मी म्हणजे सरकार, सत्तेचा माज डोक्यात गेलेला संपादक खासदार !!
—पत्रकार हेमंत जोशी
सिंधुदुर्ग च्या अविनाश पराडकर माझ्यासाठी या अनोळखी लेखकाचा वरील मथळ्याखाली त्यांच्याकडून लिहिल्या गेलेला प्रदीर्घ वाचनीय उल्लेखनीय बेधडक संग्राह्य असा लेख माझ्या वाचण्यात आला. जसे अनके पुरुषांना केवळ वासावरून लक्षात येते कि एकीकडे शेजारणीला बाहुपाशात घेतले असतांना पलंगाखाली बायको लपलेली आहे आणि त्यांना दरदरून घाम फुटतो किंवा अंगावर वीज कोसळल्याचे फिलिंग येते तसे केवळ मथळ्यावरूनच हे लक्षात येते कि संपूर्ण लेखात संपादक आणि खासदार संजय राऊत यांची बिना पाण्याने पराडकर यांनी भादरवून ठेवलेली आहे आणि तेच सत्य आहे म्हणजे डोक्यात संजय राऊत यांच्याविषयी प्रचंड राग त्यातून पराडकर यांनी अक्षरश: लेखणीरूपी संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. पराडकर यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी पुढल्या काही दिवसात ऑफ द रेकॉर्ड पाक्षिकाचा ऑगस्ट पूर्वार्ध अंक तुम्ही वाचायला हवा त्यात मी तो संपूर्ण लेख जसाच्या तसा घेतला आहे आणि आज या ठिकाणी पराडकर यांच्या लेखाचा नेमका उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे….
पराडकर लिहितात किंवा सारे म्हणतात तसे अजिबात नसते म्हणजे खासदार संजय राऊत हे पूर्णतः शरद पवार यांच्या आहारी गेले आहेत ते शरद पवारांचे जासूस आहेत आणि शिवसेनेचे आतून शत्रू आहेत, संजय राऊत यांच्या या संशयास्पद वागण्याने शिवसेनेचे मोठे नुकसान होते आहे आणि पवारांचा फायदा होतो आहे, आणि ते तुम्हाला कळते पण उद्धव ठाकरे यांना मात्र कळत किंवा समजत नाही असे अजिबात नाही अजिबात नसते, थोडक्यात हि एखादी मालिका नव्हे कि त्यातले सत्य दर्शकांना ठाऊक असते पण नायकाला माहित नसते. या राज्यातल्या अत्यंत बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत थोडक्यात ते देखील या राज्यातले अग्रगण्य राजकीय तद्न्य व बेरकी राजकारणी आहेत अर्थात पहिल्या क्रमांकावर शरद पवार दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस आणि फडणवीस यांच्यानंतर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे, इतर कोणीही नाहीत, इतर साऱ्या बहुतेक नेत्यांची लबाडी हि स्वतःसाठी असते, आपले आर्थिक भले तेवढे करून घेणे याकडे या राज्यातल्या इतर बहुसंख्य बहुतेक नेत्यांचा कल आहे ओढा आहे त्यामुळे इतर नेते म्हणजे त्या त्या राजकीय पार्टीसाठी असून अडचण नसून खोळंबा पद्धतीचे असतात अत्यंत महत्वाचे म्हणजे अमुक एखाद्या स्पर्धेतल्या नेत्याचा राजकीय खात्मा करण्यात उद्धव हे पवारांपेक्षा अधिक नामचीन मानले जातात तर ज्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राजकीय डावपेच खेळण्यात अव्व्ल नंबर ठरलेल्या नेत्यांच्या कायम रांगेत किंवा पंक्तीला बसविल्या जाते त्या उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांची राजकीय चाल व डावपेच लक्षात न येणे म्हणजे ऑफिस मध्ये कामाला जाते सांगून मसाज पार्लर मध्ये जाऊन लिंगपिसाट पुरुषांच्या नको त्या अवयवांना मसाज करून देणाऱ्या बायकोची नेमकी नोकरी कोणती हे तिच्या नवऱ्याला ठाऊक नाही, म्हणण्यासारखे. नेता शिवसेनेतील मग तो कितीही बलाढ्य असेल बेरकी असेल प्रसंगी नातेवाईक किंवा सख्खा भाऊ असेल, उद्धव यांच्या ते लक्षात आले म्हणजे त्यांना ते समजले कि अमुक एका नेत्यामुळे माझे सत्तेतले पद किंवा राजकीय महत्व किंवा इतर वाटे यात बाधा येणार आहे ते पुढल्या काही दिवसात अशा नेत्यांना किंवा अमुक एका नेत्याला नॉव्हेअर करून सोडतात सर्वप्रथम त्याला शिवसेनेतून घालवून मोकळे होतात त्यानंतर बाहेरही त्या नेत्यांचे भविष्यात अजिबात महत्व वाढणार नाही याची म्हणाल तर दक्षता म्हणाल तर काळ्जी घेतात त्यांचा प्रहार त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्यांसाठी शंभर टक्के राजकीय जीवनातून आयुष्यातून कायमस्वरूपी संपविणार असतो ठरतो. उद्धव यांनी या राज्यातले विशेषतः त्यांच्या कुटुंबातले किंवा शिवसेनेतले असे डोईजोड ठरलेल्या नेत्यांचा केलेला राजकीय खात्मा, जयंत जाधव ते राज ठाकरे, यादी लांबलचक आहे, येथे त्या साऱ्यांचा उल्लेख करणे अशक्य आहे, सांगायचे म्हणजे संजय राऊत आपल्या राजकीय चाली चालतात आणि उद्धव एकदम भोळे त्यांच्या ते लक्षात येत नाही त्यामुळे त्यांचे राऊत यांच्या राजकीय लुडबुडीत मोठे राजकीय नुकसान होते आहे हे पराडकर यांचे लिहिणे मनाला तितकेसे किंवा अजिबात पटत नाही, राऊतांच्या बाबतीत परिस्थिती फार वेगळी आहे, एक मात्र नक्की आहे कि जशी वर्गातली उरोज पुढे करून चालणारी मुलगी जशी तोंडात पाणी येणाऱ्या मुलांच्या जळण्याचा टीकेचा विषय असते ते तसे संजय राऊत यांच्या बाबतीत बहुतेकांचे झाले आहे थोडक्यात राऊत म्हणजे रेखीव नितम्ब आणि भले मोठे उरोज पुढे करून पुढ्यात वाकणारी सेक्सी मुलगी त्यातून राऊत इतरांना अस्वस्थ करून सोडणारे म्हणलं तर नेते आहेत म्हणाल तर उद्धव यांचे केवळ बॉडीगार्ड आहेत, संजय राऊत हे कधीही बेरकी चालबाज डेंजर उद्धव ठाकरे यांचे राजकीय नुकसान करून सेनेतून बाहेर पडून शरद पवार यांना बाहुपाशात घेणार नाहीत याउलट जर राऊत वेडेवाकडे वागताहेत ते जर उद्धव यांना तसे वाटले तर हेच उद्धव पुढल्या क्षणी संजय राऊत यांचा देखील आनंद दिघे करून मोकळे होतील आणि माझे राजकीय गणिते कधीही चुकणारे नसतात. मी येथे जे सांगतो आहे तेच त्रिवार सत्य आहे…
क्रमश: हेमंत जोशी