सूड नव्हे शिस्त राहा आश्वस्त नसावी बेशिस्त
–पत्रकार हेमंत जोशी
इकडे तिकडे आता बघू नका डोळ्यात तेल घालून पुढले वाचा अर्थात पुढले लिखाण वाचून आधी अवाक व्हा नंतर स्वभोवताली गिरक्या घेऊन नाचा. भारतीय हवामान खात्यासारखे उगाच अंदाज बांधून माझ्या पुढल्या लिखाणाला लक्ष्य करू नका लक्ष देऊन वाचा नंतरच नाचा. विशेषतः पाश्चिमात्य देशातून मी बघितलंय कि त्यांच्या हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज अचूक व तंतोतंत असतात ठरतात म्हणजे त्यांनी वर्तविले कि ९ वाजून पाच मिनिटांनी पाऊस पडेल म्हणजे तो त्याचवेळी नक्की पडतो, आपल्याकडे मात्र सारेकाही अंदाजपंछी घडते म्हणजे आज काय तर जन्माष्टमी लगेच सांगितले जाते कि आज पाऊस पडेल उद्या काय तर मोठी एकादशी कि पटकन सांगितल्या जाते पाऊस जोराचा पडेल कधी भेंडवळकर सान्गतात म्हणून तर कधी मेघ दाटून आले म्हणून असे अंदाजे हवामानाचे अंदाज मला वाटते वर्तविले जात असावेत तेच महाराष्ट्राच्या राजकारणातले म्हणजे प्रत्येक भारतीय आणि मराठी माणूस देखील राजकारण सेक्स व सिनेमा या तिन्ही विषयांवर आपापल्या ज्ञानानुसार इतरांसमोर स्वतःचे ज्ञान पाजळत असतात जे अत्यंत उथळ आणि पोरकट असते केवळ इतरांचे थोडे थोडे ऐकून जो तो सेक्स सिनेमा व राजकारणाविषयी आपले ज्ञान कि अज्ञान वाटून मोकळा होतो कारण आम्ही भारतीय कमालीचे आळशी त्यामुळे अमुक एखाद्या विषयावर वाचन अभ्यास नको फक्त इकडचे तिकडचे ऐकून इतरांना विनाकारण बोअर करून मोकळे व्हायचे त्यातून लोकांची मने कलुषित करून मोकळे व्हायचे….
अगदी अलीकडे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बुजुर्ग नेत्याशी स्वयंसेवकाशी चर्चा केली त्यांनीही नेमके तेच सांगितले कि फार कमी लोकांना अगदी काहीच संघ स्वयंसेवकांना देखील संघ नेमका कळलेला आहे टीका करणारे तर विनाकारण वाट्टेल ते बोलून लिहून मोकळे होतात विनाकारण गैरसमज पसरविण्यात विकृत आनंद घेतात. मी म्हणालो तेच खरे आहे कि जेथे आपले विचार संपतात तेथून पुढे संघाचे विचार सुरु होतात आणि संघातून जे भाजपामध्ये येऊन काम करतात त्या नेत्यांची देखील काम करण्याची नेमकी तीच पद्धत आहे जी मला विशेषतः देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या दोघात शंभर टक्के आढळली. एक येथे नक्की सांगतो कि या पंचवार्षिक योजनेत देवेंद्र सत्तेत नसल्याने फार मोठा भ्रष्टाचार तर बोकाळला आहेच पण आपला महाराष्ट्र किमान पंचवीस वर्षे महाघाडी सरकारने मागे आणून ठेवला आहे वरून जातीयवादाने फार मोठे तोंड वर काढले आहे ते वेगळेच. अत्यंत महत्वाचे म्हणजे जरी आपल्या या देशात किंवा आपल्या या राज्यात भाजपाने नेत्यांची काही प्रमाणात आयात केलेली असली तरी सत्तेच्या पदाच्या महत्वाच्या नाड्या संघ निर्मित भाजपा नेते कधीही बाहेरच्या नेत्यांच्या हाती सोपवून मोकळे होणार नाहीत त्यांचे ते नक्की ठरलेले आहे. ज्यांना राजकारणात उतरायचे असेल विशेषतः हिंदुत्व हा जर त्यांचा अजेंडा असेल तर त्यांतल्या व्यक्तीने सुरुवात संघ स्वयंसेवक म्हणून करावी नंतरच संघाच्या इतर फांद्यांमध्ये प्रवेश घ्यावा….
महाआघाडीतला जो तो किंवा एखादा फाल्तुक नेता उठतो आणि म्हणतो कि भाजपा सुडाचे राजकारण करतो आहे त्यातून आमच्यावर ईडी सीबीआय इत्यादी कडून छापेमारी सुरु आहे पुन्हा तेच कि या अशा बोलणाऱ्यांना संघ आणि त्यातून जन्मलेला भाजपा समजलेला नाही ज्याचे मला राहून राहून वाईट वाटते विशेषतः राज्यातल्या महाआघाडी सरकारने व्यवहारात शिस्त आणि काही तत्वे राज्य चालवितांना आखून घेतली असती तर त्यांच्यावर हि वाईट वेळ नक्की आलीच नसती. केवळ ओरबाडण्या लुटण्या हि महाआघाडी आहे हे जे महाआघाडीशी संबंधित दलालांनी नेत्यांनी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी मीडिया इत्यादी सर्वांनी ठरवून सतत डाके टाकणे सुरु ठेवले आहे त्यावर वचक आणायची हीच योग्य अशी वेळ होती ज्याची सुरुवात केंद्र सरकारने केवळ आपल्या या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सुरु केली आहे अगदी जेथे भाजपाची सत्ता आहे तेथे देखील जे सत्ता राबवितांना अंदाधुंद आहेत त्यांना नरेंद्र मोदी इंगा दाखवून मोकळे होताहेत हे लक्षात घ्या. अगदी अलीकडे अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर म्हणजे सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे याच्यावर जी ईडीने धाड घातलेली आहे त्यात शाह, पोपट खरमाटे आणि राज्यातला एक बडा पत्रकार कममंत्रालयातला फार मोठा दलाल देखील नक्की अडकणार आहे तसे पुरावे ईडीच्या हाती आल्याची माझी मोठी माहिती आहे किंबहुना तशी वेळ आल्यास माझ्याकडे असलेले या तिघांचे भरभक्कम पुरावे मी ईडीला देतांना नक्की कचरणार नाही…
क्रमश: हेमंत जोशी