मूळ शोधावे हेही गजाआड व्हावे : पत्रकार हेमंत जोशी
अमुक एखादीला एड्स आहे माहित असल्याने तमुक एखादा पुरुष तरीही तिला शरीर सुखाची एकदा नव्हे तर अनेकदा मागणी करेल का किंवा अमुक एखाद्या ग्राहकाला गुप्तरोगाने पछाडले आहे माहित असताना एखादी वेश्या देखील त्याला जवळ घेणार नाही थोडक्यात अमुक एका बिळात विंचू आहे ज्यांना ठाऊक असते ते त्या बिळात हात घालण्याचा कधीही आगाऊपणा करणार नाहीत किंवा अमुक एखाद्या वळणावर हमखास अपघात होतो असे माहित असल्याने आपण अशा वळणावर अतिशय सावध राहून गाडी पुढे नेतो आणि हे जर प्रत्येकाला कळते तर ते त्या तुरुंगवास टाळण्यासाठी या दिवसात धडपड करणाऱ्या माजी गृह मंत्र्याला का कळू नये ? हेच अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असतांना त्यांच्या त्यावेळेच्या खाजगी सचिवांमुळे म्हणजे नालायक व भ्रष्ट राजेंद्र अहिवार यांच्यामुळे चांगलेच अडचणीत आले होते त्यानंतर रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनीही जेव्हा राजेंद्र अहिवार यांना त्यांच्याकडे घेण्याचा आगाऊपणा केला मी मुद्दाम त्यावेळी दानवे यांच्या कानावर हा राजेंद्र अहिवार एक सरकारी अधिकारी म्हणून भ्रष्ट कसा त्यांना नेमके सांगितले तेव्हा कुठे दानवेंच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि त्यांनी राजेंद्र अहिवारच्या ढुंगणावर लाथ मारली पण जेव्हा अनिल देशमुख या महाआघाडी मध्ये गृहमंत्री झाले त्यांनी मात्र ज्याने त्यांना एकेकाळी मंत्री असतांना चांगलेच अडचणीत आणले होते त्याच राजेंद्र अहिवार याला तो निवृत्तीच्या केवळ एक दोन महिन्यात उंबरठ्यावर असतांना पुन्हा मंत्रालयात आपल्या कार्यालयात मोक्याच्या ठिकाणी त्याची नियुक्ती केली आणि येथून पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणींना सुरुवात झाली कारण यावेळी त्यांच्या कार्यालयातुन दरोडे घालण्यासाठी केवळ राजेंद्र अहिवार नव्हे तर त्याच्यासारखे आणखी चार चार दरोडेखोर देशमुखांनी हाताखाली घेतले…
अत्यंत महत्वाचे म्हणजे किंवा मला नेमके जे सीबीआयला सुचवायचे सांगायचे आहे कि एकट्या वाझे यास तो ट्रायडंट या पंचतारांकित हाटेल मध्ये बसून देशमुखांसाठी वसुली करीत नव्हता तर त्याच्या संगतीने एकाचवेळी शेजारी शेजारी रूम्स घेऊन राजेंद्र अहिवार रवी व्हटकर कुंदन शिंदे आणि खाजगी सचिव पलांडे हेही सतत वास्तव्याला असायचे का याचा शोध घेतल्यास वाझे एवढेच हे चौघेही आणि देशमुख यांच्या कार्यालयातले अन्य आणखी एक दोन वसुली प्रकरणात आघाडीवर असल्याचे आणि त्यांना यातले सारे काही तंतोतंत ठाऊक असल्याचे शोध घेणाऱ्यांच्या ते अगदी सहज लक्षात येईल किंवा वरील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास देशमुखांचे कितीतरी कारनामे अगदी सहज उघड होतील. विशेष म्हणजे निवृत्ती नंतर देखील नालायक राजेंद्र अहिवार कायम दिव्याची सरकारी गाडी वापरात असे जी त्याला अनिल देशमुख यांनी प्रेस्टिज इश्यू करून गृह खात्याकडून मिळवून दिलेली होती आणखी सांगायचे झाल्यास या राजेंद्र अहिवार यास तसे कोणतेही अजिबात अधिकार नसतांना तो बहुसंख्य नस्त्यांवर स्वक्षरात कायम आवश्यक ते नोटिंग करून मोकळा होत असे त्यानंतर त्या नोटिंग खाली अनिल देशमुख हे सह्या करून मोकळे व्हायचे जो गृह खात्याच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हा आहे आणि त्यावर बारकाईने चौकशी होणे अत्यावश्यक आहे. पुन्हा तेच कि एखादा बाहेरख्याली पुरुष जसा खानदानी सुस्वरूप बायकोला बाहेरून कडी लावून आत कोंडून ठेवतो आणि रस्त्यावर धंदा घेणाऱ्या बाईला हॉटेलात नेऊन जसा तिच्याशी संभोग करतो हे असे या अनिल देशमुखांचे वागणे झाले तेही ते गृह खात्याचे मंत्री असतांना म्हणजे अतिशय महत्वाचे खाते ते हाताळत असतांना त्यांनी बाळासाहेब देसाई यांच्यासारखे नाव रोशन करण्याची गरज असतांना म्हणजे स्वतःच्या कार्यालयात चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या उत्तम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे त्यांची मोठी गरज असतांना त्यांनी काय केले तर अतिशय बदनाम आणि बदमाश तेही निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयातले महत्वाचे अधिकार दिले ज्या अहिवार याने अक्षरश: गृह खात्यात हैदोस घातला होता…
आत्ता हे लिखाण करीत असतांना तिकडे हे माजी गृह मंत्री अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत पण माझी माहिती अशी कि जरी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या आव्हान देण्याला पाठिंबा दिलेला असला तरी देशमुखांच्या राष्ट्रवादीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी देखील हात वर करून तुमचे तुम्ही बघून घ्या आम्हाला यात ओढून बदनाम कारू नका असा म्हणे त्यांना एकप्रकारे सज्जड दम देऊन ठेवला आहे थोडक्यात या दिवसात विशेषतः मंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांना बऱ्यापैकी एकटे पाडण्यात आल्याचे समजते. आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा याठिकाणी मला सांगायचा आहे कि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतले देशमुखांसारखे आणखी काही मंत्री आम्हाला वर शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि सेनेत उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना पैसे पोहोचते करायचे आहेत किंवा असतात असे सांगून मोठ्या प्रमाणावर वसुली करतात पण मी जे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना ओळखतो ते या अशा पद्धतीचे कलेक्शन करायला या मंत्र्यांना नक्कीच कधीही सांगणार नाहीत एवढा त्यांचा दर्जा खाली घसरलेला नाही विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाला जे काय थोडेफार महिन्याकाठी फंड्स लागतात त्याची जबाबदारी गेली कित्येक वर्षे स्वतः अजित पवार उचलतात जेणे करून अमुक एखाद्याने पक्ष कामासाठी पैसे खाल्ले पद्धतीने त्यांना बदनाम करू नये. अनेकदा राष्ट्रवादी पक्षात विशेषतः निवडणुकांच्या काळात हेमंत टकले यांनी अनेकांकडून उधार उसनवार पैसे घेऊन खर्च भागविल्याची माझी पक्की माहिती आहे तेव्हा अमुक एखादा मंत्री जेव्हा त्याच्या या अशा टॉपमोस्ट नेत्याच्या नावाने पैसे मागतो तेव्हा तो तद्दन खोटे सांगून पैसे उकळते आहे हे संबंधितांनी ध्यानात ठेवावे. ज्या अनेकांना शरद पवार यांनी त्यांच्या व्यापारात विना अपेक्षा मोठे केले आहे असे त्यांचे काही मित्र मात्र आजही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात, पवार घराणे असे हलकट नक्की नाही त्यांना दान देणे माहित आहे दान घेणे त्यांच्या रक्तात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो…