अंतिम भाग : एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी
मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे खडसे घराणे म्हणजे मराठवाड्यातले निलंगेकर पुण्यातले शिवतारे नागपुरातले देशमुख मुंबईतले ठाकरे साताऱ्यातले भोसले नव्हेत कि ज्यांच्या घरात घराण्यात कुटुंबात उभी फूट पडलेली आहे म्हणजे सून रक्षा आणि सासरे एकनाथ किंवा वहिनी रक्षा आणि नणंद रोहिणी यांच्यात विस्तव देखील जात नसल्याने एकनाथजी व रोहिणी भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेले आणि सून रक्षा केवळ द्वेशापोटी त्वेषातून भाजपा मधेच राहिल्या. अजिबात तसे खडसे यांच्याकडे घडलेले नाही याउलट विशेषतः निखिल गेल्यानंतर ते सारे एकमेकांना घट्ट पकडून आणि बिलगून आहेत त्या साऱ्यांचे एकमेकांशिवाय पानही हलत नाही. खासदार रक्षा यांचे भाजप मध्ये असणे हि त्यांच्या घरातली केवळ टेक्निकल आणि पोलिटिकल ऍडजेस्टमेंट आहे म्हणजे खासदारकीची हि टर्म संपली रे संपली कि पुढल्या क्षणी रक्षाताई सासर्याच्या पायावर डोके ठेऊन शरद पवार कसे खडसे कुटुंबाचे तारणहार सांगून बोलून नक्की मोकळ्या होणार आहेत आणि हे भविष्य त्या परिसरातले शेम्बडे पोर किंवा प्रल्हाद पाटलांचा रवींद्र देखील सांगून मोकळा होईल. रवींद्रभैय्या प्रल्हादराव पाटील हा आत्ता आतापर्यंत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात थेट एकनाथ खडसे यांचा प्रतिस्पर्धी आणि शरद पवार यांचा लॉयलिस्ट पण रवींद्र म्हणजे लग्न करताच विधवा होणाऱ्या बाईसारखा म्हणजे तो जेव्हा केव्हा विधानसभेला उभा राहिला दणक्यात पडला जसे एखादीचे लग्न झाले किंवा ठरले तरी ज्याच्याशी ठरले त्याचा हमखास मृत्यू होतो तसे या रवींद्रचे, आता तर एकनाथ खडसे थेट राष्ट्रवादीत आल्याने रवींद्र याला हातात ताट घेऊन त्यांना ओवाळण्याकडे फारसे काम उरलेले नाही आणि हीच जळगाव जिल्ह्यातल्या खडसे येण्याआधी मूळ राष्ट्रवादीकर असलेल्या प्रत्येकाची मोठी खंत आहे कारण त्या सर्वांचा एकनाथ खडसे यांनी रवींद्रभैय्या करून ठेवला आहे म्हणजे हातात ताट घेऊन एकनाथजी यांना ओवाळण्याची तेवढी जबाबदारी त्यांच्याकडे आलेली किंवा उरलेली आहे. या जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा सर्वाधिक मूळ पुरुष म्हणजे अरुण गुजराथी, पवारांनी या नेत्याला त्याच्या कुवतीपेक्षा खूप काही दिले आता मात्र याच अरुण गुजराथी यांची खडसे यांच्या येण्याने अवस्था सतत बाळंतपण येणाऱ्या बाईसारखी झालेली आहे म्हणजे कधी पोटुशी तर कधी बाळंतपणाला त्यामुळे घाईबाहेर न पडणाऱ्या दहा अकरा लेकरं होणाऱ्या बाईसारखे अरुण गुजराथी यांचे झाले आहे म्हणजे जेथे तेथे एकनाथ खडसे आणि अरुण गुजराथी नव्या सुनेसारखे तोंडाला पदर लावून दाराआड उभे आणि नेमके हेच दुःख राष्ट्र्वादीतल्या मूळ नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आहे त्यांचे खडसे यांच्या येण्याने उरले सुरले सारे महत्व संपले आहे. मूळ मुद्दा येथे भाजपा आणि खडसे हा आहे आणि अर्थात आपल्यापेक्षा नरेंद्र मोदी यांना नक्कीच राजकारणातले अधिक कळते वरून हा निर्णय तर त्यांनी स्वतः घेतलाय, मंत्री मंडळ विस्तारात खासदार रक्षा यांना राज्यमंत्री करण्याचा किंवा तसे अगदीच अडचणीचे ठरले तर एखाद्या महत्वाच्या मंडळावर तेही थेट अध्यक्ष म्हणून एकनाथ यांच्या सुनेला घेण्याचा. मोदी उगाच कोणतीही रिस्क घेणार नाहीत म्हणजे रक्षा यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन ते नक्कीच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत, काहीतरी महत्वाची राजकीय गणिते रक्षा यांना महत्व देण्यामागे नक्की दडलेली आहेत किंवा असावीत. जो आपला नाही किंवा आपला होणार नाही त्याला धूर्त नरेंद्र मोदी आणि त्यांचे मानसपुत्र देवेंद्र कधी जवळ करणार नाहीत, कुछ तो है…
आता आणखी एक अतिशय खळबळजनक लक्ष वेधून घेणारा मुद्दा त्या गिरीश महाजन यांचा. एकनाथ खडसे यांचे डोक्यावर बसून वरून अरेरावी व भ्रष्टाचार करणे फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांना त्रासाचे ठरले होते त्यामुळे त्यांनी खडसे यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आणि जळगाव जिल्ह्यात त्यानंतर मंत्री झालेल्या असलेल्या गिरीश महाजन यांचे महत्व वेगाने वाढले त्यांच्याकडे देवेंद्र यांचे सर्वाधिक जवळचे मित्र व सहकारी आणि संकटात धावून जाणारे अशी आपोआप इमेज तयार झाली पण महाजन यांना भाजपामधले आपले हे उत्तममस्थान टिकविता आले नाही असे दिसते आहे कारण गिरीश महाजन व त्यांच्या जवळच्या सुनील झंवर सारख्या नालायक नीच पाठिराख्यांचे विविध घोटाळ्यात नाव पुढे येणे तसेच त्यांनी अचानक जमा केलेली अवैध संपत्ती आणि त्यांचे काही बाबतीत वादग्रस्त वर्तन, हे प्रकार भाजपा व संघ श्रेष्ठींनी गांभीर्याने घेतले आहेत जर जळगाव जिल्ह्यातल्या मूळ संघ व भाजपावाल्यांना, स्त्रियांना, कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना महाजन यांच्याकडे जातांना व्यथा मांडतांना अवघड ठरणारे असेल तर ते महाजन यांचे मोठे अपयश आहे जे तेथे त्यांच्याबाबतीत घडते घडलेले आहे. आणि हि नेमकी संधी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे कि एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडल्याने आणि गिरीश महाजन यांचे स्थान काहीसे भाजपा श्रेष्ठींनी डळमळीत केल्याने एखादा नवा पण उत्तम नेता आता जळगाव जिल्ह्यातल्या भाजपाची गरज आहे नवोदित नेत्यांना चालून आलेली हि मोठी संधी आहे. पण मला वाटते आपण कुठे कमी पडतो आहे कुठे चुकतो आहे कुठे पार बदनाम झालो आहे त्यावर जर चिंतन करून गिरीश यांनी स्वतःमध्ये काही बदल वेगाने घडवून आणले तर त्यांच्यावर नजीकच्या काळात एकनाथ खडसे होण्याची नक्की वेळ येणार नाही कारण काही घाणेरडे दोष सोडले आणि रामेश्वर सारखी विकृत भ्रष्ट माणसे जर महाजन यांनी खड्यासारखी बाजूला केली तर कम्पेअर टु खडसे, महाजन हे नेतृत्वात अतिशय सरस आणि दिलदार वृत्रीचे उत्साही व उत्सवी नेते आहेत ते खान्देशातले हवेहवेसे वाटणारे लोकप्रिय व लोकमान्य नेते आहेत, कालपर्यंत एकनाथ खडसे यांच्या मागे पुढे पूजेचे ताट घेऊन फिरणारे हेच गिरीश महाजन आज दिवंगत मधुकरराव चौधरी, सुरेशदादा जैन, प्रतिभाताई पाटील, एकनाथ खडसे यांच्या रांगेतले ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते म्हणून पुढे आले आहेत फक्त त्यांनी वेळीच वयानुसार स्वतःच्या काही वाईट सवयींना आवर घालावी आणि काम सुरु ठेवावे म्हणजे त्यांना पुढली काही वर्षे भाजपाने खडसे यांच्यासारखे दुर्लक्षित केले, कानावर पडणार नाही मात्र आजच्या तारखेला महाजन यांचे महत्व कमी करावे का त्यावर भाजपा श्रेष्ठींमध्ये विचारविनिमय सुरु आहे, महाजन यांनी स्वतःचा एकनाथ खडसे करून घेऊ नये, नेता तसा खूप चांगला आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी