बापरे! जे घडले तुमच्यासाठी जसेच्या तसे : पत्रकार हेमंत जोशी
अमुक करा तमुक करू नका, सांगणे माझे काम आहे, ऐकणे न ऐकणे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. ज्यांची पत्नी हयात नाही किंवा जे अविवाहित आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा ज्यांची पत्नी एखादया दुर्धर आजाराला खिळलेली असते त्यांनी एखाद्या स्त्रीच्या प्रेमात अडकणे पडणे ठीक आहे किंवा ज्यांच्या नशिबी पत्नीचे सुख अजिबात लिहिलेले नसते त्यांनी अशा सात्विक सुखाचा शोध घेणे आपण नक्की समजू शकतो हीच मात्रा स्त्रियांना पण लागू पडते, मला अतिशय मनापासून राग येतो अशा स्त्री पुरुषांचा जे दरदिवशी हमखास व हक्काने सारी सुखे पती किंवा पत्नीकडून मिळवतात तरीही बाहेर शेण खायला जातात आणि स्वतःची घराची पैशांची अपत्यांची कुटुंब सदस्यांची धूळधाण करवून घेतात. ज्या पुरुषांना आपली बायको आवडत असते किंवा ज्या पती पत्नीचा संसार नेटका सुरु असतो असे स्त्री किंवा पुरुष बाहेर देखील सेक्स पैसा ऐयाशी साठी जेव्हा कायम शोधात असतात किंवा भटकत असतात त्यांना माझ्या मते अद्दल घडायलाच हवी. वाचक मित्र व मैत्रिणींनो, जे मी येथे तुम्हाला सांगतोय त्यात आपण कुठे आहोत त्याचा शोध तुम्ही घ्यायला हवा. माझी हि सत्य घटनेवरील दोन भागातली लेखमाला आधी वाचा नंतर जपून ठेवा इतरांना वाचायला द्या. तुम्हाला तर हे नक्की माहित आहे कि मी जसे इतरांचे न डगमगता लिहितो तसे स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांचे मित्रांचे किंवा प्रसंगी घरातल्यांचे देखील वाभाडे काढून मोकळा होतो कारण स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून, वृत्तीचा मी लेखक संपादक किंवा पत्रकार अजिबात नाही आणि हि लेखमाला तर तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्यावी ठेवावी अशी नक्की आहे. येथे मला वारंवार तेच सांगायचे आहे कि तुम्हाला जर उत्तम पत्नी किंवा उत्तम पती असेल तर एक्स्ट्रॉ प्रेमाच्या शोधात नक्की राहू नका किंवा पडू नका. भरकटलेल्या भरकटणाऱ्या बिघडलेल्या सारी सुखे पायाशी असतांना स्त्री पुरुषांच्या व्यसनाधीनतेतून वाढतात त्या अडचणी आणि अशांचे घर, कुटुंब हमखास उध्वस्त होते. ज्यांच्या कुटुंबात संताप आणि व्यसने घुसली ते घर बघता बघता रसातळाला जाते, आजूबाजूला बघा तुमच्या ते लक्षात येईल…
मी येथे माझ्या मित्राचे नाव देखील बदलेले नाही बदलणार देखील नाही फक्त त्याच्या आडनावाचा उल्लेख मला करणे अवघड आहे. सुभाष लैंगिक दृष्ट्या पार अधू व्यापारी जमातीतील हा ७२ वर्षीय उत्तम व्यावसायिक, पत्नीशी त्याचे या वयातही एकदम रोमँटिक ट्युनिंग म्हणजे आजही दोघे एकमेकांच्या अगदी हातात हात घेऊन न चुकता जग फिरून येतात तरीही त्याला घरातले श्रीखंड चघळण्याचा कंटाळा आला कि सुभाष बाहेर पाणी पुरी शोधतो म्हणजे त्याला चव बदलायची म्हणाल तर सवय आहे म्हणाल तर आवड आहे पण सुभाषचे एक चांगले आहे कि बाहेर जे विकत मिळते त्यावरच जमेल तेवढा या वयात जमेल तसा हात मारायचा आणि लैंगिक भूक भागवून संध्याकाळचा पेग घरी येऊन बायकोकडूनच भरून घायचा. स्वतःला विकणाऱ्या बायकांच्याच तो प्रेमात पडतो घरंदाज बायका शोधण्याच्या तो भानगडीत नसतो आणि हे असे सुभाष या समाजात स्त्री किंवा पुरुषांच्या रूपात जागोजाग बघायला मिळतात. घरात पतीशी अतिशय उत्तम लैंगिक व प्रेमाचे संबंध पण बाहेरही बॉय फ्रेंड ठेवून गटवून पटवून त्याच्याकडून कित्येक तास लैंगिक किंवा आर्थिक सुख मिळविणाऱ्या बायका देखील अलीकडे प्रत्येक गल्लीतून दिसतात असतात ज्यांच्या या विकृत वृत्तीचा मला अतिशय तिटकारा आहे. ज्यांना घरात कोणतेही मानसिक व लैंगिक सुख नाही अशा स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या प्रेमात पडून उत्तम वैवाहिक जीवनाचे सुख मिळविणे किंवा कुठेतरी एकांतात बसून त्यावर मनोरथ रचणे नक्की वाईट नाही पण घरी सारी सुखे मिळत असतांना केवळ एकमेकांच्या चड्ड्या काढण्यासाठी एकमेकांना भेटणे व मिठीत घेणे मला वाटते हे नक्की वाईट आहे. पुरुषांनी स्वतः मौज मजा करायची आणि बायको देखील तसे वागू लागली कि अस्वस्थ व्हायचे हे असे देखील एकांगी वागणे तसे वाईटच. विविध, बहुतेक शहरातून वेश्यांच्या ओपन अड्ड्यांवर गदा आल्यानंतर सोशल मीडिया आणि जागोजाग फोफावलेले मसाज पार्लर हे त्याच प्रकारातले ज्यात अनेक चांगले स्त्री पुरुष अनेकदा भरडले अडकले फसले जातात मोठे नुकसान करवून घेतात जे संकट आज माझ्या या सुभाष नावाच्या मित्रावर आलेले आहे…
मी अनेक देशातून फिरतो तसे अनेक पुरुष फिरतात पण बाहेरचे जग हे बघण्यासाठी आहे हे विसरून बहुतेक पुरुष भारताबाहेर गेले कि कुठे रात्र घालवायला मिळेल लैंगिक भूक भागेल याच शोधात असतात त्यांना माझे हेच सांगणे आहे कि पैसे मोजून घेणाऱ्या वेश्या वृत्तीच्या बायका जशा येथल्या तशा तेथल्या त्यांना ग्राहकांविषयी कोणतेही प्रेम नसते केवळ पैसे मिळविणे त्यांचे टारगेट असते, मग वेश्यागमन करण्यासाठी कशाला हा खर्च येथे जागोजाग उत्तम कॉलगर्ल्स उपलब्ध असतांना आणि आपल्या बायकोमध्ये सारी सुखे शोधा कि जर ती तुमची आवडती असेल तर. अनेक फसविणारे लुबाडणारे अँप आज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि या अशाच अँपपैकी टिंडर हे एक ज्यात सुभाष केवळ लैंगिक सुखाच्या वासनेतून विनाकारण अडकला आहे ज्याची त्याला मोठी किंमत आयुष्याच्या या अखेरच्या वळणावर मोजावी लागते आहे कारण प्रेम हे पैशांनी नव्हे तर हृदयातून मिळवावे जिंकावे लागते हे सुभाष सारखे अनेक स्त्रिया व पुरुष विसरले आहेत. सुभाष प्रकरण एकीकडे घडत घडले असतांना दुसरीकडे माझा आणखी एक बऱ्यापैकी मोठ्या वयाचा मित्र बदलापूर येथे राहणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडलेला, दोघांचेही एकमेकांवर निस्सीम प्रेम पण नाही पटले त्यांचे आपापसात, तो देखील उत्तम व्यावसायिक आणि ती सामान्य घरातली, तिने ठरविले असते तर तिला या मित्राची आर्थिक लुबाडणूक ते वेगळे झाल्यानंतर करता आली असती पण तिने साध्या चहाची देखील या मित्राकडून अपेक्षा न ठेवता ती वेगळी झाली. असेही आपल्याकडे घडते. जे पती पत्नी लैगिक सुखात एकमेकांना पसंत करतात त्यातले स्त्री किंवा पुरुष बाहेर देखील शेण खाण्यासाठी धजावतात मला वाटते त्यांचे हे मोठे अपयश आहे असे शक्यतो घडता कामा नये…