गायकवाड कलतक अनिल आजतक : पत्रकार हेमंत जोशी
पुढल्या काही दिवसात मी माझे स्वतःचे भाजी चिरताना कणिक मळतांना भांडी घासताना पोळ्या लाटताना कपडे धुताना इत्यादी फोटो यासाठी फेसबुकवर टाकून मोकळा होणार आहे त्याचे मुख्य कारण माझी अलीकडे पत्रकार अभय देशपांडे विषयी अचानक वाढलेली म्हणाल तर ईर्ष्या म्हणाल तर जेलसी आहे कारण मी त्याचा फेसबुकवर भाजी चिरतानाचा फोटो काय टाकला त्यादिवसापासून त्याला म्हणे कितीतरी बायकांनी प्रपोज करायला सुरुवात केली आहे, माझा होशील ना, असेही थेट विचारायला सुरुवात केली आहे जर उदय तानपाठक पत्रकार होऊ शकतो, पत्रकार नितीन सावंतचे देखील लग्न होऊ शकते गुरुदत्त लाड यास मालिकेत काम मिळू शकते मोस्ट ऑर्डीनरी निलेश साबळे याचे अभिनयाचे दुकान जोरात चालू शकते तर अभय सारखे फोटो टाकून मलाही माझा होशील ना असे एखादी सुंदरी नक्की विचारू शकते म्हणून मी माझेही अभय पद्धतीने फोटो सोशल मीडियावर टाकून मोकळा होणार आहे. काही आनंदाचे क्षण आयुष्यात विसरता येत नाहीत आजही मला तो अत्यानंदाचा दिवस आठवतो ज्यादिवशी मी पहिली हॉर्न सोडून सारे काही वाजणारी जुनी डबडी फियाट कार विकत घेतली होती किंवा मी केवळ १८ वर्षांचा असतांना शेजारच्या अर्धवट शिक्षित काकू मला आल्या आल्या गुड नाईट म्हणाल्या होत्या आणि जातांना आय लव्ह यु म्हणून गेल्या होत्या, आयुष्याची हि अशी वापरलेल्या जुनाट वस्तूंनी जरी माझी सुरुवात झालेली असली तरी काही प्रसंग विसरता येणे शक्य नसते जसे ६ मे हा दिवस माझ्यासाठी असाच कायम लक्षात राहणार आहे कारण माझा आवडता मित्र धाडसी अधिकारी कवी मनाचा हळुवार माणूस दिलखुलास आणि दिलदार तेवढाच हळव्या मनाचा सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता अनिल गायकवाड यांना याच ६ मे २०२१ रोजी सचिव म्हणून महाराष्ट्र शासनाने पदोन्नती देऊन करून अनिल गायकवाड यांच्या राज्यातल्या लाखो मित्रांच्या आनंदश्रूना वाट मोकळी करून दिलेली आहे. मित्रवर्य अनिल गायकवाड ऑफिशियली तुम्ही बांधकाम खात्याचे सचिव झालात हा अत्यानंदाचा क्षण प्रसंग व्यक्त करायला निदान माझ्याकडे तरी शब्द नाहीत…
धाडसी बेधडक बिनधास्त बेदरकार पत्रकारांचे आयुष्य एखाद्या वेश्येसारखे असते म्हणजे ग्राहकाला एकांतात त्या वेश्ये कडून थेट बायकोसारखे प्रेम हवे असते आणि तो ते मिळवतोही पण चार चौघात ती वेश्या जर नजरेस पडली आडवी आली तर हाच ग्राहक झटक्यात दुसरीकडे मान वळवतो आणि वाऱ्याच्या वेगाने तेथून पसार होतो. कधीकाळी माझ्याच इमारतीत राहणारा पत्रकार आणखी एक बोलघेवडा पत्रकार आणि दोघे जवळचे नातेवाईक आम्ही एकेकटे भेटलो कि जिव्हाळा दाखवायचे, खूप खूप वेळ गप्पा मारायचे पण चारचौघात मात्र ते मला टाळतात माझ्याकडे दुर्लक्ष कारतात माझ्याशी साधे बोलणेही टाळतात जेव्हा माझ्या लक्षात आले माझी सटकली क्रमवार चारचौघातच त्यांची माय बहीण काढली त्यानंतर मात्र त्यांची तसे वागण्याची कधीच हिम्मत झाली नाही असे माझ्यासारख्या शूर पत्रकारांना अनुभव येणे स्वाभाविक असते पण काही मित्र असे असतात जे तुमच्यावर अगदी मनापासून मनातून प्रेम करतात अर्थात असे खूप आहेत अनेक आहेत असंख्य आहेत कितीतरी आहेत पण त्यातलेच एक हे सरकारी अधिकारी अनिल गायकवाड आहेत ज्यांनी माझ्याशी अगदी उघड मैत्री केली, त्यांच्या घरातल्या प्रत्येक समारंभात मला मानसन्मान दिला आणि माझ्याकडल्या प्रत्येक कार्यात त्यांनी दिलसे हजेरी दिली, असा हा बिनधास्त आणि दिलदार मित्र म्हणून माझे तर ठरलेलेच आहे कि अनिल मग ते कुठेही असतील म्हणजे संकटात किंवा आनंदात त्यांच्या पाठीशी कायम कुटुंब सदस्यासारखे धीरोदात्त मनाने उभे राहायचे याचा अर्थ ना त्यांनी कधी माझ्या ताकदीचा गैरफायदा घेतला किंवा ना मी कधी अनिल गायकवाड एकाचवेळी समृद्धी महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे बॉस असतानाही त्यांना कधी काही काम सांगितले आणि असे कितीतरी असंख्य या राज्यातले विविध पदांवर असलेले बॉस पण आमच्या ते दलाली करून पैसे मिळविण्याचे कधी साधे मनात देखील आले नाही अन्यथा त्यांच्याकडून कामे करवून घेणाऱ्या पत्रकारांची जर मी नावे सांगितली तर मला वाटते वरून सभयतेचा बुरखा पांघरणाऱ्या या हरामखोर पत्रकारांच्या तोंडावर तुम्ही थुंकून मोकळे व्हाल. पत्रकारितेत राहून दलाली करायचे माझ्या आमच्या मनात असते तर मला वाटते एकट्या अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून मला दरवर्षी करोडो रुपये मिळविता आले असते पण ते माझ्या कधीही मनात आले नाही म्हणून मी गायकवाड यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्या कपाळावर कधी आठी दिसली नाही. आणि हाच तो अत्यानंदाचा क्षण जेव्हा अनिल गायकवाड राज्याच्या या प्रमुख पदावर विराजमान झाले आहेत…
अत्यंत अत्यंत महत्वाचे या अनिल गायकवाड यांच्या बाबतीत कि ते सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून रुजू झाल्या दिवसापासून तर आज या हुद्दयावर येईस्तो त्यांना भेटणार्या मंडळींची संख्या कितीतरी लाखांच्या वर असेल त्यात त्यांचे कुटुंब सदस्य त्यांचे नातलग मित्र कलिग्स कंत्राटदार हाताखाली काम करणारे ओळखीचे किंवा ओळख नसलेले कोणत्याही जाती धर्माचे, त्यांना फसवणारे असे बहुसंख्य, आणि त्यातला एकही असा नाही ज्याचे अनिल गायकवाड यांनी भले केले नाहीं केलेले नाही, औषधाला देखील शोधून सापडणार नाही. विशेष म्हणजे अनेकांचे भले करता करता हे महाशय अनेकदा आर्थिक अडचणीत आल्याने मी मित्राच्या हक्काने त्यांना उभे आडवे प्रेमळ शब्दातून सांगितले समजावले आहे पण ऐकतील ते अनिल गायकवाड कसले आणि असे फार कमी त्या दत्ता मेघे मनोहर नाईक गणेश नाईक गिरीश गांधी सुरेशदादा जैन दिवंगत वसंतराव कुलकर्णी किंवा या अनिल गायकवाड यांच्यासारखे जे स्वतः कर्ज घेतील कर्जबाजारी होतील पण आलेल्या भेटलेल्या प्रत्येकाला नक्की काहीतरी देऊन जातील. मला वाटते कुठेतरी नक्की हि अशी पुण्याई आडवी येते आणि अनेक संकटांवर मात करीत अनिल गायकवाड यांच्या यश पदरात पडते ते या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून सन्मानाने कार्यभार हाती घेतात आणि टाकलेली मोठी जबाबदारी आनंदाने पार पाडण्यास सज्ज होतात. अनिलजी तुम्हाला पुढल्या वाटचालीस पुन्हा एकवार शुभेच्छा आणि तुमचे मनापासून येथे जाहीर अभिनंदन करून हे चार शब्द संपवितो…