अबब ! राज्याच्या राजकारणातले गौप्य्स्फोट
—पत्रकार हेमंत जोशी
अगदी अलीकडे मला राज्याच्या भाजपा आघाडीत आघाडीवर असलेल्या एका महिला नेत्याचा प्रदीर्घ फोन आला, तुमचे फडणवीसांशी अनेकदा बोलणे होते ( त्यांचा हा मोठा गैरसमज किंवा मी फडणवीसांचा माझ्या लिखाणातून अनेकदा उल्लेख करतो त्यातून बहुदा त्यांनी स्वतःचा करवून घेतलेला गैरसमज ) बोलण्याच्या ओघात तुम्ही नक्की देवेंद्रजींना विचारून घ्या कि या पंचवार्षिक योजनेत आम्ही राज्यातल्या सत्तेत बसणार आहोत कि नाही बाईंचे हे असे विचारणे विशेषतः भाजपा नेत्यांना नक्की विचार करायला लावणारे आहे कारण बहुतेकांना हेच वाटत राहते कि पुढल्या काही दिवसात महाआघाडी सरकार गडगडणार आहे आणि भाजपा सत्तेत येणार आहे. बाईंची तळमळ खोटी नव्हती, बहुतेक भाजपा प्रेमींचे तेच झाले आहे कि ते सत्तेत नक्की येणार आहेत पण गेली दोन वर्षे जवळपास भाजपाचे नवविवाहितेच्या चुकलेल्या पाळीसारखे झाले आहे, एखाद्या नवविवाहितेची पाळी टळली रे टळली कि नवर्यासहित घरातल्या साऱ्यांना हेच वाटत राहते कि तिला दिवस गेलेत पण तसे घडतेच असे नाही काहींची पाळी मागे पुढे होत असते त्यातून हे असे गैरसमज होत राहतात. राज्यातल्या भाजपच्या बाबतीत शंभर टक्के नवविवाहितेसारखे घडते आहे. एकदा तर एका नवविवाहितेचे पॉट चांगलेच पुढे आले म्हणून आनंदाने तीने डॉक्टरकडे जाऊन विचारले कितवा लागला आहे म्हणून त्यावर तिला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले तुम्हाला अजिबात दिवस गेलेले नाहीत, लग्नानंतर अति खाण्याने तुमच्या पोटात हवा भरली गेली त्यामुळे हे पॉट पुढे आलेले दिसते. तिला राग आला, रागाच्या भरात घरी आल्या आल्या तिने नवऱ्याला विचारले कि तुमचा कुठलासा अवयव म्हणजे हवा भरायचा पंप आहे कि काय ? नेमके हेच या पद्धतीचे राज्यातल्या भाजपामध्ये वारंवार घडतांना दिसते आहे म्हणजे राज्यातली सत्ता नक्की हाती येणार असे वाटत असतांना त्या सत्तेचे हवा भरण्याच्या पंपासारखे झाले आहे, भाजपातल्या कानाकोपऱ्यात ज्याला त्याला सतत हेच वाटत राहते कि आपण पुढल्या काही दिवसात राज्याची सत्ता हाती घेणार आहोत, असे अजिबात घडता कामा नये त्यातून कट्टर कार्यकर्त्यांना, आशा ठेवून जगणाऱ्या नेत्यांना नैराश्य येते अत्यंत महत्वाचे म्हणजे जे कुंपणावर बसून भाजपामध्ये आलेले आहेत ते भाजपालाराजकीय दृष्ट्या बऱ्यापैकी खिळखिळे करून महाआघाडीला आणखी मजबूत करण्या तिकडे त्या अमरावतीच्या डॉ. सुनील देशमुख यांच्यासारखे नक्की निघून जाणार आहेत ज्याचे मोठे नुकसान येणाऱ्या अनेक सार्वजनिक निवडणुकात राज्यातल्या भाजपाला होणार आहे…
एक साधू होता, मृत्यू जवळ आल्याचे त्याला त्याच्याकडे असलेल्या दिव्यज्ञानाने लक्षात आले त्यावर त्याने अगदी जवळच्या पाच शिष्यांना बोलावून सांगितले कि अमुक दिवशी माझा मृत्यू होणार आहे पण वाईट वाटून घेऊ नका कारण त्यानंतर लगेचच गावाबाहेरच्या त्या घाण नाल्यात वास्तव्याला असलेल्या दिवस गेलेल्या डुकरीणीच्या पोटी मी जन्म घेईन, कपाळावर मोठा ठिपका असलेला मी असेल, तुम्हाला एक करायचे आहे डुकरीण व्याली कि पाच दिवसांनी नाल्यातल्या अमुक डबक्यात तुम्ही यायचे मला ओळखून बाहेर काढायचे आणि भिंतीवर आपटून मारून टाकायचे त्यानंतरचा माझा जन्म माणसाचा असेल याच गावातल्या सरपंचाच्या पोटी मी जन्माला येईल पुढे पुन्हा साधू होऊन तुमची सेवा माझ्या हातून घडेल. साधूने जे सांगितले नेमके ते तसेच घडले आणि पाच दिवसानंतर जेव्हा ते पाच शिष्य त्या पिल्लास मारायला भिंतीवर आपटायला गेले, ते पिल्लू अचानक मानवी भाषेत शिष्यांना कळवळून सांगू लागले कि प्लिज मला मारू नका कारण मला या घाणीची आता सवय झाली आहे मी हि घाण मनापासून एन्जॉय करू लागलो आहे. वाचकांनो, आता तुम्हाला हे ठरवायचे आहे कि तो जनतारुपी साधू नेमका कोणाकडे आहे म्हणजे महाआघाडी कडे आहे कि भाजपाकडे आहे ज्याला सध्याचे जे काय चालले आहे तेच मनापासून आवडायला लागलेले आहे. थोडक्यात त्या साधूसारखी जनतेला आता हळहळू भाजपाला विरोधात बघण्याची आणि महाघाडीला सत्तेत असल्याची सवय लागत चाललेली आहे जे काही लोकांना अनेकांना चालणारे असले तरी भाजपाला न सोसणारे न परवडणारे त्यांच्यातल्या बहुतेकांना न आवडणारे असे नक्की आहे, भाजपाला बदल घडवायचेच असतील तर ते पटकन घडवून मोकळे व्हा अन्यथा भाजपावाले फक्त बोलतात पण त्यांच्याबाबतीत वर उदाहरण दिलेल्या हवा भरण्याच्या पंपासारखे घडते आहे अशी त्यांची या राज्यात प्रतिमा उभी राहता कामा नये, पुढल्या काही दिवसात सत्तेत बदल झाले नाहीत तर पवार उद्धव जिंकले आणि भाजपावाले पराभूत झाले असे ज्याला त्याला प्रत्येकाला नक्की वाटणार आहे. विशेष म्हणजे ज्याचा फार मोठा फटका देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत असलेल्या जनतेच्या विश्वासाला आणि मोदी व शाह यांच्या करून दाखवू शकतो या हिम्मतीला नक्की बसू शकतो आणी मी म्हणतो तेच सत्य आहे…
क्रमश: हेमंत जोशी