ईश्य ! होते फजिती व गोची तरी मैत्री जिवाभावाची !!
—पत्रकार हेमंत जोशी
ज्यांचे पाय जमिनीवर असतात राहतात म्हणजे ज्यांची मैत्री कायम भूमीशी ते आयुष्यभर सुखी आनंदी राहतात किंवा संकटात अडचणीत ते डगमगून जात नाहीत पण ज्यांच्याकडे अचानक सत्ता पैसा चालून आल्यानंतर जे हवेत उडायला लागतात म्हणजे भूमीशी नाते तोडून सोडून वागतात त्यांचा वर्तमान नक्की चांगला असतो पण भविष्यकाळ अशांचा बदलायला बिघडायला फारसा वेळ लागत नाही. काही वामार्गाने झटपट पैसे मिळवून झालेले नवश्रीमंत चुकीच्या लोकांशी मैत्री करताना अजिबात डगमगत नाहीत आणि स्वतःचे फार मोठे नुकसान ते करवून घेतात पण ज्यांना त्यांच्या नशिबाने चांगले मित्र उत्तम सहकारी मिळतात त्यांना खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणता येईल. अमरावतीच्या यशोमती ठाकूर या महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री या महाआघाडीच्या आहेत आणि जे या महाआघाडीत मंत्री होण्याआधी भ्रष्टाचार विरोधी बड्या गप्पा मारायचे ते नेमके या मंत्री मंडळात न भूतो न भविष्यती पद्धतीने भ्रष्टाचार करून मोकळे होताहेत, काही कधीच बिघडलेले बरबटलेले होते काहींना त्यांच्या या तथाकथित मित्रांनी नंतर लगेच बारबाटविले बिघडवले. सुनील तटकरे मुलीच्या बाबतीत किंवा स्वतः देखील एक खासदार म्हसणून यावेळी बऱ्यापैकी सावध झालेले दिसतात कारण गेली अनेक वर्षे त्यांचे बरे वाईट व्यवहार जो राजेश जोशी नावाचा वादग्रस्त तरुण सांभाळायचा त्या राजेश जोशी यास सुनील तटकरे यांनी यावेळी कायमचे दूर केले आहे त्यामुळे तटकरे यांच्या नरिमन पॉईंट कार्यालयाची पूर्वी राजेश जोशी जी जबाबदारी सांभाळायचा त्याऐवजी तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत जातीने आता तटकरे कुटुंबियांचे व्यवहार सांभाळतांना दिसतात. राजेश जोशी याने आता या परिसरात स्वतःचे स्वतंत्र कार्यालय थाटले आहे आणि तो तेथे बसून किंवा मंत्रालयात जाऊन नेहमीची दलाली करीत असल्याचे आढळून येते, राहायला मात्र राजेश त्याच्या लोणावळा येथील आलिशान बंगल्यात आहे आणि तेथूनच तो स्वतःच्या महागड्या गाड्यांनी जा ये करतो. सुनील तटकरे यांनी त्याला जवळ घेण्यापूर्वी राजेश जोशी पैशांनी कसा कफल्लक होता त्यावर मी तुम्हाला आणि आयकर खात्याला नेमकी माहिती देऊन मोकळा होणार आहे. आता मात्र त्याच्याकडे पैसा ठेवायला म्हणे जागा नाही. पण तटकरे यांचे थेट आव्हान विशेषतः मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांना असे कि जर राजेश जोशी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून आपले काम काढून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर कृपया सावध असावे कारण आता त्यांचा राजेश जोशी याच्याशी काडीचाही संबंध व व्यवहार नाही…
खासदार सुनील तटकरे यांच्या अगदी विपरीत वातावरण महिला व बालविकास खात्याच्या मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांच्याकडे बघायला मिळते. या खात्याचे काही अतिशय वादग्रस्त कंत्राटदार आहेत त्यापैकी एक जळगावचे प्रशांत माहेश्वरी, मला नेमका काळ वेळ माहित नाही कि माहेश्वरी व ठाकूर या दोघात कधीपासून हे भावा बहिणीचे नाते निर्माण झाले. पण यशोमती अगदी उघड साऱ्यांना सांगतात की त्यांच्या खात्याचे कंत्राटदार प्रशांत माहेश्वरी हे त्यांना धाकट्या सख्य्या भावासारखे असल्याने ते अधिकतर वेळ ठाकूर यांच्या कार्यालयात किंवा बंगल्यावर असतात म्हणजे अनेकदा यशोमती यांचा शेवटचा घोट घेईपर्यंत संपेपर्यंत माहेश्वरी हे ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी ठाण मांडून बसलेले असतात आणि यशोमस्ती यांची अपत्ये देखील मोठ्या अभिमानाने प्रशांत माहेश्वरी यांना मामा अशीच हाक देतात तेच नाते हि मुले प्रशांत माहेश्वरी यांच्याशी जपतात. अर्थात वादग्रस्त खात्यात कंत्राटदार व थेट या खात्याच्या मंत्री यांच्यात भावा बहिणीचे हे अभूतपूर्व नाते निर्माण झाल्याने इतर काही कामे न मिळणाऱ्या कंत्राटदारांची तसेच या खात्याशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची जळफळाट होणे स्वाभाविक आहे त्यातून हि जळणारी मंडळी यशोमती व प्रशांत यांचा सुनील झंवर करण्यात गुंतली असल्याचे माझ्या कानावर आले आहे पण स्वतः प्रशांत माहेश्वरी हे देखील साम दाम दंड व भेद या विद्येत निपुण असल्याने ते स्वतःचा आणि यशोमती ठाकूर यांचा अगदी सहजासहजी छगन भुजबळ करवून घेतील असे दूरदूरपर्यंत वाटत नाही. त्यातून उद्यापासून वादग्रस्त यशोमस्ती ठाकूर यांनी त्यांच्या या नात्याला अगदी आयकर खात्याला जरी आव्हान दिले तरी त्यात निदान मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. हे असेच घट्ट व्यावहारिक नाते मंत्री राजेंद्र शिगणे आणि वादग्रस्त रवी सपकाळ किंवा मंत्री अनिल परब व त्यांचे भ्रष्ट खाजगी सचिव प्रशांत रुमाले किंवा इतर अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात कसे आपापसात निर्माण झाले आहे त्यावर पुढले काही लेख तुम्हाला नक्की अस्वस्थ करून सोडतील…
अपूर्ण : हेमंत जोशी