भाग २ : एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी
अगदी काल परवा ज्याचे गांधी घराण्याशी थेट संबंध आहेत म्हणजे असा नेता ज्याला अमुक मुद्दा पटला नाही तर तो सोनिया गांधी यांना वाकुल्या दाखवून मोकळा होतो काही चुकले तर राहुलच्या आईसमोर तो आणि राहुल उठाबशा काढून मोकळे होतात किंवा प्रियांका ज्याला थेट राहुल मानते, या अशा राज्यातल्या प्रभावी नेत्याला मी मुद्दाम विचारले कि या दिवसात नाना पटोले एकला चलो रे ची भाषा करताहेत त्यात कितपत तथ्य आहे त्यावर तो म्हणाला नाना करतो बोलतो ते एक नाटक आहे असे कोणतेही आदेश पटोले यांना नाहीत कि महाआघाडीशी पंगा घ्या त्यांच्याशी दंगा करा आणि लगेच महाआघाडीतून बाहेर पडा याउलट हे सरकार आणि आपण सत्तेत कसे टिकून राहू याची काळजी घ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीशी जुळवून घ्या, पवारांच्या कडेवर बसून गावभर फिरून या आणि उद्धव यांना भर चौकात आधी डोळा मारा नंतर फ्लायिंग किस देऊन मोकळे व्हा थोडक्यात काँग्रेस नजीकच्या काळात किंवा भविष्यात किमान हि पंचवार्षिक योजना संपेपर्यंत महाआघाडी मोडण्यात भाग घेणार नाही आणि शरद पवार यापुढे भाजपासंगे जातील अशी शक्यता मावळली आहे कारण वादग्रस्त मुस्लिमव्यस्त राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपा या राज्यात पायावर धोंडा मारून घेणार नाही किंबहुना यापुढे पवारांच्या शेजारी त्यांच्या पंगतीला बसावे हे आता नरेंद्र मोदी यांच्या मनात नाही थोडेफार मनातून ते तसे व्हावे असे केवळ नितीन गडकरी यांना आजही आताही वाटते पण या मुद्द्यावर मोदी हे गडकरी यांचे ऐकतील असे नक्की नाही थोडक्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीतून बाहेर निश्चित पडणार नाहीत त्यांना खरा धोका शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यापासून आहे आणि पवारांना हे माहित आहे कि डेंजर राजकीय खेळी खेळण्यात उद्धव त्यांच्या पुढे आहेत, उद्धव शिवसेनेत उतरले तेव्हापासून आजपर्यंत एकदाही अयशस्वी ठरले झाले नाहीत म्हणजे अतिशय खुबीने ते आजही राज ठाकरे यांना भावनिक होऊन जवळ घेतात त्यांचा त्या त्या वेळी राजकीय उपयोग करून घेतात त्यानंतर अलगद बाजूला सारतात राजकीय नुकसान राज ठाकरे यांचे होते आणि उद्धव गालातल्या गालात किंवा रश्मी वहिनींकडे बघून खुद्कन हसून मोकळे होतात. अत्यंत महत्वाचे माझे पुढले वाक्य लक्षात ठेवा कि जर उद्धव यांनी हि विधानसभा यशस्वी राबवली तर या राज्यातले ते नक्की नंबर एकचे नेते ठरणार आहेत पण ते जर का यावेळी अयशस्वी ठरले तर शिवसेना पुढले दहा वर्षे शंभर टक्के बॅक फूटवर गेलेली असेल आणि त्यांचे अनेक महत्वाचे नेते कदाचित ठाकरे कुटुंब चौकशांच्या गंभीर फेऱ्यात अडकून शिवसेनेची बऱ्यापैकी विल्हेवाट लागलेली असेल असे न घडावे म्हणून उद्धव पुढल्या काही महिन्यात काही दिवसात कदाचित महत्वाचा निर्णय घेऊन मोकळे होतील ते महाआघाडीतून बाहेर पडतील आणि पुन्हा या राज्यात युतीचे सरकार सत्तेत येऊन भाजपाचा वरचष्मा सत्तेत असेल. किरीट सोमय्या स्वतःहून काहीही बोलत नाहीत आधी ते वरिष्ठ नेत्यांचे आदेश घेतात त्यानंतर देवेंद्र किंवा मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील सारख्या नेत्यांशी बोलून घेतात त्यानंतर विविध वाहिन्यांसमोर येऊन बॉम्ब फोडून मोकळे होतात.
हा लेख लिहीत असतांना त्यांनी उघडपणे जाहीर केले आहे कि अनिल देशमुख गजाआड गेल्यानंतर तशीच वेळ आधी अनिल परब त्यानंतर मिलिंद नार्वेकर या उद्धव यांच्या उजव्या डाव्या हातावर येणार आहे आणि सारे परवडले पण ईडीचा ससेमिरा नको असे मी यासाठी म्हणतोय कि जेव्हा एखाद्या व्यक्तीची ईडीसमोर चौकशी होते तेव्हा ति त्या एकट्या व्यक्तीची नसते तर ज्याची चौकशी होते ते ज्यांच्याशी एकरूप आहेत क्लोज आहेत त्यांची देखील ईडीवाले खुबीने माहिती घेऊन मोकळे होत असतात, मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल त्यामुळे उत्तम नेता प्रसंगी चार पावले मागे येतो त्यानंतर पुढल्या चालीचे मनसुबे रचत असतो. मला नाही वाटत उद्धव ठाकरे यांना केंद्र सरकारशी यापुढे कांही काळ पंगे घेणे मस्ती करणे परवडणारे आज नेमके हे शरद पवार यांच्या देखील लक्षात आलेले आहे असावे कि उद्धव महा आघाडीतून बाहेर पडतील जर त्यांना भाजपाने या राज्यात युती करण्याची परवानगी दिलेली असली तरच. आणि हो, संजय राऊत हे शरद पवार यांचे खास आहेत हे तुम्ही मनातून काढून टाका तसे कधीही होणार नाही कि राऊत यांनी सेनेला सोडले आणि ते थेट पवारांना जाऊन बिलगले. जे सकाळी सकाळी उद्धव आणि संजय राऊत यांच्यात ठरते तसेच दिवसभर संजय यांच्याकडून बोलले जाते त्यामुळे पुढल्या काही दिवसात जर संजय महाआघाडी तोडण्याची भाषा करू लागले आणि भाजपाचे गुणगान गाऊ लागले तर निदान मला तरी त्यात काहीही आश्चर्य वाटणार नाही. उद्धव यांच्या थेट गळ्यापर्यंत सध्या पाणी आलेले आहे जे मला माहित आहे त्यामुळे ते स्वतःला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करतील स्वतःचा लालूप्रसाद यादव ते करवून घेणार नाहीत, लालू प्रसाद यांच्या मार्गावर या दिवसात उद्धव ठाकरे नाहीत शरद पवार आहेत. केंद्र सरकार आपले काहीही बिघडवू शकत नाही पवारांचा हा भ्रम ठरला आहे, पुढले काही दिवस राज्यातल्या राजकीय घडामोडीचे आहेत, त्यातून नक्की काहीतरी चांगले निघावे, ज्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा त्यांचे धिंडवडे निघावेत. नरेंद्र मोदी किमान दहा वर्षे सत्तेत असावेत मस्त जगावेत कारण जे सामान्य माणसाच्या मनात असते ते मोदी घडवून आणतात एखाद्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखे…
क्रमश: हेमंत जोशी