भाग दुसरा : मी म्हणजेच सरकार ! सत्तेचा माज डोक्यात गेलेला खासदार !!
—पत्रकार हेमंत जोशी
आधी चूक करायची अर्थात केलेली चूक लक्षात आल्यानंतर ती सुधरवायची, हेही संघ परिवारातील तरुण भारत वेब वाहिनीने केलेले नसे थोडके. टीबी वाहिनीने पत्रकार अनिल थत्ते यांना बोलण्यासाठी बोलावणे कसे महागात पडले किंवा अमुक एखादी भावनेच्या भरात केलेली चूक कशी मोठी आणि गंभीर ठरू शकते त्यावर अनिल थत्ते यांचे टीबी वेब वाहिनीवर जाणे हे उदाहरण येथे पुरेसे ठरेल. अनिल थत्ते यांची पत्रकारिता मधल्या २०-२२ वर्षात त्यांनी केलेल्या चुकातुन जवळपास अदृश्य होती गायब होती विशेष म्हणजे ती पत्रकारिता त्यांनी पुन्हा सुरु केली पण पूर्वीच्याच चुकांनी आणि ज्या पत्रकारितेला अचानक टीबी वेब वाहिनेने उर्जित अवस्थेत आणून ठेवल्याने विशेषतः संघ भाजपामधली जी काही उत्तम संस्कारांनी घडलेली वेढलेली तरुण पिढी आहे तीच थत्ते यांच्या लिखाणाला टीबीच्या चुकीमुळे देव मानायला लागलेली होती अजूनही या तरुण पिढीच्या डोक्यातले हे खूळ फारसे निघून गेलेले नाही कारण मलाच राज्यातून ठिकठिकाणाहून जवळपास पाच ठिकाणाहून फोन आलेत, एक फोन नाशिकवरून होता दुसरा रत्नागिरी तिसरा माझ्या गावातून म्हणजे जळगाव जामोद येथून, एक फोन अकोला आणि एक फोन तर चक्क नागपुरात तरुण भारत मध्ये वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या एका तरुण मित्राचा होता, जेव्हा मी थत्ते नेमके कोण व कसे तुमच्यासमोर मांडायला सुरुवात केली, त्यानंतर असे फोन आले. फोन असे होते कि हेमंत जोशी तुम्ही थत्ते विषयी नेमके विदारक सत्य मांडले आणि थत्ते यांना तरुण भारत वेब वाहिनी वरून काढून टाकले हे सांगितले म्हणून आमच्यापैकी काहींना ते कळले बरे झाले कारण संघ पद्धतीनुसार आमच्याशी भाजपाशी जे विचार संबंधित असतात अशांचे विचार आम्ही विविध बैठकांमधून किंवा संघ स्थानावर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करतो जे अनिल थत्ते बाबतीत देखील संघ परिवारात घडायला लागले होते, बोलण्यातून भाषणातून बौद्धिकातून थत्ते यांच्या बोलण्याचे संदर्भ हि मंडळी द्यायला लागली होती. पत्रकार थत्ते यांचे तद्दन अनेक थापाडे संदर्भ संघ भाजपा परिवारातील बहुसंख्य उत्तम मंडळींसमोर रुजविणे म्हणजे बाबा सिद्दीकीला संघस्थानावर आणून बिगुलांची सलामी देण्यासारखे किंवा देशस्थांच्या घरात सत्य नारायणाच्या पूजेला मटणाचा नैवेद्य दाखविण्यासारखे किंवा इम्रान हाश्मी यांची चुंबन पद्धत त्यावर बाल भारतीच्या पुस्तकात लेखक म्हणून त्यांचा धडा घालण्यासारखे हे घडले असेच मला वाटते वाटले. आपण ज्यांना टीबी वेब वाहिनीवरून बोलायला सांगू अशा काही वादग्रस्त मंडळींचे विचार जर पुढे मोठ्या प्रमाणात संघ भाजपा परिवारात रुजू शकतात याचे भान या वाहिनीशी संबंधित मंडळींनी ठेवायलाच हवे हे यापुढे निदान ध्यानात ठेवावे. महत्वाचे म्हणजे जेथे हिंदुत्व हा प्रमुख विषय किंवा अजेंडा असतो तेथे जर काही विपरीत घडत असेल तर मग ती शिवसेना असो कि भाजपा किंवा अन्य कोणतेही हिंदू सेक्टर्स, गाठ माझ्या जहाल पत्रकारितेशी आहे हे संबंधितांनी कायम ध्यानात ठेवावे…
सिंधुदुर्गच्या अविनाश पराडकर यांचा, संजय राऊत यांच्या वरील, मी म्हणजेच सरकार ! सत्तेचा माज डोक्यात गेलेला संपादक खासदार !! ह्या प्रदीर्घ लेखाचा पुन्हा एकवार उहापोह करतांना मला वाटते कि पराडकर यांना उद्धव यांचा तेवढासा जवळून अभ्यास नाही कारण उद्धव हेच कायम पाळी आलेल्या स्त्रीसारखे इतरांपासून सतत दूर असतात, बहुतेकांना दूर ठेवतात विशेष म्हणजे त्यांचे इतर बहुसंख्य नेत्यांसारखे नाही म्हणजे गाव तेथे कुटुंब हि इतर अनेक नेत्यांची पद्धत नशीब फडणवीस आणि उद्धव या दोघांनीही स्वीकारलेली नाही त्यामुळे एखादी बाई देखील पत्नी सोडून या दोघांना जवळची नाही फरक एवढाच कि फडणवीस कायम अगदी रात्री उशिरापर्यंत दरक्षणी लोकांमध्ये असतात मिसळतात आणि उद्धव यांना मात्र माणसांची बऱ्यापैकी ऍलर्जी आहे असावी त्यामुळे पराडकरांसारखा अमुक एखादा जसे फडणवीस यांच्याविषयी नेमके सांगू शकेल ते उद्धव बाबतीत सांगणे प्रेडिक्त करणे अगदीच कठीण असे काम आहे पण मी मात्र उद्धव यांची तंतोतंत कायम माहिती ठेवत असतो जमा करीत असतो त्यामुळेच येथे सांगतोय कि अविनाश पराडकर यांना उद्धव फारसे समजलेच नाहीत. उद्धव अमुक एखाद्याला तोंडावर सांगून उद्धव कधीही एखाद्याला संपवत नाहीत किंवा राजकीय जीवनातून ते एखाद्याला सांगून कधीच उठवत नाहीत याउलट ते अमुक एखाद्याशी अतिशय सलगी ठेवतांना मधुर बोलतांना इतरांना कांही काळ दिसत असतील तर आज जो त्यांच्या खूप जवळचा आहे असे वाटते तो पुढल्या काही दिवसात त्यांच्यापासून किंवा सत्तेच्या राजकारणातून दूरवर फेकला गेलेला असेल आणि उद्धव यांच्या बाबतीत हेच नेमके सत्य आहे. वाटल्यास अरविंद शहा यांना विचारा ते त्यावर नेमका आलेला अनुभव सांगू शकतील. इतरांना उगाचच वाटत असते कि आपण उद्धव यांच्या खूप जवळचे आहोत आणि उद्धव यांना पद्धतशीर उल्लू बेवकूफ बनवतो आहे, आपण कसले उद्योग करतोय हे उद्धव यांच्या लक्षात येत नाही पण जेव्हा अचानक उद्धव यांची काठी अशांच्या ढुंगणावर मागून जोरात बसते तेव्हा त्याला कळते कि उद्धव किती व कसे डेंजरस आहेत ते…
आजवरच्या माझ्या ४१ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवरून अभ्यासातून सेनेतल्या अनेक नेत्यांना किंवा उद्धव यांच्या जवळ गेलेल्या काही दलालांना मी हेच सांगत होतो असतो कि जसे गाढवाच्या मागे गेल्याने लात बसते तसे बुद्धिमान खतरनाक उद्धव यांना अंडरएस्टिमेट केल्यास म्हणजे त्यांच्या समोरून जाण्याचा प्रयत्न केल्यास देखील लातच बसत असते ज्यांनी माझे ऐकले नाही आणि उद्धव यांना आपण खुबीने अंधारात ठेवतो आहे असे ज्यांना वाटले त्यातल्या प्रत्येकाला मी सांगून देखील ज्यांनी ऐकले नाही अशांचा हमखास रामदास कदम भास्कर जाधव झाला ज्यांनी आपल्या मर्यादा ओळखून जे उद्धव यांच्याशी प्रामाणिक वागले राहिले ते पुढे आपाआप मोठे हिरो झाले एकनाथ शिंदे झाले मिलिंद नारवेकर किंवा उदय सामंत झाले. नेमके हेच खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्या बाबतीत पुढल्या काही महिन्यात घडणार आहे म्हणजे ते उद्धव यांच्या मनातून साफ उतरले आहेत कि संजय हे उद्धव यांना उल्लू बनवतात ते केवळ एक नाटक आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना नक्की यासाठी कळणार आहे कि संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत ते शिवसेनेतून राज्यसभेवर गेले आहेत हे तुम्हाला सांगणे म्हणजे दादा भोका भोकाचे बनियान घालत नाहीत हे सातारा जिल्ह्यातल्या त्या राणीसाहेबांना सांगण्यासारखे. जर पुढल्या वर्षी संजय राऊत यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेवर पाठवल्या गेले नाही तर तुमच्या सर्वांच्या मनात जे आहे तेच नेमके सत्य असेल कि राऊत हे उद्धव यांना नव्हे तर पवारांना जवळचे आहेत ते पवारांचे फॉलोअर्स व जासूस आहेत आणि हे उद्धव यांच्या लक्षात आलेले आहे, आज जे ठाकरे परिवाराला अतिशय जवळचे आहेत ते माझ्या बऱ्यापैकी परिचयाचे आहेत आणि त्यांचेही हेच सांगणे आहे कि संजय राऊत यांना पुढल्या वेळी शंभर टक्के राज्यसभेवर पाठवल्या जाणार नाही पण माझा त्यावर अद्याप विश्वास नाही पण जर संजय राऊत यांना राज्यसभेवर रिपीट केल्या गेले तर माझे आधीचे सतत सांगणे खरे मानावे कि उद्धव यांचे संजय यांच्या राजकीय भूमिकेकडे बोलण्याकडे दुर्लक्ष असणे हे त्या दोघांचे केवळ एक नाटक असते, ते दोघेही आतून एकमेकांना खूपच जवळचे आहेत किंबहुना संजय यांची प्रत्येक राजकीय हालचाल हि फक्त आणि फक्त उद्धव यांच्या सांगण्यावरून व इशाऱ्यावरून ठरते असते. घोडा मैदान जवळ आहे त्यावेळी नेमके सर्वांना कळणार आहे कि संजय राऊत यांचा दिवाकर रावते होणार आहे कि अनिल परब…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी