हे वाचाल तर अवाक व्हाल…
-पत्रकार हेमंत जोशी
मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना कंटाळले कारण या आंदोलनाने त्यांना फार छळले त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा आरक्षण आंदोलनाचा, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या समस्त नेत्यांनी केवळ बुजगावण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन बऱ्यापैकी थंडावले कारण जे हे आंदोलन. भडकवणारे होते तेच महाआघाडीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असल्याने त्यांनी मराठा आंदोलनाची केवळ वात तेवत ठेवलेली आहे अजिबात भडका उडू न देण्याची त्यांची स्पष्ट भूमिका आहे, आणखी एक आतली बातमी म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी अतिशय बेरकी व बुद्धिमान नेते उद्धव ठाकरे यांनी वेगळी शक्कल लढवून या आंदोलनाला शह देण्यासाठी एक नवा पर्याय उभा केला आणि तो पर्याय होता आहे श्रीमान विजय वडेट्टीवार, ठाकरे यांचे सहकारी मंत्री. वास्तविक ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी याच ओबीसी आंदोलनाचे ज्यांनी आधी नेतृत्व केले होते त्या छगन भुजबळ यांना यावेळी देखील पुढे करणे अत्यावश्यक होते पण ज्या भुजबळ यांची उद्धव यांच्याशी कमालीची जवळीक वाढलेली आहे म्हणजे उद्या जर भुजबळ यांना राष्ट्रवादी सोडण्याची इच्छा झाली तर मागला पुढला कोणताही विचार न करता ते उठतील आणि थेट शिवसेनेत पुन्हा सामील होतील किंबहुना महाआघाडी सत्तेत येण्यापूर्वीच भुजबळ शिवसेनेत चालले होते पण दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना तसे न कारण्याचा म्हणजे राष्ट्र्वादीतच थांबण्याचा मोलाचा सल्ला दिल्याने भुजबळ यांचे पक्षांतर लांबले हि वस्तुस्थिती आहे तरीही म्हणजे उद्धव यांच्याशी एवढी सलगी असतांना देखील मराठा आंदोलनाला पर्याय उभा करतांना उद्धव यांनी भुजबळ यांच्या हाती अजिबात नेतृत्वाची धुरा न सोपविता त्यासाठी काँग्रेसतर्फे मंत्री झालेले विजय वडेट्टीवार यांना पुढे करण्यात आले…
वास्तविक मनासारखे वीज खाते त्या नितीन राऊत यांनी स्वतःकडे हिसकावून घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार हे कमी महत्वाच्या मिळालेल्या खात्यांमुळे कमालीचे म्हणाल तर नाराज म्हणाल तर अस्वस्थ होते आहेत किंबहुना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा त्यांचा अनेकदा विचार देखील झाला होता पण संपूर्ण राज्याचे ओबीसी नेतृत्व भुजबळ यांच्याऐवजी त्यांच्याकडे चालून आल्याने आता त्यांचा अख्य्या मंत्रिमंडळावर मोठा दबाव निर्माण झाल्याने मनासारखी महत्वाची कामें वडेट्टीवार यांची होत असल्याने अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांच्या चंद्रपूर परिसरात उद्धव यांनी वडेट्टीवार यांना जवळ घेऊन आणि भाजपाची मोठी नाराजी पत्करून जी जिल्हा दारूबंदी केवळ वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून उठवली, त्यातून विजयबाबू जाम खुश झाले त्यांची मनासारखे खाते न मिळण्याची नाराजी देखील त्यातून कुठल्या कुठे पळाली आणि आता ते उद्धव यांचे म्हणाल तर खान्दे समर्थक म्हणून ओळखले जातात म्हणाल तर तयाचें एक विश्वासू सहकारी मंत्री म्हणून देखील ओळखले जातात. वास्तविक वडेट्टीवार ऐवजी ओबीसी नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे चालून येणे फारसे अवघड नव्हते किंवा खरे तेच हकदार होते पण होते काय की भुजबळ नेमके ओबीसी नॉर्म्स विसरतात आणि केवळ त्यांच्या जातील तेथे त्यांच्या माळी समजला ज्ञातीला तेवढे बिलगून जवळ करून मोकळे होतात त्याहीपुढे महत्वाचे असे कि भुजबळांनी ज्या भानगडी करून तुरुंगात ते गेले त्यातील आरोपातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी छगन भुजबळांना मराठ्यांची विशेषतः शरद पवार यांची नाराजी ओढवून घेणे शक्य नव्हते आणि परवडणारे तर अजिबात नव्हते आणि उद्धव यांच्या ते नेमके लक्षात आल्याने त्यांनी भुजबळ यांच्याऐवजी खमक्या लढाऊ आणि प्रसंगी कोणाच्याही अंगावर धावून जाण्याची ताकद ठेवणार्या विजय वडेट्टीवार यांना ओबीसी आरक्षण मोर्चाचे व आंदोलनाचे नेते म्हणून पुढे केले…
एक किस्सा मला आठवला कि माझ्या दूरच्या ओळखीच्या एका तरुणीला ती विधवा झाल्यानंतर दिवस गेलेत, तिच्या घरी एक तरुण कायम यायचा त्याचेच हे प्रताप आहेत असेच गावकऱ्यांना वाटायचे कारण हा तरुण तिच्या घरी दिवसा कमी पण रात्रीच अधिक मुक्कामाला असायचा पण गावकार्यांना एक वस्तुस्थिती माहित नव्हती कि तो तरुण तिला सख्य्या बहिणीच्या जागी मानायचा आणि तिला त्यातून त्या तरुणांमुळे नव्हे तर ती ज्या ठिकाणी नोकरी करायची तेथल्या बॉसपासून दिवस गेलेले होते. ओबीसी आंदोलनाबाबत बहुतेकांचा अनेकांचा तोच गैरसमज आहे कि हे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाला शह देण्यासाठी आत्तापासून उभे केले आहे पण अजिबात ती वास्तूस्थती नाही हे आंदोलन उभे करण्यामागे या आंदोलनाला मोठी ताकद देण्यामागे खुद्द उद्धव व तयाचें काही विश्वसू मित्र अधिक जबाबदार आहेत तेच या आंदोलनामागे उभे आहेत विशेष म्हणजे तुम्ही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपच्या फार मोठ्या प्रभावी नेत्याला म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना सोबतीला घ्या त्यांना विश्वासात घ्या असा सल्ला देखील वडेट्टीवार यांना याच नेत्यांनी दिलेला आहे अशी माझी पक्की माहिती आहे. हेही खरे आहे कि ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्यापूर्वी बावनकुळे यांनी तशी रीतसर परवानगी व अनुमती अनुक्रमे त्यांचे लाडके नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघांकडून मिळविली घेतली होती. ओबीसी आंदोलनाचे जनक पाठीराखे देवेंद्र फडणवीस आहेत किंवा होते हि केवळ अफवा आहे. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाला शह देण्यात ओबीसी आंदोलन हि नामी युक्ती दीर्घकाळासाठी शंभर टक्के यशस्वी ठरली आहे. मान गये उद्धव उस्ताद….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी