संघ मांडू पाहतोय नवा डाव…
—-पत्रकार हेमंत जोशी
या मथळ्याखाली अलीकडे मल्हारराव मोहिते नावाच्या एका ज्येष्ठ पत्रकाराचा लेख वाचण्यात आला त्यातल्या प्रत्येक शब्दतल्या तर्क विसंगती वाचून मोहिते यांना रात्री आधी बसायचे नंतर वाट्टेल ते लिहून काढण्याची नक्की सवय असावी कारण एखाद्या भरकटलेल्या सिनेमासारखे हे लिखाण मोहिते यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी पत्रकारांकडून लिहिल्या गेल्याचे पदोपदी लेख वाचतांना जाणवते. तुम्हालाही जर मल्हाररावचा हा पोरकट लेख वाचाच असेल तर तो मी यावेळच्या ऑफ द रेकॉर्ड मध्ये घेतलेला आहे. अनेकांचे मी रात्री फोन घेत नाही कारण त्यांना का कोण जाणे पण रात्री कसलीतरी कोणतेतरी औषध घेतल्यानंतर अचानक जोर येतो, अनेक पुरुष आणि आजकाल अनेक बायकाही दिवसभर शेळीसारख्या असतात आणि रात्री का कोण जाणे त्यांच्या अंगात अचानक जोश संचारतो म्हणून मला अनेकांचा रात्री फोन घेतांना भीती वाटते. उद्या मला मल्हाररावांचा जरी रात्री फोन आला तरी मी नक्की घेणार नाही हे मी त्यांचा लेख वाचल्यानंतर ठरविले आहे. शीर्षकावरून वाटते कि त्यांना संघाविषयी उलट सुलट विचार मांडायचे आहेत पण लेख वाचून संपविल्यानंतर मल्हाररावांना शिवसेना कशी चांगली आणि देवेंद्र फडणवीस कसे वाईट हे सांगायचे होते असे लक्षात आले त्यामुळे मला पूर्वीचे दिवस आठवले म्हणजे फार पूर्वी चावट तरुण व अतिचावट पुरुष घरातल्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून वरून एखादे धार्मिक पुस्तक हाती घ्यायचे पण त्या पुस्तकाच्या आत, बलात्कार कसा करावा असा करावा किंवा स्तनांचे आकर्षण का व प्रकार, पद्धतीची पुस्तके ठेवायचे, मल्हारराव यांचे शीर्षक आणि आतले लिखाण हे असेच या चावट लिंगपिसाट पुरुषांसारखे कॉन्ट्रास्ट वाटले म्हणजे शीर्षक वेगळे आणि आतले लिखाण वेगळे. मला काही लोकांच्या नावावरून कायम हसू येते जी माणसे स्वतःच स्वतःला उपाध्या देऊन मोकळे होतात जसे अजित पवार सुरेश जैन गणेश नाईक इत्यादींना दादा हि उपाधी लोकांनी दिली आहे त्यांनी आपणहून हि उपाधी स्वतःच्या नावापुढे लावून घेतलेली नाही पण मोहिते यांनी स्वतःच स्वतःच्या नावापुढे मल्हारराव म्हणजे राव हि उपाधी लावून घेतलेली दिसते तसे नसते तर त्यांनी स्वतःचे नाव मल्हार मोहिते असे टाकले लिहितोय असते, असो माणूस लिखाणात आणि एकंदर आयुष्यात गमतीदार दिसतो दिसला म्हणून नाव व लिखाण वाचून खूप खूप हसायला आले…
मल्हारराव, पत्रकारांचा कुठलाही पक्ष नसतो पण अमुक एखादा राजकीय पक्ष जरी मनातून आवडत नसेल तरी त्या त्या राजकीय पक्षाची भूमिका जर कणखर आणि आदर्श असेल तर पत्रकाराने मतभेद व मनभेद बाजूला ठेवून उलट अशा नेत्यांचे किंवा राजकीय पक्षांचे तोंडभरून कौतुक करणे गरजेचे असते. थेट तुरुंगातून सुटून आल्यानंतर देखील एकही क्षण छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ सुधारायला तयार नाहीत वरून त्यांनी अतिशय बदमाश व भ्रष्ट असा संतोषसिंग परदेशी नावाचा सरकारी अधिकारी खाजगी सचिव म्हणून नेमला आहे, जर वेळ आलीच तशी तर शंभर टक्के संतोषसिंग परदेशी याचा देखील संजीव पलांडे होणारच आहे. अहो, आपल्याला साध्या ट्राफिक हवालदाराने पकडून जरी दंड ठोठावला तरी पुढले काही महिने आपण वाहतुकीचे नियम मोडतांना घाबरतो आणि भुजबळ काका पुतणे तुरुंगातून जामिनावर असतांना देखील सुधारायला तयार नाहीत त्यांचे सरकारी तिजोरी लुटणे लुबाडणे सुरु ठेवणे हे एखाद्या अट्टल गुन्हेगाराला शोभणारे वाटते म्हणजे हे तर एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे झाले जे जामिनावर सुटून आल्या आल्या पुन्हा चार दोन दरोडे घालून किंवा चार दोन खून करून मोकळे होतात आणि या अशा मंत्र्यांना जेव्हा शरद पवार मंत्रिमंडळात सामावून घेऊन वरून सतत संरक्षण देतात तेव्हा नेमके पुरावे माहित असणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांच्या तळपायाची आग कशी व किती मस्तकात पोहोचत असेल कल्पना करा. अंजली दमानिया यांनी आयकर खात्याकडे तक्रार केली आणि आम्ही तेथे त्या तक्रारीचा मोठ्या खुबीने पाठपुरावा केला म्हणून अगदी अलीकडे भुजबळांची मुंबईतली अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली अल जबेरीया हि बेनामी इमारत जप्त करण्यात आली. आणि हा मोठा वचक निर्माण करण्याचे काम फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी व त्यांचा भाजपा करतोय तेव्हा त्यांची तारीफ करायची सोडून असे रात्रीचे बहुदा लिखाण करणारे मल्हारराव जेव्हा लढवय्या भाजपावर तुटून पडतात तेव्हा देखील मनस्वी राग येतो. जोपर्यंत मोदी केंद्रात आणि फडणवीस राज्यात आहेत तोपर्यंत भाजपशी आपली नाळ जरी जुळत नसली तरी त्यांच्या पाठीस अपेक्षाविरहित मनाने मनापासून उभे राहा कारण काम कठीण आहे पण हळूहळू का होईना भुजबळ यांच्यासारखे न सुधारणारे नेते वठणीवर आणण्याचे मोठे काम ते करताहेत, मल्हारराव उगाच चुकीची आगपाखड करू नका. फडणवीस यांचा ग्राफ खाली आला आहे हे तुमचे सांगणे म्हणजे तुम्ही स्वतःचे मोहिते हे आडनाव बदलवून खान किंवा शेख ठेवले असे म्हणण्यासारखे ते असेल. मी उद्धव यांना याआधी कधीही कमी लेखले नाही उलट जेव्हा इतर सारी मीडिया त्यांना अंडरएस्टीमेट करायची तेव्हा मी एकटा असा कि तुम्हा सर्वांना निक्षून सांगत असे कि उद्धव हे एकदम वेगळे रसायन आहे जे राजकारणातून संपले असे वाटत असताना पुन्हा झेप घेतात आणि विजयश्री मिळवून मोकळे होतात पण आता मी सांगतो मल्हारराव कि यावेळी मात्र शंभर टक्के उद्धव यांची महाआघाडी करणे हि स्टेप पूर्णतः चुकलेली आहे ज्याची मोठी किंमत त्यांना स्वतःला आणि शिवसैनिकांना नेत्याच्या चुकीच्या वागण्याने चुकती करावी लागणार आहे. उसने अवसान आणून केवळ फडणवीसांवर टीका आणि सेनेची तारीफ, मोहिते तुमचे लिखाण अगदीच पोरकट आणि हलकट देखील वाटले…
क्रमश: हेमंत जोशी