खळबळजनक भाग 2 : स्वत्व विसरलेले हिंदुत्व
— पत्रकार हेमंत जोशी
स्पर्धा मग ती कोणतीही कुठलीही असो मागे असलेला मागे दिसणारा आपल्या पुढे कसा व केव्हा निघून जाईल सांगता येत नाही, स्पर्धक मात्र पुढे निघून गेल्यानंतर हात चोळत बसण्या पलीकडे आपल्या हाती अशावेळी काहीही उरलेले नसते. थ्री इडियट सिनेमातला चतुर एके ठिकाणी बसून यासाठी आदळआपट करीत असतो कि अंतिम परीक्षेत तो दुसरा आलेला असतो आणि सारेच ज्याला कायम अंडर एस्टीमेट करतात कमी लेखत असतात त्या अमीर खान याने पहिला प्रथम क्रमांक पटकवलेला असतो. तेथेही नेमका मुस्लिम अमीर खान होता आणि येथेही या देशात आपल्याशी म्हणजे समस्त हिंदूंशी जीवघेणी स्पर्धा खेळणारे मुख्यत्वे मुस्लिम हेच आहेत. आज लोकसंख्यने या देशातले मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर आहेत पण ते त्या सिनेमातल्या अमीर खान सारखे केव्हा कोणत्या क्षणी पहिल्या क्रमांकावर स्वतःला नेऊन ठेवतील अजिबात सांगता आणि नाकारता येत नाही. रा. स्व. संघाच्या माध्यमातून ज्या संघटना आणि राजकीय पक्ष येथे या हिंदूसंस्थानात ऍक्टिव्ह आहेत केवळ त्यांनाच हा देश मुस्लिमांचा नव्हे तर हिंदुस्थान म्हणून ओळखल्या जावा असे वाटते. आपण राजकीय दृष्ट्या कोणत्या कुठल्या विचारांचे असावे त्यावर लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार आहेत पण असा कोठेही, हिंदुत्व विसरू नका आणि मुसलमानांना पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेऊ नका आपला चतुर करून घेऊ नका हि तुम्हाला कळकळीची व हात जोडून विनंती आहे कारण एकदा का मुसलमान प्रथम क्रमांकावर पोहोचले तर ते आपल्या पुढच्या पिढीला देखील नक्की बाटवून मोकळे होतील…
अगदी अलीकडे भर पावसात मी डोंबिवलीत राहणाऱ्या माझ्या काही आवडत्या मंडळींना एकत्र बोलावून त्यांना भेटायला गेलो होतो. जमलेल्या मंडळींचे अर्थात मुख्य आकर्षण ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर होते. जसे मला एखाद्याने काका मामा असे हाक मारलेले आवडत नाही तेच जोगळेकरांचे असावे. त्यांचा याही वयातील उत्साह आणि कामगिरी त्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणणे म्हणजे हिणवणे असे नक्की वाटत असावे. वास्तविक सुधीर जोगळेकर हि या राज्यात स्वतंत्र ओळख आहे ती त्यांच्या लेखन शैलीमुळे पण तरीही ते जातात त्या ठिकाणी त्यांची जी वेगळी ओळख सांगितल्या जाते विशेष म्हणजे त्या ओळख सांगण्याचा त्यांना अजिबात राग येत नाही उलट ती त्यांची वेगळी ओळख सांगितल्यानंतर गाईला आपले वासरू बघितल्यानंतर जसे भरून येते आणि ती मोठ्यांदा हंबरते ते तसेच जोगळेकर यांचे देखील नक्की होत असावे. पत्रकार सुधीर जोगळेकर स्वतः खूप मोठे आहेत किंवा आजही त्यांचे सिनेमाशी व संघाशी संबंधित कार्य बघणार्याला थक्क करून सोडते पण त्यांना त्यांच्या ज्या जावयामुळे अलीकडे अनेक ठिकाणी ओळखल्या जाते तयाचा त्यांना सार्थ अभिमान आहे मोठे कौतुक आहे कारण जोगळेकर हे अत्यंत प्रामाणिक अतिशय बुद्धिमान मोठ्या पदावर असतांना देखील साधे सरळ राहणीमान आणि उच्च विचारांच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या श्रीमान श्रावण हर्डीकर यांचे सासरे आहेत. जोगळेकरांनी तेवढीच सरळमार्गी कन्या अदिती, श्रावण यांची पत्नी आहे. एखादा अतुलनीय विचारांचा करप्ट पत्रकार असता आणि तेवढाच बदमाश जावई असता तर दोघांनी मिळून हजारो कोटी आजपर्यंत कमावले असते पण मला नाही वाटत कि मी श्रावण हर्डीकर यांचा सासरा आहे, अशी ओळख जोगळेकर कोठेही करून देत असावेत. जोगळेकर आजही ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंद यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यात स्वतःला व्यस्त ठेवतात मला वाटते या देशातल्या प्रत्येक हिंदूला जोगळेकर होण्याची गरज आहे….
डोंबिवलीत श्रीयुत उदय आपटे यांच्याकडे गप्पांच्या ओघात मला जमलेले सारेच म्हणाले की मिस्टर जोशी अलीकडे विशेषतः मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या हिंदूंची घडी विस्कटविण्यात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून मोठा सहभाग व पुढाकार आहे त्यांच्यावर टीका न करता वरून तुम्ही उद्धव यांची जी सतत बाजू घेता किंवा त्यांचे कायम कौतुक करता आम्हा समस्त वाचकांना ते अजिबात आवडत नाही त्यावर मी म्हणालो, माणूस एखाद्या निर्णयात चुकला म्हणजे तो अति वाईट असे लगेच उद्धव यांच्याविषयी मत बनवून तुम्ही समस्त मराठी मोकळे होऊ नका कारण उद्धव हे कसे व किती चतुर व कठोर राजकारणी व नेते हे मी त्यांना जवळून ओळखतो बघत आलो आहे, लवकरच त्यांना केलेल्या चुका नक्की लक्षात येतील किंवा आल्याही असतील आणि ते शंभर टक्के हिंदूंच्या मराठीच्या हिताचा निर्णय घेऊन मोकळे होतील. मलाही ते दिसते आहे कि आज जे काय उद्धव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठ्या खुबीने मुस्लिम नेते व मंत्री आपल्या समाजाचे भले करवून घेताहेत ते नक्की खूप धोकादायक आहे पण बदल घडतील उद्धव घडवून आणतील अशी त्यांच्या कडून अपेक्षा ठेवूया. विशेषतः ठाकरे यांच्या महाआघाडीने मुस्लिम वक्फ बोर्डाच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना 2500 वरून महिन्याला थेट 255000 करण्याचा ठराव म्हणे पास केलेला आहे विशेष म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात काँग्रेस पेक्षा या राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे हि वाढ मागील तारखेपासून लागू होणार असल्याने शासनाला वक्फ बोर्डाला तब्बल एक कोटी रुपयांचा फरक मोजावा लागणार आहे. विशेष म्हणजे मंत्री नवाब मलिक हे इतरही मुस्लिम मिळकतीच्या भाडेवाढीचा लवकरच तसा ठराव उद्धव ठाकरे यांच्याकडून पास करवून घेणार आहेत आणि अशा तब्बल सहा लाख मिळकती आहेत. या मिळकती या मालमत्ता मुस्लिमांच्या ताब्यात कशा आल्या कोणी दिल्या त्यावर जनाब अंतुलेंपासून तर आजतागायत चौकशा झाल्यास समस्त हिंदूंचे डोळे पांढरे होतील. सरकारने मुस्लिमांना या जमिनी तर दिल्याचं पण त्या जमिनींचे भाडे देखील सरकारी तिजोरीतून भरले जाते आहे आणि आम्ही झोपलो आहोत वरून उद्धवजी त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सरकार हाकताहेत जे काय चालले आहे ते समस्त हिंदूंसाठी विदारक असे आहे….
अपूर्ण : हेमंत जोशी