भाग २ : सूड नव्हे शिस्त राहा आश्वस्त
–पत्रकार हेमंत जोशी
सिनेमातला दुष्टांचा कर्दनकाळ आपला हिरो असतो असा कर्दनकाळ सामन्यांना अगदी मनापासून आवडत असतो, असा कर्दनकाळ हिरो प्रसंगी विजय अरोडा असो अथवा प्रदीपकुमार किंवा सामान्य वकुबीचा लक्ष्मीकांत बेर्डे किंवा असामान्य अमिताभ बच्चन, प्रत्यक्षात जे बघणे किंवा करणे सर्वसामान्यांना शक्य नसते ते पडद्यावर दिसते म्हणून भारतीय सामान्य प्रेक्षक अशा हिरोंवर फिदा असतो अभिनयात अगदी सामान्य सुमार दर्जा असलेला दीपक पराशर देखील आम्हाला आवडून जातो. मी जे नेहमी सांगतो तेच पुन्हा येथे रिपीट करतो कि आम्हा मूठभर सच्च्या पत्रकारांचा कोणीही नेता नसतो किंवा आमचा कुठलाही राजकीय पक्ष नसतो आम्ही केवळ एखाद्या गाव न्हाव्याच्या भूमिकेत असतो एखाद्याची हजामत करतांना न्हावी जसा जात किंवा श्रीमंती इत्यादी बघत नाही तेच सच्च्या मीडियाला करावे लागते म्हणजे चांगल्याला चांगले म्हणतो आम्ही तर बदमाशांना तेथल्या तेथे शब्दातून ठेचूनही काढतो. बदमाशांच्या अंगावर थेट धावून जातो म्हणून खेडूत बच्चू कडू नावाचा गावरान राज्यमंत्री देखील राज्यातल्या सामान्यांना याचसाठी आवडतो कि तो एखाद्या सिने हिरोसारखा बदमाशांच्या अंगावर तुटून पडतो पण उद्या हाच बच्चू कडू जर इतरांसारखा श्रीमंतीच्या मागे धावला तर सर्वसामान्य त्याचा देखील अमिताभ नंतरचा राजेश खन्ना करून मोकळे होतील. राजातले देशातले मूठभर काही काळे व्यापारी पुढारी मंत्री सरकारी अधिकारी मीडिया दलाल इत्यादी बघता बघता ज्या वेगाने केवळ सत्ता हाती असते म्हणून नवश्रीमंत होतात ते बघून सामान्य माणसाच्या तळपायाची आग कायम मस्तकात पोहोचत असते आणि देशातल्या राज्यातल्या बदमाश बदनाम श्रीमंतांना वठणीवर आणण्यासाठी पुढे सरसावला म्हणून आपला पंतप्रधान देशातल्या प्रत्येकचा हिरो ठरला आणि येथे या राज्यात देवेंद्र फडणवीस…
मित्रांनो हि तर केवळ सुरुवात आहे आणि पुढल्या अनेक वर्षांचा प्लान त्या हिरोजवळ त्या दुष्टांच्या कर्दनकाळाजवळ तयार आहे, मोदी यांनी फक्त दीर्घकाळ जगावे ते या राष्ट्राचा आदर्शवाद शंभर टक्के आणून सोडतील. तुम्ही सर्वसामान्य तर सत्ता पिपासुंपासून खूप दूर असता आम्ही मीडिया त्यांना चोवीस तास अगदी जवळून अनुभवतो बघतो त्यातल्या प्रत्येकाची पैसे खाण्याची जर तुम्हाला नेमकी पद्धत सांगितली तर महाराष्ट्रात सुरु असलेले जातीपातीचे राजकारण तुम्ही एका क्षणात बाजूला ठेवून या मंडळींवर तुटून पडाल आणि गंगाजल मध्ये खलनायक मोहन जोशी यांच्यावर जशी पब्लिक तुटून पडते तसे तुम्ही या थर्ड ग्रेड मंडळींवर तुटून पडाल. नरेंद्र मोदी यांनी देशातला राज्यातला भ्रष्टाचार निपटून काढतांना कोणतेही राजकारण केलेले नाही त्यांनी या राज्यातल्या त्यांच्या भाजपा नेत्यांना देखील सोडलेले नाही पुढेही सोडणार नाहीत मी येथे ठाऊक असतांना देखील सांगणार नाही पण एक गुपित सांगतो कि गेली काही वर्षे राज्यातल्या भाजपामधले काही प्रवक्ते विधान परिषदेवर जाण्यासाठी प्रचंड उत्सुक होते पण त्यांना दिलेल्या अधिकाराचा या अशा प्रवक्त्यांनी राज्यातल्या काही भाजपा नेत्यांनी श्रीमंत होण्याकडे मोर्चा वळविला त्यातून गांड आपटून आपटून देखील हे भाजपा मधले असे काही भ्रष्ट नेते किंवा प्रवक्ते इत्यादींना मोदी असोत कि फडणवीस त्यांनी आमदार होऊ दिलेले नाही इतकेच काय एकनाथ खडसे यांच्यासारखा अति बलाढ्य नेता असो कि पंकजा मुंडे यांच्यासारखी सतत आदळआपट करणारी एखादी लोकमान्य नेता किंवा खडसे मुंडे तावडे यांच्यासारखे असे कितीतरी, जर पैसे खाण्यात एखादा अतिरेक करीत असेल किंवा चारित्र्य चांगले ठेवत नसेल तर भलेही सत्ता येणार नाही पण नरेंद्र मोदी अशा मंडळींना वठणीवर आणल्याशिवाय राहत नाही जरी हे असे भाजपा मधले सर्वसामान्यांचे नेते असले तरी. आणखी येथे आज अत्यंत महत्वाचे सिक्रेट ओपन करतो ते म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून सीबीआय, ईडी, आयकर खाते इत्यादी महत्वाच्या सरकारी यंत्रणा आपल्या या राज्यातल्या विशेषतः शासकीय व प्रशासकीय पण अति भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित जाधव यांच्यासारख्या दलालांच्या मालमत्तेची नेमकी माहिती आणि या अधिकाऱ्याचे व दलालांचे आर्थिक हितसंबंध कोणाकोणाशी त्यावर कसून माहिती घेत आहेत ज्यात त्यांनी अमूक एखाद्या अधिकाऱ्याची दलालांची माहिती घेताना कमालीची गुप्तता पाळलेली आहे अत्यंत महत्वाचे म्हणजे अशा टॉपमोस्ट २४ बदमाश अधिकाऱ्यांची व त्यांच्याशी संबंधित दलालांची चौकशी कोणत्याही क्षणी सुरु होईल विशेष म्हणजे त्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याची व त्या जाधव आडनावाच्या दलालाची यापूर्वीच चौकशी सुरु झलेली आहे जे गेले कित्येक वर्षे राज्यातल्या भाजपा नेत्यांना अतिशय जवळचे होते, जर या अशा दलालाला अधिकाऱ्याला केंद्र सरकार सोडत नाही तर इतरांचा तेथे कोणता सवाल ? एक प्रार्थना करा ती नरेंद्र मोदी यांच्यासाठी कि ते आणखी किमान पुढली दहा वर्षें तब्बेतीने ठणठणीत राहावे म्हणजे तुमच्या माझ्या स्वप्नातला स्वच्छ भारत करूनच ते मोकळे होतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी