भाग २ : संघ मांडू पाहतोय नवा डाव
—पत्रकार हेमंत जोशी
आपल्या आईवडिलांकडे आजोबांकडे पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्याकडे काहीही नव्हते तेव्हा त्यांची अगदी बेताची आर्थिक परिसस्थिती होती, गावातले फारतर दोन टक्के श्रीमंत असायचे इतर सारे आर्थिक कोंडीत अडकलेले असायचे तरीही ते कुठलाही मागला पुढला विचार न करता भरमसाठ मुले मुली जन्माला घालायचे म्हणून हिंदूंचीसंख्या त्याकाळी झपाट्याने वाढली ज्याचे अनुकरण भारतीय मुस्लिमांनी केले आज जिकडे पाहावे तिकडे मुस्लिम दिसतात आणि हिंदू जीव मुठीत ठेवून जगतात कारण आपली आर्थिक परिस्थिती आपल्या पूर्वजांसारखी जेमतेम नसतांना देखील मुली मुले मोठ्या प्रमाणात पैदा करण्यात आपण स्वतःवर विनाकारण बंधने घालून घेतली आहेत जी आपल्या हातून फार मोठी चूक होते आहे. अशी घोडचूक करू नका, हिंदूंनो भरपूर मुले व मुली जन्माला घाला अन्यथा तो दिवस फार दूर नाही ज्यादिवशी हिंदूंचा देखील अफगाणिस्थान नक्की होईल. अर्थात हा माझा विचार आहे रा. स्व. संघाचा नाही कारण जेथे आपले हिंदुत्वाविषयी विचार संपतात त्यानंतर संघाचे विचार सुरु होतात, नेमका संघ त्यांच्या स्वयंसेवकांना आयुष्याच्या अखेरपर्यंत समजत नाही तो संघ मल्हार मोहिते यांच्यासारख्या उथळ व पोरकट विचार करणाऱ्यांना समजणे अशक्य आहे. आपल्या मनातल्या हिंदुत्वापलीकडे संघाचे हिंदुत्व असते. मल्हार मोहिते यांनी मथळा संघाचा दिला आणि लिखाणातून केवळ देवेंद्र फडणवीस यांना टारगेट केले. मोहिते लिहितात कि देवेंद्र फडणवीस यांच्या गुळमुळीत मुळमुळीत झालेल्या नेतृत्वाला आता पक्षात कोणी जुमानत नाही थोडक्यात फडणवीस यांचा नारायण राणे झालाय. त्यावर असे म्हणता येईल कि फडणवीस यांचा अजिबात नारायण राणे झाला नाही याउलट नारायण राणे यांचा भाजपात फडणवीस झपाट्याने होतो आहे कारण फडणवीसांनी आणि भाजपाने इतरांसारखे नारायण राणे यांच्या नेतृत्वाला अजिबात दाबून टाकले नाही वरून त्यांना केंद्रात मंत्री करून मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि या संधीचे जर आपण सोने केले नाही तर राजकारणात किंवा भविष्यात आपले व आपल्या मुलांचे काही खरे नाही हे चाणाक्ष राणे जाणून असल्याने ते सतत तेथे धडपड करतांना विशेषतः कोकणात व मुंबईत भाजपामध्ये आणखी टवटवीतपणा आणण्याचा प्रयत्न करतांना दिसताहेत….
मल्हार मोहिते यांच्या लेखावर एका भाजपच्या विचारवंताने मला अतिशय छान प्रतिक्रिया दिली. म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार नाही म्हणजे भाजपाची गोची झाली असे म्हणणे म्हणजे राज्याच्या राजकारणात आणि मंत्रालयात सुप्रिया सुळे यांची मोठी लुडबुड वाढल्याने अजित पवार यांची गोची झाली असे म्हणण्यासारखे. अजित पवारांचे दुकान जुने आहे फक्त पवारांनी आणखी एक नवीन दुकान उघडले असे फार तर म्हणता येईल. मोहिते नक्की स्वप्नात वावरत असावे अशी शंका येते. खरे तर एक किस्सा सध्या व्हाट्सअपवर फिरतोय, अफगाणिस्थानचे दुःख सर्वाधिक कुणाला समजत असेल तर ते महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. कारण, उरावर एखादे सरकार थोपविले तर काय होते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतोय. राज्यातल्या प्रत्येक संकटात दिसणारा किंवा फ्रंटवर जीवाची पर्वा न करता जीवाचे रान करून मराठी जनतेला दिलासा देणारा नेता देवेंद्र फडणवीस आणि मोहिते म्हणतात कि त्यांचा ग्राफ खाली आलाय, याचा अर्थ राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यात फडणवीसांसभोवताली जमणारी उत्स्फूर्त गर्दी आणि भाजपामध्ये त्यांच्या प्रत्येक शब्दाला असलेला मान, हि माहिती पत्रकार असूनही मल्हार मोहिते यांना नसावी म्हणून त्यांची लेखणी चड्डीसारखी घसरली. त्या विचारवंताचे हे शब्द हि प्रतिक्रिया मनाला भावणारी ठरावी. मल्हारराव, मराठी माणसाचा आता विशेष ओढा शिवसेनेपेक्षा राज ठाकरे यांच्याकडे अधिक आहे हि वस्तुस्थिती आहे किंबहुना मराठी माणसाला अलीकडे उद्धव यांच्यापेक्षा राज अधिक आवडू लागले हेही खरे आहे आणि हिंदू व मराठी मते विशेषतः विभागल्या जाऊ नयेत अशी मते विभागल्या गेल्याने भाजपाचे येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीत मोठे नुकसान होऊ शकते हेही लक्षात आल्याने नजीकच्या काळात मनसे व भाजप युती हे नवीन राजकीय गणित जे दिसू लागले आहे ते प्रत्यक्षात उतरेल यात शंका वाटत नाही मात्र याचा अर्थ राज ठाकरे पुढले मुख्यमंत्री हे मोहिते यांचे लिखाण तद्दन पोरकट व आकसापोटी केल्याचे पदोपदी जाणवते. अत्यंत महत्वाचे म्हणजे तुम्ही अगदी उद्यापासून मनात आकस न ठेवता कृपया संघस्थानावर जा म्हणजे तेथे गेल्याशिवाय तुमच्या ते लक्षातच येणार नाही कि संघ त्या भाजपाला डिक्टेट करतो किंवा नाही. संघ आणि भाजपाचा राजकीय संबंध नाही असे नक्की म्हणता येणार नाही जरी भाजपामधला प्रत्येक कार्यकर्ता संघाचा नसला तरी संघाचा प्रत्येक स्वयंसेवक शंभर टक्के भाजपाचा कार्यकर्ता देखील असतो म्हणजे अमुक एक स्वयंसेवक संघात जातो संघाचे काम करतो आणि बाहेर तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असे संघात कधी घडत नाही, जर संघ भाजपाला डिक्टेट करणारा असता तर संघाने भाजपाला देखील हेच सांगितले असते कि जसे आमचे स्वयंसेवक तुमचे काम करतात तुमचे कार्यकर्ते असतात तसे तुमचे कार्यकर्ते देखील संघ स्वयंसेवक असायलाच हवेत पण असे कधीही घडत नाही म्हणजे नारायण राणे नितेश निलेश राणे हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील इत्यादी लाखो भाजपा नेते व कार्यकर्ते संघ शाखेवर न जाणारे आहेत, तरीही असे कितीतरी भाजपामध्ये मोठ्या पदावर आहेत. मोहिते लिखाणात परिपकवता असावी, उगाच काहीही लिहू नये…
मोहिते अत्यंत महत्वाचे म्हणजे मी जे डोळ्यांनी बघितले ते तुम्हाला येथे मुद्दाम सांगतो कि देशाचे सोडा पण या राज्यात असे कितीतरी आहेत कि जे भाजपाचे अजिबात नाहीत पण तरीही त्यांची आतून फार मोठ्या प्रमाणावर संघाच्या प्रत्येक कार्याला उपक्रमांना फार फार मोठी मदत असते सहकार्य असते ज्यांच्या नावाची गुप्तता संघात नक्की पाळल्या जाते. जगातले भाजपाक्सचे नसलेले असे कितीतरी हिंदू जे संघाच्या पाठी कायम उभे राहिले आहेत. जर संघाबाहेरच्या लाखो करोडो लोकांनी संघाला अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत किंवा पुढेही सहकार्य केले नसते तर संघ कार्याची व्याप्ती जगात पसरली वाढली नसती. महत्वाचे म्हणजे संघाबाहेरचे देखील जे कडवे हिंदू आहेत ते हिंदूंच्या पवित्र कार्याला मदत सहकार्य न करण्या एवढे संकुचित नाहीत म्हणून मोहिते संघ तुम्हाला आम्हाला समजला नाही असे मी येथे वारंवार सांगतोय. संघ भाजपाला अजिबात डिक्टेट करीत नाही मात्र तो जगातल्या हिंदूंवर अधिराज्य गाजवतो…
क्रमश: हेमंत जोशी