सॅल्यूट फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी
कोरोना महामारीतून घरी असण्याचा बसण्याचा विकृत उपयोग अनेक असंख्य बहुसंख्य स्त्री पुरुष करतांना मला सूक्ष्म निरीक्षणातून ते लक्षात आलेले आहे, आमच्यासाठी फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया म्हणजे श्रेष्ठ वरदान कारण या सोशल मीडियामुळे माझे माझ्या पत्रकार असलेल्या मुलाचे लिखाण देशभर राज्यभर जगभर घराघरातून पोहोचते त्यामुळे जे इतर कुटुंबात अत्यंत घातक आहे तो सोशल मीडिया आमच्यासाठी मात्र मोठा फायदेमंद ठरला आहे म्हणून मी एकमेव असा बाप कि मुलास सांगतो जास्तीत जास्त सोशल मीडियावर वावरत जा कारण त्यातून आमचे उत्पन्न व लोकप्रियता दोन्ही वाढते फायद्याची ठरते. पण माझे असेही लक्षात आले आहे कि जे लैंगिक पिसाट पुरुष विशेषतः खाजगी ठिकाणी नोकरीला आहेत किंवा जे रिकामटेकडे आहेत किंवा ज्यांचे अगदीच तुटपुंजे व्यवसाय असून जे बायकोच्या पगारावर जगताहेत ते फेसबुक सारख्या सोशल मीडियावर सतत व्यस्त राहून मोठ्या खुबीने स्वतःच्या लैंगिक विकृतीचा आनंद उपभोगतांना आढळतात अर्थात त्यात आर्थिक दृष्ट्या गरजू बायका देखील मागे नसतात, त्यांना सोशल मीडियाचा उपयोग हनी ट्रॅप पद्धतीने पैसे मिळविण्या करवून घ्यायचा असतो. माझा एक मित्र ज्या एका मोठ्या कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर होता त्या कंपनीचा मालक पण माझ्या खूप छान परिचयाचा, पण एक दिवस अचानक या मित्राला कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला का तडकाफडकी काढले मी मालकाला विचारले असता तो म्हणाला हा तुझा मित्र कंपनीची जबाबदारी सोडून सतत त्या फेसबुकवर ऍक्टिव्ह असायचा जे मला छुप्या कॅमेरातून सतत आढळून आल्याने मी त्याला कामावरून काढून टाकले. घरी आर्थिक तंगी किंवा स्वतःच्या बायकोला प्रचंड घाबरणारे हे असे पुरुष केवळ शारीरिक भूक भागवण्यासाठी नको नको ते उपद्व्याप करतांना मला सोशल मीडियावर नजरेस पडतात आणि विविध ट्रिक्स वापरून आपले नेमके वय व खरा चेहरा लपवून पुरुषांना जाळ्यात ओढणाऱ्या स्त्रियांपासून देखील चांगल्या वृत्तीच्या पुरुषांनी अत्यंत सावध राहणे विशेषतः या आर्थिक अस्थिरतेत अत्यंत गरजेचे आहे…
माझ्या ओळखीचे एक जोडपे होते त्यांना अनेक वर्षे मुलबाळ नव्हते, एकदाचे त्या बाईचे शेजारच्या पुरुषाशी शारीरिक संबंध आल्याने तिला मूल झाले पण ज्या दिवशी मूल झाले त्यादिवशी ना ती बाई पेढे वाटत होती ना तिच्या शेजारी राहणारा तो पुरुष तर पेढे वाटत होता तिचा नवरा तसे या बंगालच्या निवडणुकीत झाले आहे म्हणजे तिकडे जिंकली ममता आणि इकडे राज्यातले काही माकडे आनंद व्यक्त करतांना ढोल ताशे बडवतांना पेढे वाटताना दिसताहेत. अरे ज्यांनी पोर पैदा केले त्यांना तो आनंद व्यक्त करू द्या तुम्ही कशाला त्या बाईच्या नवऱ्यासारखा आनंद व्यक्त करता, वेडे कुठले! ३ वरून थेट ८१ त्यामुळे भाजपाने ममतेचा बंगाल थेट पाक विचारांच्या तेथल्या बहुसंख्य विचारांच्या मुसलमानांच्या तावडीतून वाचवला आहे हे एक विदारक सत्य आहे, भाजपाचे दुर्दैव आणि तेथल्या स्थानिक काही हिंदू मतदारांचा मूर्खपणा असा कि जवळपास ९० जागांवर भाजपा केवळ ४ ते ३५०० एवढ्या कमी फरकाने पराभूत झाली अन्यथा चित्र वेगळे दिसले असते जे तुम्हाला पुढल्या वेळी नक्की बघायला मिळणार आहे आणि जर पुढल्यावेळी भाजपा तेथे चुकून सत्तेत आली नाही तर एक दिवस बंगालचा वेगळा पाकिस्तान किंवा बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. मी अजिबात भाजपावाला नाही पण दुसरा कोणताही पक्ष हिंदूंचे उघड नेतृत्व करण्यास धजावत नसल्याने निदान हे राष्ट्र जात्यंध मुस्लिम नेत्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरी आपण हिंदूंनी मोदी यांना पर्याय नाही हे ध्यानात ठेवून इच्छा असो अथवा नसो हिंदूंना मानणाऱ्या पक्षाला पुढले काही वर्षे मतदान करून मोकळे व्हायला हवे कारण जे महत्व राज्यातल्या आघाडीने महाराष्ट्रात त्या मुसलमानांचे वाढविण्यात निंदनीय भूमिका पार पाडलेली आहे तेच अलीकडे पार पडलेल्या इतर काही राज्यांमध्ये घडलेले आहे, अत्यंत अत्यंत घातक किंवा धोकादायक असे कि एकट्या पश्चिम बंगाल मध्ये तब्बल ३७ मुसलमान विधान सभेवर निवडून गेले आहेत तर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू,केरळ आणि पुडुचेरी या राज्यातली एकदंर निवडून आलेल्या मुस्लिम आमदारांची संख्या ९८ एवढी आहे म्हणजे देशात आजमितीला मुसलमान आमदारांची संख्या किती मोठी असेल त्यामुळे आपला देश पाकिस्थान करून घ्यायचा असेल तेही अतिशय झपाट्याने तर हिंदुत्व दावणीला बांधा आणि मुसलमानांना कुर्निसात करायला शिका. हिंदूंची मते सहजगत्या आपल्याकडे वळविणे आणि त्यांचे धर्मांतर करणे हिंदुस्थानात अतिशय सोपे आहे हे इतर धर्मियांच्या लक्षात आल्याने हिंदूंचा मोठ्या झपाट्याने ह्रास होतो आहे जे विदारक सत्य आहे…
आपल्या या राज्यात ज्यांच्यासमोर मनापासून नतमस्तक व्हावेसे वाटते असे स्थानीक किंवा राज्याचे नेतृत्व करणारे फार कमी नेते आहेत त्यात अर्थात प्रथम क्रमांकावर देवेंद्र फडणवीस आहे ज्यांना मी आत बाहेर हुबेहूब ते कसे त्यांना ओळखत असल्याने मी हे जाहीर सांगण्याचे धाडस करतोय कि देवेंद्र या राज्याला लाभलेले एक रत्न आहे ज्यांनी एक दिवस या देशाचे देखील नेतृत्व करावे आणि मला वाटते ते त्यांच्या नक्की नशिबात आहे, हे भाकीत यासाठी खरे ठरेल कारण माझ्या जिभेवर व आणखी एका अवयवावर तीळ आहे. राजीव सातव असतील किंवा देवेंद्र फडणवीस किंवा पृथ्वीराज चव्हाण किंवा उल्हास पवार गिरीश गांधी अनंत गाडगीळ यांच्यासारखे असे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या एवढे जे समोरून आले असता त्यांना झुकून नमस्कार करावा किंवा करावासा वाटतो, बहुतेकांना मी कशा शब्दातून लाथा घालतो ते तर तुम्ही कायम वाचत आले आहात. भाजपामध्ये बाहेरून आलेल्या किंवा आणलेल्या नेत्यांकडून नेमकी कोणती व कशी कामगिरी पार पाडून घ्यायची मला वाटते हे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना साधलेली हि मोठी किमया आणि त्या किमयेतूनच अत्यंत शूर व लढवय्या देवेंद्र यांनी एकाचवेळी अजित पवार यांना आणि त्यांच्या बलाढ्य काकांना तोंडावर आपटले आणि पंढरपूरची जागा निवडून आणली. अनेक मला म्हणतात कि काय तुम्ही देवेंद्र यांचे गुणगान गाता ज्यांनी त्यांच्या भाजपामध्ये प्रसाद लाड किंवा प्रवीण दरेकर यांच्यासारख्या वादग्रस्त आणि संधीसाधू नेत्यांचे विनाकारण स्तोम माजवून भाजपाच्या मूळ विचारांच्या अनेक चांगल्या नेत्यांची गोची करून ठेवलेली आहे. जे तुम्हाला वाटते ते फडणवीसांच्या लक्षात येत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे कारण या राज्यातल्या काही अति बदमाश नेत्यांना नेस्तनाबूत करायचे असेल तर त्यांच्याच दरबारी एक काळ घालविणार्या अशा कलंदर कि बिलंदर नेत्यांना आपल्या भाजपा मध्ये आणून देवेंद्र यांना महाआघाडीला मोठे तोंड द्यावयाचे आहे, महत्वाचे म्हणजे फडणवीस हे पाटील असते तर त्यांना काही वादग्रस्त नेत्यांना स्वतःकडे खेचून आणण्याची गरज नक्की राहिली पडली नसती पण जात आडवी आल्याने त्यांना या अशा क्लुप्त्या लढवाव्या लागतात लागतील अन्यथा भाजपाला सत्ता ताब्यात घेणे नक्की कठीण होत जाईल हे नक्की आहे…