सेक्स समाज आणि सावधानता!
— पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे अभिनेता सिद्धार्थ शुक्ल गेला त्यावर समाज माध्यमांनी भारतीयांनी केवढा म्हणून रडून रडून आकांत केलापण तो का गेला कसा गेला केवळ औषधे घेतली म्हणून गेला कि ड्रग्सच्या अतिसेवनामुळे गेला त्यावर नेमके कारण जाणून न घेता आपण भारतीय उगाचच केवळ आकर्षणातून या अशा तद्दन फाल्तुक नट नटयांकडे विनाकारण आकर्षित होतो. त्यांचा अभिनय बघून स्क्रीन समोरून बाजूला झाल्यानंतर वास्तविक सिनेमावाल्यांना लगेच विसरून जायचे असते पण तसे न करता या अशा असंख्य बहुसंख्य लोफर व्यसनाधीन सिनेमावाल्यांकडे भारतीय आकर्षित होतात आणि त्यांना साक्षात देव मानून मोकळे होतात. अर्थात आम्ही या मंडळींना अतिशय जवळून बघतो म्हणून कदाचित त्यांच्याकडे आम्ही पाठ फिरवून मोकळे होत असतो. उगाचच या व्यसनी ऐय्याशी मंडळींना तुम्ही देखील फार महत्व देऊ नका. सतत ड्रग्सच्या अमलाखाली असणारे जर तुमच्या आयुष्यातले आदर्श किंवा हिरो असतील तर तुमच्यासारखे अडाणी तुम्हीच. मला त्या सिद्धार्थ शुक्ला विषयी एकही क्षण तो गेल्यानंतर वाईट वाटले नाही कारण तुमच्या लक्षात आलेच असेल. असे अनेक तरुण किंवा तरुणी आहेत ज्यांना सिनेमात काम करण्याची आवड असते त्यातून ते मुंबईत वेगवेगळ्या एजन्सीजकडे नाव नोंदवून मोकळे होतात त्यानंतर या एजन्सीज कडून देखण्या तरुणींना किंवा आडदांड तरुणांना फोन येतात कि अमुक एका ठिकाणी काम मिळण्याची करण्याची तुम्हाला संधी आहे पैसे चांगले मिळतील पण कॉम्प्रमाइज करण्याची म्हणजे सेक्स करू देण्याची तुमची तयारी असावी. नावे नोंदविणारे स्ट्रग्लर्स असल्याने त्यातले अनेक होकार कळवितात आणि आपल्या आयुष्याचे पुढे वाटोळे करून घेतात…
सिनेमात नाटकात सिरियल्स किंवा अन्यत्र अभिनय करण्याच्या इराद्याने तुमची मुले व मुली नेमकी कोणाच्या संपर्कात आहेत त्यावर बारीक नजर ठेवा कारण अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पुढे यशस्वी होण्यासाठी फार मोठी किंमत जवळपास सर्वांनाच मोजवी लागते याचे भान ठेवा. ज्या एजन्सी मध्ये तरुणी नावे नोंदवतात तेथून शंभर टक्के कॉम्प्रमाइज करणार का अशी विचारणा केली जाते समजा तुम्ही नाही म्हटले तर तुमचा फोन लगेच यासाठी ब्लॉक केल्या जातो कारण त्यांना तुम्ही पोलिसात तक्रार करण्याची भीती असते. असे कितीतरी राज कुंद्रा या मुंबई आणि पुण्यात आहेत सावध असावे. सेक्सची विकृती महा भयानक व भयावह आहे असते. माझ्या एका मैत्रणीची आई दिसायला सुंदर आहे. हि मैत्रीण एक दिवस अतिशय अस्वस्थ मनाने माझ्याकडे येऊन म्हणाली कि मला अचानक एक मोठे गुपित कळले आहे कि मी माझ्या आईला वडिलांपासून नव्हे तर माझ्या काकांपासून झाले आहे. तिला मग समजावून सांगितले कि असे अस्वस्थ होऊन तुझे मनस्वास्थ्य बिघडेल आणि बाहेर त्यातून तुझीच बदनामी होईल. तुझे वडील तुझ्या सांगण्यातून व्यसनी होते बाहेरख्याली होते त्यातून आईला घरखर्च करणे देखील अवघड होऊन बसला होता तुझ्या काकांनी तिला त्यावेळी सहकार्य केले शिवाय ते दिसायला हँडसम होते त्यातून हि चूक तुझ्या आई व काकांकडून घडली. चुकीला माफी नाही पण आता त्या घटनेला अनेक वर्षे उलटली आहेत तुझे काका देखील आता तुमच्यापासून खूप दूर आहेत तेव्हा हे गुपित अस्वस्थ होऊन न फोडणे अधिक चांगले कारण त्यातून तुझ्याही आयुष्यावर विपरीत परिणाम होतील. तिने माझे ऐकले त्यानंतर तिचे छान ठिकाणी लग्न झाले आता ती सुखी आहे…
जवळपास ज्याला त्याला सेक्सच्या विकृतीने पछाडलेले असते त्यातून दरदिवशी अनेक कुटुंबातून अशा चित्र विचित्र समस्या निर्माण होतात त्यावर वास्तविक योग्य तोडगा काढून निराकरण करण्याचे सोडून अशा अडचणीत सापडलेल्या विशेषतः स्त्रियांचा गैरफायदा उकळणारेच बहुसंख्य असल्याने स्त्रियांची मोठी कोंडी होते. फार पूर्वीचा एक प्रसंग मला आठवला. माझ्या ओळखीच्या कुटुंबातली एक तरुणी अत्यंत अत्यंत देखणी असूनही लग्नास होकार देत नव्हती म्हणून तिची मोठी बहीण माझी ती मैत्रीण तीला माझ्याकडे घेऊन आली. मी मैत्रिणीला बाहेर बसायला सांगितले आणि या तरुणीला जेव्हा विश्वासात घेतले तेव्हा तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग ऐकून मी हादरून गेलो कारण तिचा सख्खा भाऊच तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून मोकळा होत असे. मी तिला विश्वासात घेतले त्यांनतर तिला आम्ही परदेशातले उत्तम स्थळ शोधून आणले आता ती सुखी आहे तिला मोठी दोन मुले आहेत त्यानंतर ती कधीही माहेरी आली नाही आई वडील आणि बहीण अनेकदा तिला भेटून येतात ती सुखी आहे. असे म्हणतात कि तरुण स्त्रीने एकांतात वडिलांच्या देखील सान्निध्यात राहू नये असे ऐकले म्हणजे हे वाक्य मनाला पटते. लैंगिक विकृतीने पछाडलेला आपला हा देश, तरुण स्त्रियांनी कायम सावध असावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी