थापेमारी ते बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी
अनिल थत्ते यांच्या पत्रकारितेची दखल तेही थेट संघ परिवारातील महत्वाचा सदस्य महत्वाचा घटक दैनिक तरुण भारताच्या वेब चॅनेलने घ्यावी घेतली बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली कारण मी पडलो अतिशय कट्टर हिंदुत्ववादी त्यामुळे हिंदूंच्या आड जेव्हा शिवसेना भाजपा संघ किंवा तत्सम नेते संघटना आल्यात कि माझी हमखास सटकते आणि मी अशा मंडळींना त्यांच्या चुकीच्या घाणेरड्या लज्जास्पद भूमिकेवर धारेवर धरतो जीवाची किंवा कोणत्याही संबंधांची परिणामांची चिंता पर्वा काळजी न करता न घाबरता, येथेही नेमके तेच घडले म्हणजे सत्व आणि तत्व कायम उराशी बाळगून कित्येक दशक वाटचाल करणाऱ्या रा. स्व. संघ परिवारातील तरुण भारताच्या वेब चॅनेलने जेव्हा भाऊ तोरसेकर या ऋषितुल्य पत्रकाराला बोलण्यासाठी पाचारण केले होते नक्की त्यांच्या भूमिकेचे मी मनापासून काही मंडळींजवळ कौतुक केले पण त्यानंतर जेव्हा अगदी नियमित केवळ सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी तरुण भारत परिवाराने देखील थेट बदनाम अनिल थत्ते यांनाच पाचारण केले तेव्हा मात्र माझी मनापासून सटकली आणि मी फोन करून तरुण भारत परिवाराशी संबंधित किरण शेलार यांच्यासारख्या या परिवारात प्रतिष्ठित व डिव्होटी समजल्या जाणाऱ्या माझ्या काही मित्रांना फोन करून सांगितले कि त्यांनी अनिल थत्ते यांना संधी देऊन कशी स्वतःची केवळ सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी नाचक्की करून घेतली आहे ज्यामुळे अनिल थत्ते या संपलेल्या पत्रकाराचा स्वतःचा कसा मोठा फायदा होणार आहे आणि तुमची कोणत्या खालच्या थराला जाऊन बदनामी होणार आहे, माझ्या या पुराव्यांसहित बोलण्याची निरोपाची दखल मात्र लगेच तरुण भारत वेब चॅनेल परिवाराने घेतली आणि अनिल थत्ते यांना म्हणाल तर या चॅनेल वरून काढून टाकले म्हणाल तर त्यांचे ते उथळ आणि थापेमार बोलणे बंद केले. आपण भीडभाड न बाळगता न घाबरता सतत लढाईचे असते मग लढतांना यश मिळो अथवा न मिळो…
अलीकडे गुरु पौर्णिमा पार पडली त्यानिमीत्ते मी हेच सांगितले कि प्रत्येक हिंदूंच्या आयुष्यात चार व्यक्तींना अनन्यसाधारण महत्व असते ते आहेत आई वडील गुरु आणि सदगुरु, आम्ही हिंदू, आई वडील गुरु आणि शेजारच्या काकू असे कधीही म्हणत नाही किंवा आई वडील गुरु आणि राखी सावंत असेही कधी म्हणत नाही किंवा आई वडील गुरु आणि शेजारची खट्याळ तरुणी असेही अजिबात म्हणत नाही, हिंदूंच्या आयुष्यात आई वडील गुरु आणि सदगुरु या चौघांना परमेश्वर मानले जाते देव्हार्यातच स्थान असते. आई वेश्या असली तरी ती ज्यांच्यासाठी आपले शरीर विकते त्या पोटच्या मुलांसाठी ती नक्की देव असते किंवा वडील तुरुंगातून सुटून आले तरी पोटची मुले त्यांच्या पायावर डोके ठेवून मोकळे होतात. तेच दैवी स्थान आपल्या मनात आपापल्या सदगुरु विषयी असते आपण त्यांनाही थेट देव मानून त्यांना कायम देव्हाऱ्यात स्थान व मान देत असतो पण अलीकडे काही वर्षात घडले असे कि भारतातल्या जवळपास समस्त सदगुरु मंडळींनी त्यांच्या भक्तांच्या दुर्बल मानसिकतेचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आपल्या भक्तांच्या शरीराचे व पैशांचे लचके तोडायला जवळपास साऱ्याच सदगुरूंनी सुरुवात केली आणि त्यांचे हे विकृत लोभी वागणे जेव्हा भक्तांच्या लक्षात आले तेव्हा त्यातले काही तुरुंगात गेले नरेंद्र अनिरुद्ध सारखे काही लपून बसले एकाने म्हणजे भय्यू महाराज यांनी तर थेट आत्महत्या केली आणि आपल्या मागे चार अबला तसेच प्रचंड काळी संपत्ती ते सोडून गेले. वयस्क आई, पहिल्या पत्नीपासून झालेली तरुण देखणी मुलगी, दुसरी चतुर व देखणी पत्नी आणि तिच्यापासून झालेली अपंग मुलगी त्यापैकी अलीकडे त्यांच्या आईचे निधन झाले आहे आणि महाराजांची गादी नेमकी कोणाकडे त्यात पत्नी व मुलगी यात जीवघेणी स्पर्धा सुरु आहे.
भय्यू महाराज हा विषय मी कधीतरी आणखी व्यापक घेईल पण भक्तांची अधिक मान्यता महाराजांच्या कन्येस म्हणजे कुहू हिलाच असल्याने तिने हळूच या क्षेत्रात पाय रोवायला पसरायला सुरुवात केल्याचे माझ्या कानावर आले आहे. हरकत नाही पण जे मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या साक्षीने अगदी जीव तोडून भय्यू महाराजांना सांगत होतो तेच मला आज याठिकाणी सर्वांदेखत सर्वसाक्षीने कुहूला देखील सांगायचे हेच आहे कि तुम्हाला जर बुवा बाबा व्हायचे असेल त्यात यशस्वी ठरायचे असेल तर सर्वप्रथम तुमचा अध्यात्मावर प्रचंड अभ्यास हवा आणि भाषेवर पकड हवी ज्या दोन्हीचा भय्यू महाराजांकडे अभाव होता तसेच कोणत्याही बुवाला ज्योतिष शास्त्राचा आणि जादू शास्त्राचा देखील अभ्यास हवा त्यासाठी कलकत्त्यासारख्या ठिकाणी काही महिने घालवून जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत आणि ज्योतिष शास्त्राचा देखील एखाद्या गुरुकडे राहून अभ्यास व्हायला हवा, जे मी भय्यू महाराजांना सांगत होतो तेच कुहूला देखील सांगायचे आहे कि जर लोकांनी भक्तांनी तुला सदगुरु म्हणून बघावे असे मनापासून वाटत असेल तर केवळ देवासारखे देखणे रूप असून उपयोगाचे नसते, हि इतर लबाडी देखील इतर भामट्या महाराजांसारखी तंतोतंत येणे अत्यावश्यक असते म्हणजे बुवाबाजीचे दुकान त्या नरेंद्र अनिरुद्ध सारखे खूप जोरात चालायला लागते. तसेच सतत सखोल विविध विषयांचे वाचन देखील हवे. कुहू तू स्वतःची ओळख द्यायला सुरुवात केली आहे तशी सुरुवात तुझ्या लबाड सावत्र आईने देखील केलेली आहे पण तिला महाराजांच्या भोळ्या भक्तांची देखील वारसदार म्हणून अजिबात मान्यता नाही जी सिम्पथी महाराजांची खरी वारसदार म्हणून तुला नक्की मिळणार आहे. कीप इट अप पण सावध राहा, स्वतःचा भय्यू महाराज करवून घेऊ नको, बुवाबाजीचा आधी सखोल अभ्यास कर अगदीच जमले तर कोणतेही नाटक न करता समाजसेवेचे व्रत स्वीकार कर, तुला नक्की यश मिळेल. पण सभोवतालची माणसे व्यवस्थित पारखून घे, जी चूक भय्यू महाराजांनी केली म्हणजे सतत भामटे नीच चोर लबाड हलकट बदमाश बदनाम माणसे जवळ ठेवून त्यांनी स्वतःचे फार मोठे नुकसान करवून घेतले ती चूक न करण्याचा तू प्रयत्न कर, महाराज होणे तुला वारसदार असल्याने तसे फारसे कठीण नाही, पण सावध राहा…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी