अशोक शंकरराव चव्हाण : पत्रकार हेमंत जोशी
अशोक दीनानाथ चव्हाण सिनेमातला हिरो अशोक शंकरराव चव्हाण राजकारणातला अमिताभ, अनेकदा हा नेता पडतो पण पुन्हा उभा राहतो. नेत्याने किंवा माणसाने चतुर असावे पण लबाड असू नये, अशोकराव हे फारसे चतुर नव्हते आणि लबाड तर कधीच नव्हते म्हणून ते मित्रांकरवी फसले किंवा अडकले, काळाच्या ओघात त्यांना अनुभव समृद्ध बनवत गेला त्यामुळे यावेळी मंत्री झालेले अशोकराव नक्की वेगळे आहेत सावध आहेत वरमले आहेत नरमले आहेत, चांगले आणि वाईट त्यांना नेमके समजू लागले आहे त्यामुळे यानंतर ते अडकतील असे होणार नाही किंवा अडकण्यासाठी भानगडी पण ते करणार नाहीत. मला चतुर माणसे आवडतात पण लबाड माणसांचा मला प्रचंड तिटकारा आहे अशांचा मला मनापासून राग येतो, चतुर नेते चतुर नातलग चतुर माणसे मला नक्की आवडतात पण लबाड माणसे आधी इतरांचा नाश करतात इतरांचे मोठे नुकसान करून ठेवतात नंतर देव त्यांना देखील नक्की सोडत नाही म्हणजे लबाडांचा वक्त चांगला असतो पण चांगला वक्त निघून गेल्यानंतर अशा लबाडांचे हाल बघवत नाहीत. अशोक चव्हाण ना लबाड होते काहीसे चतुर होते आहेत पण मोह अजिबात गरज नसतांना त्यांना भुरळ पाडतो आणि अशोकराव आपले मोठे राजकीय नुकसान त्यातून करवून घेतात, यावेळी मात्र ते नक्की सावधान दक्ष आहेत त्यामुळे कोणत्या मोहाला बळी पडू नये त्यांच्या ते लगेच लक्षात येते आणि त्यांचे होणारे राजकीय नुकसान टळते. फार आधी फार पूर्वी माझ्यात आणि अशोक चव्हाण यात दिसण्यात खूपसे साम्य होते त्यामुळे त्यांच्या काही मैत्रिणी मला आय लव्ह यु म्हणाल्याचे आठवते अर्थात त्यांचेही तेच झाले असेल, माझ्या मैत्रिणी अधिक देखण्या त्यामुळे अशोक चव्हाण अधिक फायद्यात राहिले असतील, सहज गंमत केली…
मित्रांनो, यशस्वी व्हायचे असेल तर चतुर व्हा पण लबाड होऊ नका तसेच नद्या, तीक्ष्ण नखे असणारे प्राणी, शिंगे असणारे पशु, लबाड माणसे आणि घातकी स्त्रिया तसेच या देशातल्या या राज्यातल्या कोणत्याही नेत्यावर पटकन विश्वास कधीही टाकू नका अत्यंत महत्वाचे म्हणजे पत्रकार ( मीडिया ) पुढारी, पोलीस आणि व्यापारी कधीही कोणाचे नसतात जेथे या चौघांचे स्वतःचे काम सुरु होते तेथे त्यांना जगातले कोणतेही नाते विसरायला होते. पण यातले काही अपवाद देखील असू शकतात जसे अशोक शंकरराव चव्हाण वडिलोपार्जित नेते आणि पुण्यातले नामवंत जयंत शाह देखील वडिलोपार्जित व्यापारी पण या दोघात गेली चार दशके असलेली मैत्री अतूट आहे म्हणजे दोघांचेही प्रोफेशन एकमेकांना दगा फटका करणारे धोका देणारे पण या दोघात तसे अजिबात नाही याउलट जेव्हा केव्हा जयंत शाह कुठल्याशा अडचणीत चुकून माकून आले तर हेच अशोक चव्हाण अगदी हातचे महत्वाचे काम टाकून आपल्या या जिवलग मित्रासाठी धावून जातात आणि राजकीय संकट मग तो आदर्श घोटाळा असो किंवा अशोक चव्हाण किंवा दिवंगत शंकरराव यांचे आजवर सत्तेत कधीकाळी नसणे, जयंत शाह यांनी कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी व कठीण कालखंडात अशोक चव्हाण यांचा हात सोडला नाही उलट अगदी उघड आपल्या हातात घट्ट धरून ठेवला, दोघांनाही एकमेकांच्या मैत्रीची आणि प्रोफेशनची कधीच लाज वाटली नाही. या दोघांची मैत्री व ओळख दिवंगत नेते चिमणराव कदम यांनी सर्वप्रथम करून दिली जी आजतागायत टिकून राहिली आहे. जसे जयंत शाह मित्र झाले म्हणून अशोक चव्हाण राजकारणात मोठे झाले असे जे नाही तसे जयंत शाह हे देखील जळ्गावचे सुनील झंवर नाहीत कि एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी जसे झंवर यास जवळ घेतले आणि तो काळ्या पैशांनी मोठा झाला तसे जयंत शाह यांचे अजिबात नाही ते अशोक चव्हाण यांच्याशी ओळख दोस्ती होण्यापूर्वीच पुण्यातले यशस्वी बिल्डर आणि उद्योजक होते जसे अविनाश भोसले यांच्यासारखे पुण्यातले प्रतिष्ठित व्यावसायिक अगदी त्याच रांगेतले जयंत शाह, फार पूर्वीपासून विविध व्यवसायात गुंतलेले आणि मोठे असलेले श्रीमंत व्यापारी. अशोक चव्हाण जर सत्तेत असतील तरच जयंत शाह यांची चांदी अशी सुनील झंवर सारखी शहा यांनी कधीही खालची पातळी गाठलेली मी बघितलेली नाही पण चव्हाण आणि शाह या दोघातल्या मैत्रीचा जसा शंकरराव आणि पुष्पाताईंना अभिमान होता त्याच पद्धतीची या दोघांच्या मैत्रीची चर्चा अनेकदा ऐकायला येते ज्यात वाईट असे काहीही नाही…
क्रमश: हेमंत जोशी