धनुच्या आईला तीन तीन सुना बोला राष्ट्रवादी पुन्हा : पत्रकार हेमंत जोशी
आयुष्यात एखाद्याकडून खूप अपेक्षा असतात त्यातल्या त्याने किमान अपेक्षा पूर्ण कराव्यात वाटत असते पण जर असे घडले नाही तर मोठे नैराश्य येते, माणूस फ्रस्ट्रेट होतो, कावराबावरा होतो मनातून मनापासून अस्वस्थ होतो. माझा एक मित्र होता एकदम शरीफ होता, लग्नाच्या आधी तसला कोणताही अनुभव घ्यायचा नाही म्हणून लग्नाआधी तो साधे डॉक्टर डॉक्टर देखील कधी खेळला नाही, होणाऱ्या बायकोकडून त्याच्याही याच अपेक्षा होत्या कि तीदेखील लग्नाआधी कधीही साधे आई-बाबा आई-बाबा खेळलेली नसावी. यथावकाश त्याचे लग्न झाले, माझ्या या नवख्या अननुभवी मित्राला मधुचंद्राची पहिली रात्र नाही म्हणायला जरा जड जात होती शेवटी रात्री तीन वाजता बायको त्याच्यावर वैतागून म्हणाली, चला व्हा बाजूला, आता मी सांगते तसे करा म्हणजे लगेच जमेल कारण तुमच्या लक्षात आलेच असेल ती त्यात सराईत होती, हा त्याक्षणी तिचे ते असली रूप बघून अवाक झाला सेम तेच माझे यादिवसात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत झाले आहे… ज्यांना मी थोडाफार चालू समजत होतो हे महाशय एकदमच चालू निघाल्याने मला त्या मित्रा सारखे याक्षणी नैराश्य फ्रस्ट्रेशन आले आहे, वाटते अंगावरचे अंडरवेअर सहित कपडे फाडावे आणि रस्त्याने सैरावैरा धावत सुटावे.
मागच्यावेळी पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना तोल सुटून वागत बोलत निर्णय घेत होती, म्हणून धनंजय विरोधात असतांना म्हणजे सत्तेत नसतांना देखील त्यांच्या पाठी एक सामान्य पत्रकार म्हणून मी उभा राहिलो, जेव्हा लिखाणातून सतत सत्तेत असलेल्या पंकजा विरुद्ध प्रखर लिखाण केले त्यादरम्यान खूप धमक्या यायच्या, अगदी जीवे मारण्याच्या देखील धमक्या यायच्या तरीही डगमगलो नाही आणि माझे अंदाज त्यावेळी खरे ठरले, पंकजा यांचे राजकीय वाटोळे झाले आणि धनंजय मंत्री झाले. धनंजय यांच्यात गोपीनाथ यांचे नेतृत्व गुण जसेच्या तसे बघून बरे वाटत होते पण पुढे लगेच वेगळेच काहीतरी घडायला लागले म्हणजे धनंजय यांच्यात गोपीनाथ यांच्या गुणांपेक्षा अवगुणच अधिक भरले असल्याचे लक्षात यायला लागले विशेष म्हणजे जे फोटो आणि लफडी आज तुम्ही बघताहात ते माझ्याकडे ८-९ महिन्यांपूर्वीच आले होते जे मी त्यांना लगेच पाठवले आणि प्रत्यक्ष भेटून सांगितले होते कि ज्या चुका काकांनी केल्या त्या तुम्ही करू नका, काका टिकले पण तुम्हाला संपायला वेळ लागणार नाही विशेष म्हणजे त्यांना मी त्या भेटीत त्यांच्या सभोवताली असलेल्या पाच अतिशय बदमाश बदनाम भामट्या मंडळींची नावे सांगितली होती, त्यातला एक अतिशय नीच थर्डग्रेड सतत तोडपण्या करून करोडो रुपयांचा दर्डा सॉरी दरोडा टाकणाऱ्या टाकणाऱ्या पत्रकाराचे देखील नाव सांगितले होते, नंतर कोरोना युग सुरु झाले माझे काहीसे दुर्लक्ष झाले त्यांच्या त्या पाच लोकांना हाताशी धरून भानगडी सुरूच होत्या आणि आजच उद्याचे नक्की होऊ घातलेले मुख्यमंत्री माझे अतिशय लाडके तरुण नेते धनंजय मुंडे असे बदनाम झाले भानगडीत अडकले, यापुढे लगेच या साऱ्या विकृत लैंगिक आणि आर्थिक देखील कदाचित भानगडीतुन धनंजय लगेच बाहेर पडणे नक्की शक्य नाही कारण पुढल्या त्यांच्या बाहेर पडू शकणार्या नवनव्या भानगडीची यादी आजच त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्या कट्टर विरोधकांजवळ तयार आहे जी यादी मला देखील नेमकी माहित आहे.
मनापासून वाईट वाटते एक अत्यंत धडाकेबाज लोकमान्य जनमान्य तरुण तडफदार नेतृत्व हे असे वाईट संगतीमुळे व सवयीमुळे वाया जाऊ शकते, धनंजय यांनी आता तरी सावध व्हावे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात जेव्हा धनंजय उघडे पडले अडचणीत आले असतांना त्यांच्या या चुकांचा मोठा फायदा खुद्द पंकजा मुंडे यांना नक्की उचलता आला असता, त्या जर न्यायालयात गेल्या असत्या तर कदाचित धनंजय यांची आमदारकी रद्द होऊन पराभूत झालेल्या पंकजा यांना उरलेली चार वर्षे आमदार म्हणून काम करता आले असते पण त्या या प्रकारावर एकही अवाक्षर बोलल्या नाहीत याउलट धनंजय यांचा तो वैयक्तिक मामला आहे मला त्यात पडायचे नाही वरून त्या असेही यासाठी म्हणाल्या असाव्यात कि एकनाथ खडसे यांच्यानंतर शरद पवार यांच्या गळाला त्या लागलेल्या असाव्यात त्यामुळे विरोधात न बोलण्याची त्यांना जयंत पाटील किंवा थेट शरद पवार यांच्याकडून तशी सूचना असावी. असेही नक्की घडू शकते कि ज्या अजित पवार समर्थक धनंजय मुंडे यांना पक्षातल्या मोठ्या नेतृत्वाने शर्मा किंवा इतर भानगडीतुन अडचणीत आणले आहे त्याला वैतागून हेच धनंजय उद्या भाजपावासी झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये म्हणजे हे तर असे होईल कि ईधर का माल उधार और उधर का माल ईधर आणि तेच घडण्याची मोठी शक्यता असावी त्यातून ज्या भाजपा नेतृत्वाकडून धनंजय यांच्यावर तोंडसुख घेण्याची आपली साऱ्यांची इच्छा होती ते गप्प आहेत त्यामुळे धनंजय यांचे पक्षांतर होऊ शकते, माझ्या या माहितीला नक्की अर्थ आहे, बेस आहे आणि तेच बेस्ट आहे…
क्रमश: हेमंत जोशी