे आहे कि अजूनही नक्की वेळ गेलेली नाही तुम्हाला केवळ एक करायचे आहे आणि तुम्हाला ते समजत नसेल तर मला केवळ दहावी पास असलेल्या पत्रकाराला आपण बोलवावे मी तुम्हाला केवळ काही तासात समजावून सांगेल कि उरलेल्या कार्यकाळात बांधकाम खात्यात कसे वेगाने काम करायचे आहे आणि फक्त व फक्त बांधकाम खात्याच्या भरवशावर पुढल्या अनेक निवडणुका कशा जिंकायच्या आहेत. माझे सांगितलेले तुम्ही जर ऐकले आणि त्यानंतर जर तुमच्या मनासारखे झाले नाही म्हणजे नाव आणि काळा पैसा जर तुम्हाला मिळाला नाही तर मी सर्वांदेखत मंत्रालयाच्या इमारतीवर चढून खाली उडी मारेल आणि उर्वरित आयुष्य आटोपते घेईल…
काहीही कोणतेही राज्याच्या हिताची कामे वाटल्यास तुम्ही करू नका तसेही करत नाही फक्त एक करा या राज्यातली प्रत्येक सडक चांगली करा आणि बघा प्रत्येक मतदार तुम्हाला कसे डोक्यावर घेऊन नाचेल. जो तो जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरतो आणि कसाबसा घरी परत येतो कारण रस्ते जीवघेणे ठरले आहेत, रस्ते चांगले करणे तुमचे सर्वाधिक महत्वाचे काम आहे पण काम न करता अधिकाऱ्यांची नेत्यांची कंत्राटदारांची घरी बक्कळ पैसा नेण्याची विकृत वृत्ती वाटोळे राज्याचे होते आहे. पैसेही खूप खूप खा पण त्याआधी हे खाते कसे चालवायचे माझ्याकडून पेक्षा नितीन गडकरी यांच्याकडून पक्षभेद विसरून समजावून घ्या आणि बघा तुम्ही कसे दर क्षणी यशस्वी होता ठरता ते. वाममार्गाने पैसे घरी नेणाऱ्यांचे प्रत्यक्षातले हाल तर बघा, ते नरेंद्र मोदी आता या देशातल्या काळ्या पैसेवाल्यांना धड जगू देत नाहीत आणि पोटची तरुण मुले व मुली कुठे सापडतात तर थेट क्रूझवर आणि तेही ड्रग्स घेतांना म्हणजे आर्यन पकडल्या जातो आणि एखाद्या पापी नेत्याचा मुलगा तिथून सटकतो एवढाच काय तो फरक. पण एक लक्षात ठेवा तुम्ही त्या क्रुझवरुन भलेही सटकला असाल पण त्यातून अधिक ड्रग घेण्याची हिम्मत तुमच्या मुलांमध्ये वाढली आहे तेवढे देवाच्या त्या काठीला घाबरा अन्यथा आलेला काळा व गरिबांचा पैसा तुम्हाला जगणे मुश्किल करून सोडणार आहे. अशोक चव्हाण तुम्ही एक अत्यंत बुद्धिमान, उच्च शिक्षित, अनुभवी, कठोर, मेहनती मंत्री आहात आणि मागले पुढले सारे काही धुवून काढण्याची मोठी संधी तुम्हाला देवाने उपलब्ध करून दिलेली आहे. उभे राहा आणि लोकांना जाहीर ओरडून सांगा कि मी तुम्हाला यापुढे वेगळे काहीतरी या बांधकाम खात्यात करून दाखवेन आणि नावाच्या बाबतीत थेट गडकरी यांना देखील मागे टाकेल. चुकीचा पैसा घरात आणणे शक्यतो नको अन्यथा तो जेथे काम करणाऱ्या गडकरी यांना स्वस्थ बसू देत नाही तुमच्या पापांची संख्या तर न मोजता येणारी आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी