मीडिया : कोण बढिया कोण घटिया : भाग २
–पत्रकार हेमंत जोशी
लोकमत दैनिकात बालाजी मूळे आणि शैलेश चांदीवाल या दोघांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून बढती मिळाल्याच्या त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बातम्या अलीकडे सोशल मीडियावर वाचण्यात आल्या. अतुल कुलकर्णी आणि यदु जोशी या दोन्ही मंत्रालयीन प्रतिनिधींना गेली २५ वर्षे मी लोकमत मध्ये साधे रिपोर्टींग करतानाच बघतो, त्यांना प्रमोशन कधी किंवा त्यांचेही काही पोलीस अधिकाऱ्यांसारखेच का कि आवडीचे पोस्टिंग द्या म्हणजे तुमचे ते प्रमोशन पण नको आणि पगार देखील नको किंवा अतुल सारखे तर दर्डा यांना सांगत असतील किंवा करूनही दाखवत असतील कि तुम्ही मला कसला पगार देता अजिबात देऊ नका मीच तुम्हाला वरून इतर काहींचे पगार होतील अशी व्यवस्था करून देतो अर्थात हि जबाबदारी यदु जोशी पण पार पाडतो का त्यावर पुन्हा कधीतरी. पण अतुल आणि यदु त्यातल्या त्यात यदु बरा, अतुल त्याच्या मालकाच्या वरदहस्तामुळे खूपच निर्ढावलेला. अर्थात मुंबईतले काही दैनिक असे आहेत कि जेथे नोकरी करतांना वार्ताहरांना पगाराची अपेक्षा नसते याउलट वरून त्यांनाच महिन्याकाठी मालकांना रसद पोहोचवावी लागते त्यावर आमचे दिवंगत मित्र पत्रकार सदानंद शिंदे छान छान पुरावे मला रंगवून सांगायचे. बोटावर मोजण्याएवढे काही मात्र त्या लोकमत मध्ये काम करीत असूनही त्यांची पत्रकारिता कौतुक करण्यासारखी म्हणजे माझा लाडका विजय बाविस्कर मला आठवतो तेव्हापासुन तेथे सम्पादक म्हणूनच मी बघत आलेलो आहे कदाचित त्याला केवळ पत्रकारितेत रमायचे असेल म्हणून त्याचा मधुकर भावे किंवा अतुल कुलकर्णी झाला नाही म्हणजे विविध वृत्तपत्रातले भावे कुलकर्णी वृत्तीचे पत्रकार मालकांना सांगत असतील कि भले उद्या आम्हाला तुमच्या वृत्तपत्राचे मालक करा संपादक करा काहीही करा पण आमच्या हातून मंत्रालय प्रतिनिधी हा शिक्का कधीही काढून घेऊ नका ज्यात तुमचा आमचा दोघांनाही फायदाच फायदा…
अर्थात मूठभर भ्रष्ट पत्रकार म्हणजे अख्खी मीडिया नव्हे येथे काही खूप चांगले आहेत म्हणून मीडियाचे महत्व कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस वाढत आहे आणि असे कोणतेही क्षेत्र या राज्यात नाही जेथे भ्रष्टाचार बोकाळलेला नाही त्याचा गैरफायदा मीडियातले बहुसंख्य घेत आले आहेत तो भाग वेगळा. एक मात्र नक्की आहे कि इतरांना सतत ज्ञानाचे डोस पाजणारी मीडिया स्वतः मात्र अत्यंत मोठ्या प्रमाणात वाईट आहे भ्रष्ट आहे आणि भ्रष्टाचार हाच मीडियात शिष्टाचार आहे. अर्थात आपल्या राज्याचे तर ते वैशिष्ट्य आहे कि बाप मुलाला सांगतो कि वेश्या गमन करणे वाईट आहे आणि संध्याकाळ झाली कि हाच बाप न चुकता लेडीज बार मध्ये जाऊन बसतो, म्हणून मी कायम तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे कि ज्ञानाचे डोस पाजणारे आधी नीट निरखून पारखून घ्या नंतरच त्यांना गुरुस्थानी मानून मोकळे व्हा कारण आपल्या या राज्यात जेथे आमटे यांच्या घरी देखील वाट्यावरुन आत्महत्या होतात तेथे इतर किती वाईट असतील कल्पना करा. विशेषतः मीडियाशी संबंधित सत्तेतल्या मंडळींना हात जोडून विनंती कि ज्यांचे पॉट खरोखरी केवळ वेतनावर अवलंबून आहे असते निदान त्यांना त्यांच्या कठीण प्रसंगात कठीण दिवसात मनापासून सहकार्य करा म्हणजे त्यांच्यातली हिम्मत खचणार नाही ते पुन्हा पूर्वीसारखे उठून उभे राहतील. ज्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दिवसभरातल्या विविध घडामोडी बघायच्या वाचायच्या ऐकायच्या असतात त्याच मीडिया पर्सनवर अमुक एखादे संकट कोसळले कि सरकारसहित तुम्ही सारे ज्यापद्धतीने हात झटकून मोकळे होता बघतांना मला वाटते आमच्यातल्या प्रामाणिक मीडियाची अवस्था तर थेट सरकारने आणि इतर साऱ्यांनीच केवळ वेश्येसारखी करून ठेवलेली आहे म्हणजे जोपर्यंत वेश्या अमुक एखाद्या ग्राहकाला अंगावर घेऊन सेक्स करतांना बायकोसारखी ट्रीटमेंट देते त्याच वेश्येला आत्मा शांत होताच ग्राहक ज्यापद्धतीने पुढल्या क्षणी अजिबात ओळख न देता निघून जाते तेच आमच्यातल्या प्रामाणिक मंडळींच्या बाबतीत कायम घडत आलेले आहे थोडक्यात सरकार असो किंवा मालक, वरून टाळ्या वाजविताना दिसतात…
संकट मग ते कोणावर देखील आले कि अशावेळी तुम्हा सर्वांना सर्वात आधी अगदी प्रसंगी पोलिसांच्या देखील आधी आठवण येते होते ती आम्हा समस्त मीडियाची अशावेळी आप्तग्रस्तांना न्याय केवळ मीडिया मिळवून देऊ शकते याची तुम्हा सर्वांना पुरेपूर खात्री असते आणि त्यात आम्ही कायम पास होत आलो आहोत पण तेच संकट स्वतः मीडियावर तेथे त्यात काम करणाऱ्यांवर कोसळले कि सारे हात झटकून ज्यापद्धतीने मोकळे होतात बघून काळजाचा थरकाप उडतो. तुमच्या प्रत्येक संकट काळात किंवा कोणत्याही दुर्घटनेत आम्हा मीडियाची सर्वांना गरज असते पण त्याच मीडियावर संकट कोसळल्यानंतर अशी फारशी कोणतीही व्यवस्था नाही ज्या भरवशावर अमुक एखादा मीडिया पर्सन संकटातून हसत खेळत बाहेर पडेल. प्रत्येक लढ्यात आम्ही मीडिया पुढे पण आमच्यावर संकट कोसल्यानंतर आमच्यातल्या सरळमार्गी स्वच्छ माणसाच्या मागे एकही माणूस उभा नसतो हि फार मोठी खंत आमच्यातल्या प्रामाणिक मंडळींना आहे. सत्ताधीशांनी जनतेने आमच्यातले प्रामाणिक हुडकून काढावेत, निदान त्यांच्या कठीण काळात पाठीशी उभे राहावे एवढी हात जोडून विनंती…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी