अबब ! अभिनेत्याच्या सुकन्येचा आंतरधर्मीय विवाह
–पत्रकार हेमंत जोशी
काही क्षण राजकारण गेलं चुलीत, येथे अगदी वेगळ्या विषयवार लिहून काढायचे आहे पण मला हेही माहित आहे कि नारायण राणे प्रकरणावर तुम्हाला माझ्याकडून नेमके काय घडले आणि काय घडेल हे जाणून घ्यायचे आहे. जरा थांबा त्यावर देखील नेमकी माहिती तुम्हासमोर मांडेल. पण भाजपा आणि शिवसेना किंवा शिवसेना आणि नारायण राणे या वादावादीत आणि मारामारीत शरद पवार खूप खुश आहेत कारण पुन्हा एकवार सारेकाही त्यांच्या मनासारखे घडते आहे घडून आलेले आहे. राज्यातल्या हिंदू विशेषतः मराठी मतदसरांमध्येच ह्या भानगडी झाल्याने पुढल्या निवडणुकात शरद पवार यांचाच अधिक फायदा होणार आहे, दोघांच्या भांडणात तिसऱ्या शरद पवार यांचा नक्की मोठा फायदा होणार आहे म्हणजे मराठी मतांची, सेना व भाजपच्या बाबतीत नेमकी गोची होईल आणि मुस्लिमांना बिलगलेल्या व राज्याच्या राजाला म्हणजे मराठा मतदारांना भावलेल्या शरद पवार यांना पुन्हा एकवार सारे काही फायदेशीर ठरले आहे. मुंबईतल्या राज्यातल्या मुस्लिमांमुळे महाआघाडीच्या सरकारात मराठी माणसाला जरी जीव मुठीत घेऊन जगावे लागत असले तरी त्याची चिंता पवारांना अजिबात नसल्याने ते खुश आहेत, आधी आरक्षणाच्या नावाखाली मोठ्या खुबीने पवारांनी राज्यातल्या बहुसंख्य मराठ्यांना आपलेसे केले आणि आता सेना भाजपा वाद पेटल्याने त्या दोघांचे नुकसान होईलच पण उरलेल्या मराठी मतांचा मोठा फायदा होईल तो केवळ पवारांना, शिवाय डोक्यावर बसायला मिळाले म्हणून मुस्लिम समाज व मतदार मिया शरद पवार यांच्यावर खुश आहेत ज्याचा मोठा फायदा फक्त आणि फक्त शरद पवार यांचा आहे, माझे हे वाक्य आजच लिहून ठेवा. नाही नाही म्हणता मी भरकटलो म्हणजे लिहायचे आहे वेगळ्या विषयावर आणि सुरुवात झाली ती राजकारणानेच म्हणजे जायचे होते मधुचंद्राला आणि निघून गेलो काशीला देव धर्म करण्यासाठी असे येथे घडले किंवा अगदी अलीकडे मला माझ्या एका मैत्रिणीने तिच्या आईचा लेटेस्ट फोटो पाठविला आणि फोटो बघितल्यानंतर तिच्याऐवजी तिच्या आईलाच एक दिवस डिस्कोला नेण्याचे मी मनातल्या मनात ठरविले तसे येथे लिखाण करतांना घडले…
महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करण्यात केवळ ब्राम्हण आघाडीवर आहेत त्यामुळे अनेकदा ब्राम्हणांनाच लग्न करायचे झाल्यास डोकेदुखी होऊन बसते हि वस्तुस्थिती आहे, मला स्वतःला आणखी एक लग्न करायचे होते पण बघा आधी चांगली मुलगी मिळाली नाही आणि आता चांगली बाई मिळत नाही. गम्मतीचा भाग सोडा पण आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करण्यात असे मन मोठे ठेवण्यात आम्हा ब्राम्हणांचा हात कोणीही धरूच शकणार नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा ब्राम्हणांना शिव्या घातल्या जातात तेव्हा तळपायाची आग मस्तकात पोहोचते. नेमका हाच चमत्कार आणि आंतरधर्मीय सोहळा अलीकडे मला अभिनेता अरुण कदम यांच्या घरातून बघायला मिळाला. झाले असे कि अरुणला एकमेव कन्यारत्न आहे, सुकन्या हि वैशाली आणि अरुण कदम या दाम्पत्याची एकुलती एक बुद्धिमान अत्यंत देखणी खूपच डिसेंट अशी मुलगी, सुकन्या देखणी आहेच पण वैशाली देखील एवढी रूपवती कि माझ्या या मैत्रिणीला मी सांगून ठेवले होते कि तूच अजून लग्नाची वाटते म्हणून सुकन्याला एखादा बघायला आला कि तू आधी त्याच्या पुढ्यात येऊ नको नाहीतर त्याचे देखील माझ्यासारखे होईल म्हणजे सुकन्या राहिली बाजूला पण वैशाली तुलाच तो मागणी घालून मोकळा होईल. कोणीही बघणारा नवखा असेल तर म्हणणार नाही कि वैशालीला वयाने एवढी मोठी मुलगी आहे. वैशाली आणि सुकन्या दोघींचेही खाण्यापिण्यावर असलेले नियंत्रण आणि नियमित न चुकता व्यायाम वरून टापटीप राहण्याची सवय, दोघींनी जर मॉडेलिंग केले असते तर त्यांनी या क्षेत्रात नाव व पैसे मिळविले असते किंवा अनेकांनी या दोघीनाही सिनेमात अभिनय करण्यासाठी अनेकदा ऑफर्स दिल्या पण तेथले नेमके वातावरण चावट हलकट बदनाम आणि बदमाश कसे हे कदम कुटुंबियांना माहित असल्याने वैशाली घर सांभाळते आणि सुकन्या चक्क नोकरी करते. पंचविशीनंतर सुकन्याचे लग्न करायचे असे ठरले, तिचे विचार एकदम वेगळे त्यामुळे प्रेम विवाहाच्या भानगडीत पडणे तिला शक्य झाले नाही म्हणून जेव्हा वैशालीने मला हा विचार सांगितला मी तिला लगेच सांगितले कि अमुक एका विवाह साईटवर लगेच नाव नोंदवून मोकळी हो आणि तिने ते लगेच केले, सुकन्याचे नाव नोंदविले, त्यानंतर धडाधड स्थळे चालून आलीत आणि आश्चर्य म्हणजे अलीकडे तिचे ज्या तरुणाशी लग्न ठरले साखरपुडा झाला तो सागर पोवळे हा चक्क ब्राम्हण आहे त्याला माझ्या लेकीसारखी अत्यंत लाडकी सुकन्या एवढी आवडली कि या श्रीमंत उद्योगपती तेही ब्राम्हण तरुणाने या आंतरधर्मीय सुकन्याला चक्क मागणी घातली, पुढे एकमेकांची माहिती देणे घेणे व प्रत्यक्ष बघण्याचा कार्यक्रम पार पडला आणि आता डिसेंबर मध्ये हे लग्न होते आहे. आम्ही ब्राम्हण हे असे आहोत जेथे धर्माच्या जातीच्या भिंतींना आम्ही कधीही महत्व देत नाही आणि असे आंतरधर्मीय विवाह करून सुखाने बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्यासारखा सुखी संसार करून मोकळे होतो. हिऱ्याची नेमकी पारख जोहरी सागर याने केली आणि वैशाली व अरुण यांच्या आनंदात भर पडली. डिसेम्बरनंतर नांदा सौख्य भरे !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी