बाळासाहेब जाऊ द्या म्हणणारे : पत्रकार हेमंत जोशी
गुणी माणसातही अवगुण दुर्गुण असतात. माझ्या ओळखीतले एक गृहस्थ पत्नीला, अमरनाथच्या यात्रेला जाऊन येतो म्हणाले आणि प्रेयसीला घेऊन इस्तम्बूलला गेले जेथे त्यांच्यावर हल्ला झाला त्यात ते व प्रेयसी दोघेही ठार झाले. एक सरकारी अधिकारी मित्र बायकोला, सरकारी कामासाठी औरंगाबादला आठ दिवस जाऊन येतो म्हणाले आणि प्रेयसीला घेऊन शेगावला गेले जेथे त्यांची व प्रेयसीची नजरानजर त्यांच्या बायकोशी झाली अर्थात ती पण तिच्या प्रियकरासंगे आलेली होती, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो कि बायकोला बाहुपाशात घेत असे कधीही म्हणू नका कि मी संभोग करतांना तुझ्यात अमुक एखादी नटी बघतो कारण ती पण तेच उलट उत्तर देऊ शकते कि मी पण तुमच्यात प्रताप सरनाईकांना बघते. एक मित्र काही दिवस कामानिमित्ते सिंगापूरला जाऊन येतो म्हणाला आणि थेट बँकॉकला पोहोचला. मी त्याला विचारलेलंही त्यावर तो म्हणाला तेही ऊत्तर पटण्याजोगे होते, पंचतारांकित हॉटेलात जेवायला जातांना घरचा टिफिन न्यायचा नसतो, तो म्हणाला. अनेक माणसात विविध दुर्गुण असतात पण त्यांच्यात एखादा गुण असा असतो कि तो जगाला दिपवून टाकतो. सिनेमा नाटकात अभिनय करणाऱ्यांमध्ये दुर्गुण किंवा व्यसने ठासून भरलेली असतात पण त्यांचा अभिनय हा एकमेव गुण तुम्हा आम्हा सर्वांना मनोरंजन करीत सार्या चिंता कटकटी विसरायला भाग पाडतात. बाळासाहेब थोरात आधी मंत्री होते नंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले नंतर एकाचवेळी मंत्रीही झाले म्हणजे राजकारणात किंवा सत्तेत ते अत्यंत यशस्वी ठरलेले नेते पण त्यांची लोकप्रियता कधीही घसरली नाही त्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी सतत वाढत राहिली कारण थोरात त्यांच्या हाताखाली किंवा सहकारी म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाकडे सकारात्मक नजरेने बघतात वास्तविक अनेकदा त्यांच्या ते लक्षात देखील येते कि अमुक माणूस तमुक ठिकाणी चुकतोय पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सत्तेचा उपयोग आपले नेतृत्व आपला काँग्रेस पक्ष त्यात वाढ करण्याकडे त्यांची नजर असते…
बाळासाहेब थोरातांना तुम्ही गुदगुदल्या करा कि हरबर्याच्या झाडावर चढवा त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळा कि त्यांच्यावर एखादा पोवाडा रचून तो त्यांच्यासमोर मंचावर ओरडून गाऊन दाखवा त्यांना या अशा दिखाव्याचा काहीही फरक पडत नाही याचा अर्थ ते स्तब्द पुतळा नाहीत, पण तुमचे नेमके काम नेमकी अडचण ऐकून होणारे काम ते तेथल्या तेथे करून मोकळे होतात आणि काम होणारे नसेल तर अजिबात मनात न ठेवता तेथल्या तेथे नकार देतात कारण त्यांना फुकाची प्रसिद्धी नको असते केलेल्या कार्याची फक्त त्यांना पावती हवी असते आणि मतदार कार्यकर्ते किंवा सामान्य माणसे या साऱ्यांच्या ते लक्षात येते म्हणून या राज्यात आय काँग्रेसची मंदी असूनही सत्तेत चांदी झाली ज्याचे मोठे श्रेय थोरात यांच्या चाणाक्ष नेतृत्वाला आणि मेहनती वृत्तीला जाते. अत्यंत महत्वाचे असे महसूल खाते लागोपाठ दोनदा सांभाळूनही थोरात यांचा अनिल देशमुख झाला नाही कारण त्यांच्यासाठी अति लोभ महत्वाचा नाही माणसे जोडणे त्यांना अतिशय आवडते. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल कि अत्यंत महत्वाचे महसूल खाते तेही कोरोना महामारीत सांभाळताना थोरात यांनी त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघाचे ज्या पद्धतीने या महामारीत नियोजन केले जातीने लक्ष घातले ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि या मतदार संघात कोरोना आहे किंवा नाही. त्यांनी ज्या अनोख्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा उभी केली त्यावर मला एक सिनियर प्रशासकीय अधिकारी म्हणाले देखील कि थोरातांचा हा कोरोना पॅटर्न राज्याने राबवला असता तर एवढी माणसे मेली नसती आणि कोरोनापासून दूर राहिली असती, अजूनही वेळ गेलेली नाही. राज्याचे महसूल मंत्री या नात्याने बाळासाहेब कायम प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना सहकार्य मार्गदर्शन मदत करतात पण इतरांसारखे त्यांचे वर्तन नाही म्हणजे काम कमी करायचे पैसे अधिक खायचे आणि वरून उठता बसता आपले थोबाड विविध वाहिन्यांवरून मिरवून आणायचे गणपतीच्या मिरवणुकीसारखे. यालाच अश्लील भाषेत सेक्स कमी पण मोठ्या आवाजाची हमी म्हणतात जे यापद्धतीने या महामारीत मिरवून आणण्यात स्वतःला धन्य समजतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत लाडके आवडते विश्वासू सहकारी अशी थोरातांची ख्याती आहे, दोन भिन्न विचारांचे हे नेते पण बाळासाहेबांनी कृतीतून तो विश्वास तो आदर ठाकरेंच्या ठायी उभा केला आहे…
ज्यांच्यावर ओढवलेल्या कोरोना महासंकटाची विशेषतः या राज्याला आणि आय काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना देशातील अनेकांना गेल्या काही दिवसांपासून मोठी चिंता फारमोठी काळजी होती ते त्यांना ओळखणार्या साऱ्यांचे अत्यंत आवडते व लाडके नेते राजीव सातव थेट स्वर्गाला हात लावून खणखणीत बरे झाले आहेत, घरी परतले आहेत, त्यांच्या व आई रजनी सातव यांच्या उत्तम कामांमुळे थेट परमेश्वराने त्यांना पुन्हा पुढली कामगिरी पार पाडण्यासाठी भूतलावर परत पाठविले आहे.विशेष म्हणजे त्यादिवशी थेट राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब थोरात किंवा अन्य त्यांच्या तोडीचे राज्यातले सारे नेते जीवाचे रान करतांना दिसले त्यांच्यातली एकजूट व एकाग्रता त्यादिवशी पाहायला मिळाली आणि वैद्यकीय इलाज कामाला आले. या अशा कठीण प्रसंगात किंवा पक्ष इतरत्र अडचणीत असतांना बाळासाहेब थोरात यांचे कसब व बुद्धी प्लस मेहनत त्यांनी पणाला लावून येथे या राज्यात मात्र थेट ४३ जागा जिंकत कॉन्ग्रेस, महाआघाडीत सामील करवून घेत मोठ्या युक्तीने तेही महत्वाची मंत्री पदे पदरात पाडून घेत काँग्रेस सत्तेत आणली. बाळासाहेब महसूल मंत्री झाले खरे पण शपथ घेतल्या दिवसापासून त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही उथळपणा दिसला नाही म्हणजे मीच मोठा किंवा माझेच खाते महत्वाचे असा त्यांनी कधी टेम्भा मिरवून स्वतःची आणि काँग्रेसची नाचक्की ओढवून घेतली नाही, माझी तेवढी लाल अशा इतर काही उथळ मंत्र्यांसारखे नेत्यांसारखे त्यांचे वागणे बोलणे नसते थोडक्यात त्यांच्याबाबत डाऊन टू अर्थ नेता असेच त्यामुळे कायम म्हटल्या जाते, कमी बोलणे आणि काम करीत राहणे हि पद्धत त्यांनी यशस्वी करून दाखवलेली दिसते. त्यांच्यावर टीका करणे प्रसंगी कट्टर विरोधकाला देखील शक्य होत नाही कारण कित्येक अनेक असंख्य विरोधकांच्या देखील मदतीला धावून जाणे त्यांच्या ते स्वभावात आहे. त्यांच्या यशाची ती पावती आहे. सहकार क्षेत्रात त्यांच्या पूर्वजांनी, वडिलांनी मुहूर्तमेढ केली आणि बाळासाहेबांनी त्यांच्या संगमनेर विधान सभा मतदारसंघात सहकार प्रांतात यशाची मानाची कमान चढवली, इतर घाट्यात कधी मुद्दाम तोट्यात असतांना याच बाळासाहेबांनी साखर कारखाना उत्तम पद्धतीने चालविण्याचे मोठे उदाहरण या देशात उभे केले, स्वतःचे व देशाचे नाव सहकारात उज्वल केले. काही ओळीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ग्रेट असामान्य थोर महान उत्तम बढिया आदर्श कष्टाळू बुद्धिमान यशस्वी नेते कसे लिहिणे सांगणे निदान मला तरी अशक्य आहे, पुन्हा एकदा त्यांच्यावर वेगळे काहीतरी लिहून मला मोकळे व्हायचे आहे….