चढलो लढलो जिंकलो …
—पत्रकार हेमंत जोशी
कधीकाळी शेजारी राहणाऱ्या भिडे आजी मोठ्या शिस्तीच्या आणि टापटीप म्हणजे त्यांना सर्दी किंवा खोकला झाला कि त्या वैद्याकडे न जाता थेट नवर्याच्या खिशातून सिगारेट घ्यायच्या नंतर अगदी शिस्तीत त्या सिगारेट मधली तंबाखू बाहेर काढून त्याजागी ओवा भरायच्या नंतर त्या ज्या पद्धतीने झुरका मारायच्या तेव्हा समोरच्याला थेट देवानंद पण त्यांच्यासमोर फिका वाटायचा. आजही जुलाबाच्या त्रासावर आपण सुंठ बारीक कुटूनपाण्यासोबत घेतो किंवा अधिक दारू ढोसून आलेल्याला काळ्या गुळाचा चहा करून देतो. गावाकडे परवडत नाही म्हणून गावकरी सरकारी दवाखान्यात अगदी रांग लावून फुकटातले कंडोम्स घरी घेउन येतो. उलटी होत असेल तर पाण्यात लवंग उकळून पितो. पॉट साफ नसेल तर हवाबाण हर्डे चोखत बसतो. आजकाल तर अति पादणाऱ्या माणसाच्या ढुंगणाबाहेर लावायला विशिष्ट अत्तरे देखील बाजारात विकत मिळतात. तोंड आल्यावर जायफळाच्या काढ्याने गुळण्या करतो. सिगारेट सुटायची असेल तर शोप तुपात भाजून खातो थोडक्यात प्रत्येक रोगावर उपाय आहेत पण एकच रोग असा आहे ज्यावर अद्याप औषध सापडलेले नाही आणी त्या रोगाचे नाव आहे भ्रष्टाचार. त्यामुळे भ्रष्टाचार नावाच्या या महारोगाशी लढतांना लढणाऱ्या प्रत्येकाची दमछाक होते….
अनिल देशमुखांची अटक अटळ आहे त्यातून त्यांना व त्यांच्या जवळच्या प्रत्येकाला वाचणे नामूमकिन आहे पण अद्याप देशमुख हजर व्हायला तयार नाहीत. आता तर म्हणे ते भारताबाहेर पळाल्याची खबर हाती आलेली आहे. अख्खे पोलीस खाते देशमुखांनी गृहमंत्री नात्याने प्रोत्साहन दिल्याने हाताबाहेर गेले आहे, अगदी बोटावर मोजता येतील एवढे तेथे सध्या चांगले आहेत, भ्रष्टाचारापासून दूर आहेत त्यामुळे अगदी मुंबईत पण हेमंत नगराळे यांची म्हणे बिघडलेल्या पोलीस खात्याला वठणीवर आणतांना फार मोठी दमछाक होते आहे. नगराळे आणि देशमुख दोघेही नागपुरातले पण दोघांच्या आचार विचारातली तफावत बघितली कि वाटते अनिलबाबू नागपुरातल्या गंगा जमाना वृत्तीचे आहेत आणि नगराळे थेट रेशीम बाग विचारांचे सरळमार्गी बडे पोलीस अधिकारी आहेत. तिसरे सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सासुरवाडी देखील विदर्भातली सुदैवाने आपले सध्याचे गृहमंत्री हे त्यांच्या गृहमंत्र्यांना वचकून दचकून नक्की असावेत कारण अनेकदा ते मंत्री होऊन देखील आणि शरद पवार यांचे मानसपुत्र असून देखील त्यांनी स्वतःचा अजितदादा करून घेतलेला नाही, त्यामुळे ते अनेकदा आजारी पडत असतांना देखील सुखी व समाधानी आहेत. दिलीप वळसे पाटलांचे भ्रष्टाचाराबाबत सहावा महिना लागल्यानंतरच्या गर्भार स्त्रीसारखे आहे म्हणजे स्वतः तर लैंगिक आनंद घ्यायचा नाही पण नवऱ्याकडे देखील पाठ करून झोपायचे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासारखे ना खाऊंगा ना खाने दूंगा थोडक्यात त्यांनी स्वतःचा आर आर आबा करून घेतला नाही म्हणजे स्वतः खायचे नाही पण ज्यांनी आबांभोवती वेटोळे केले होते त्या साऱ्यांनीच आबांच्या नावाने इतरांना त्याकाळी लूट लूट लुटले…
चला एकदाची ती लढाई मी जिंकलो ज्यासाठी मी गेले दोन महिने पाठपुरावा घेत लढत होतो त्या संजीव पलांडे यास म्हणजे अनिल देशमुख यांच्या खाजगी सचिवाला अखेर राज्य सरकारला लाज वाटून त्यास सरकारी नोकरीतून निलंबित करण्यात आले. वास्तविक संजीव पलांडे यास सचिव वीर यांनी त्याला अटक झाल्यानंतर पुढल्या 48 तासात नोकरीतून निलंबित करणे कायद्याने ते अत्यावश्यक होते पण आपले कोण काय बिघडवू शकते या मस्तीत या सरकारातले अनेक असल्याने संजीव पलांडे याला निलंबित न कारण्यासाठी अनेक जंग जंग पछाडत होते आणि माझी पलांडे यास निलंबित करण्यासठी सरकार दरबारी लढाई सुरु होती शेवटी त्या लढाईला यश आले आणि मिस्टर भ्रष्टाचारी पलांडे एकदाचे नोकरीतून निलंबित झाले. हाच प्रकार त्या छगन भुजबळ यांच्या गिरगाव चौपाटी समोरील अल जंबेरीया या इमारतींबाबत घडत होता ज्या इमारती मध्ये अलिबागच्या जयंत पाटील यांचा एक अख्खा मजला मालकीचा आहे. अंजली दमानिया लढत होत्या पण त्यांची लढाई कुठेतरी कमी पडत होती मग आयकर खात्यात देखील आम्ही तेथल्या आमच्या मित्रांना विश्वासात घेऊन भुजबळांच्या या बेकायदेशीर इमारतीची फाईल वेगाने फिरायला आग्रह धरला आणि दमानिया जिंकल्या, भुजबळ पुन्हा एकवार अडचणीत आले, संकटात सापडले. यश अपयशाची चिंता न करता अशा अत्यंत माजोरड्या मंडळींविरुद्ध सतत चिकाटीने लढा देणे अत्यावश्यक असते, अपयश आले तरी निराश न होता पुन्हा लढण्यासाठी सज्ज होणे अत्यावश्यक असते. जसे अनिल देशमुख त्यांच्या खाजगी सचिवांमुळे अडचणीत आले नक्की तीच वेळ पुन्हा भुजबळ यांच्यावर देखील त्यांच्या खाजगी सचिवांमुळे येईल असे मला वारंवार वाटत राहते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी