ज्याचे लफडे त्याला ईडी नडे : पत्रकार हेमंत जोशी
आपण लहान मुलांशी तोतरे बोलतो म्हणून तीही आपल्याशी बोबड्या तोतऱ्या भाषेत बोलतात. सभोवती जसे वातावरण जशी माणसे तसे आपण घडत जातो घडत असतो. माझ्या ओळखीत एक नवदाम्पत्य होते, दाराची कडी बाहेरून वाजली रे वाजली कि त्यातली नवपरिणिता झटक्यात उठून का कोण जाणे पण एकतर ती दाराआड लपायची किंवा पलंगाखाली जाऊन पाय दुमडून ओणवी व्हायची तिचा नवरा पण तसलाच म्हणजे तो देखील घराबाहेर पडतांना तिला घर खर्चासाठी जे पैसे द्यायचा, देतांना हात उंच करयचा आणि हि जागच्या जागी त्यात निष्णात असल्यासारखी उडी मारून पैसे पटकवायची. अलीकडे कोरोना असल्याने आपण बहुतेक सामान स्विगी झोमॅटो किंवा तत्सम एजन्सीज कडून मागवतो त्यात घडते असे कि सामान माल वस्तू खाद्य पदार्थ इत्यादी घेऊन येणारी मुले मुद्दाम त्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत सांगतात आणि आर्थिक कुवतीनुसार आपण त्यांच्याकडे सुटे नाहीत असे समजून त्यांना राहू द्या तुमच्याकडे सांगून मोकळे होतो. असे करू नका कारण ग्राहकांना मोठ्या रकमेने दिवसभर लुटण्याची या मंडळींना ती सवय लागली आहे. सुटे घेऊन या त्यानंतरच बॅलन्स पेमेंट करू असे जर त्यांना तुम्ही ठणकावून सांगितले तर ते झक मारून बहुतेकवेळा तेथल्या तेथे खिशातून सुटे काढून देतात, वाटल्यास असे करून बघा त्यातून त्यांना वाईट सवयी लागणार नाहीत आणि तुमचीही होणारी आर्थिक लूट तदनंतर होणार नाही. तोच प्रकार प्रत्येक पेट्रोल पॅम्पवर घडतांना आपण बघतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नकळत फसले जातो. समजा तुम्ही साडे पाचशे रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल इत्यादी भरले तर तुमच्या असे लक्षात येईल कि तेथली माणसे ५४९ रुपयांचे इंधन भरून मोकळे होतात आणि उरलेली चिल्लर मोठ्या खुबीने स्वतःच्या खिशात टाकतात.प्रत्येक पेट्रोल पंम्पवर दिवसभरत शेकडो वाहने इंधन भरण्यासाठी येतात सारेच्या सारे नकळत असे लुटल्या जातात. बाजूला होऊन वेळ काढून इंधन भरणाऱ्या अशा हाइमखोरांची आई बहीण घ्या म्हणजे त्यातून आपली सुटका होऊ शकेल. काय या भारतीयांच्या वाईट सवयी, ज्याच्या हाती ससा तो पारधी पद्धतीने जो तो लुटण्याचा लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात गुंतलेला असतो…
अनिल देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे त्यात त्यांना आणि स्वतःला आर्थिक फायदा करवून देणारे आणि घेणारे काही अडकले आहेत पण काही खुबीने नकळत सटकले आहेत अशा बदमाशांची चौकशी होणे आत्यंतिक गरजेचे आहे. म्हणजे अनिल देशमुख मंत्री असतांना त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार जो बघत असे किंवा अनिलबाबू यांची आर्थिक उलाढाल जो नियमित मंत्रालयातील त्यांच्या अँटी चेंबर मध्ये बसून बघत असे तो पुण्याचा प्रदीप देशमुख वास्तविक संजीव पलांडे किंवा राजेंद्र अहिवार यांच्याच जोडीने जबाबदार पण ईडी अद्याप त्याच्यापर्यंत का पोहोचलेली नाही हे मोठे कोडे मला अनेकांना पडलेले आहे. जर राजेंद्र अहिवार आणि प्रदीप देशमुख यांना इतरांसारखे ईडी ने बोलते केले तर देशमुखांच्या घरातून आणखी मोठे घबाड शंभर टक्के बाहेर पडणार आहे कारण सोने चांदी व मोठाल्या रोख रकमा नेमक्या कोठे लपविण्यात आलेल्या आहेत हे जसे अनिलबाबू सलील देशमुख यांनाच माहित आहेत तेवढीच इत्यंभूत माहिती पुण्याच्या प्रदीप देशमुख कडे आहे. अनिल देशमुख आरती देशमुख पायल देशमुख व त्यांचे आत्त्ताचे पती, सलील देशमुख व त्यांच्या अधिकृत पत्नी, ऋषी देशमुख व त्यांच्या अधिकृत पत्नी त्याशिवाय योगेश कोठेकर, संजीव पलांडे, केतन शिंदे, रवी व्हटकर, नाना कातखेडे, विशाल कदम, रमेश मनाले, राजेंद्र अहिवार, राणे, वैभव तुमाने, राजा हरले, पाटणकर, भोयर आणि नागपुरातल्या ज्या पाच मित्र मंडळींकडे ईडीने धाड मारली या सर्वांची जर पुन्हा ईडी ने सखोल चौकशी केली तर मला खात्री आहे कि आज जे त्यांच्या हाती लागले आहे ते हिमनगाचे टोक आहे, अद्याप बरीच माहिती लपविण्यात आलेली आहे, ईडी ने आणखी युक्तीने व खुबीने अनिल देशमुख आणि त्यांचे आर्थिक झोल सांभाळणारे जे जे होते त्या सर्वांची सखोल चौकशी करायला हवी, प्रकरण अधिक गंभीर होत जाईल. शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे राजेंद्र अहिवार यांना जी सायरन वाजणारी एर्टिगा मारुती कार क्रमांक एम एच ०१ एएन २०९६ ज्या पोलीस अधिकाऱ्याने उपलब्ध करून दिलेली होती ती देखील त्या अधिकाऱ्याला दमदाटी करून राजेंद्र अहिवार याने मिळविलेली होती, त्या वर्षभरात जो ड्रायव्हर या होता त्याच्याकडे म्हणे अहिवार यांच्याविषयी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. बघूया काय घडते ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी