मुसलमान नडले उद्धव भरडले : पत्रकार हेमंत जोशी
राज्याचे मुख्यमंत्री कोण तर ज्या बाळासाहेबांनी मुसलमानांची कायम लांडे अशी खिल्ली उडवली त्या बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्धव यांच्या महाआघाडीची विविध वाहिन्यांसमोर बाजू मांडणारे कोण तर अत्यंत वादग्रस्त असे मुसलमान नेते व मंत्री अस्लम शेख आणि नवाब मलिक, खाजगीत इतर मराठी सोडा पण खुद्द शिवसैनिक रडून रडून आकांत घालताहेत आपल्या या नेत्याचे हे असे मुस्लिम धार्जिणे वागणे बघून, वास्तविक याच उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात काँग्रेस व राष्ट्रवादीला त्याचवेळी समज द्यायची होती जेव्हा मोठ्या खुबीने त्यांच्या या मित्र पक्षांनी अस्लम शेख यांना मुंबईचे पालक मंत्री केले किंवा इतर अनेक राष्ट्रवादी पक्षाची किंवा शरद पवार यांची नेमकी बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये सक्षम असतांना नेमके मुद्दाम नवाब मलिक यांना राष्ट्रवादी व शरद पवार वारंवार पुढे करताहेत, कर्माचा सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हिराभाई ठक्कर यांनी लिहून ठेवले आहे, काही प्रारब्ध हे लोकांच्या इच्छेमुळे घडतात पण त्याचा त्रास आपल्याला विनाकारण भोगावा लागतो जशी एखाद्याच्या घराची भिंत त्या घराशी संबंध नसलेल्या माणसाच्या अंगावर पडते आणि तो कायमचा जायबंदी होतो किंवा रस्त्याने जे अपघात आपण बघतो त्यातही नेमके तेच घडते म्हणजे त्या वाहनाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेली व्यक्ती त्या गाडीखाली येऊन विनाकारण चिरडली जाते. गेले वर्षभर मी नेमके हेच बघतो आहे कि उद्धव यांचे प्रारब्ध त्यांच्या आड आले आहे म्हणजे इच्छा किंवा संबंध असो अथवा नसो ते अनेकदा त्यांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे भरडले जात आहेत. दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांची चूक एवढीच कि त्यांनी सभोवताली चुकीची माणसे चुकीचे मंत्री आणि चुकीचे राजकीय पक्ष जमा केले किंवा निवडले जे इतरांना नडले आणि उद्धव आपोआप त्यात भरडले गेले. माझे वाक्य या ठिकाणी लिहून ठेवा याची जबरी किंमत उद्धव यांना आणि त्यांच्या शिवसेनेला नक्की चुकती करावी लागणार आहे कारण सामान्य कडवा हिंदू कम मराठी शिवसैनिकच उद्धव व शिवसेनेपासून खूप दूर निघून गेला आहे जो दिसतो तो नक्की केवळ आभास आहे म्हणजे दबावापोटी किंवा प्रेमापोटी किंवा बाळासाहेबांच्या श्रद्धेपोटी सामान्य शिवसैनिक भलेही त्याची भडक भावना त्या दिवाकर रावते किंवा रामदास कदम यांच्यासारखी व्यक्त करण्याची हिम्मत करत नसेल पण मुसलमानांचे तेही उद्धव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादीने चालविलेले लांगुलचालन शिवसेनेला यापुढे शंभर टक्के महागात पडणार आहे…
एका वेगळ्या मुद्द्याला मला याठिकाणी हात घालायचा आहे. अलीकडे आम्हा ब्राम्हणांच्या वॉलवर अनेकदा आपली मते आक्रमकपणे मांडणारे श्री विशवनाथ शौचे, त्यांनी सकाळ दैनिकासंबंधात काढलेले एक असेच आक्रमक पत्रक माझ्या वाचण्यात आले त्यात त्यांनी सांगितले लिहिले कि सकाळ दैनिकाचे मालक अनुक्रमे प्रताप व अभिजित पवार हे अतिशय ब्राम्हण द्वेष्टे असल्याने कुठल्याही ब्राम्हणाने सकाळ वृत्तपत्र विकत घेऊ नये वाचू नये अर्थात विश्वनाथ यांच्या या मताशी मी यासाठी असहमत आहे कि समजा ब्राम्हणांनी पाटलांच्या मालकीचे सकाळ वृत्तपत्र वाचणे बंद करायचे ठरविले तर पुणे मुंबई नाशिक नागपूर किंवा या राज्यातल्या तत्सम अन्य शहरांतून एका तरी ब्राम्हणांचे असे दैनिक शिल्लक आहे का जे सकाळ पुढारी लोकमत पद्धतीने व्यापक काढले जाते जे वाचल्यानंतर विशेषतः ब्राम्हणाचे समाधान व्हावे. त्यावर नाही असेच उत्तर द्यावे लागेल कारण केसरी गावकरी मराठा सागर इत्यादी वृत्तपत्रांचा जमाना मला वाटते केव्हाच जवळपास इतिहासजमा झाला आहे जी वृत्तपत्रे एकेकाळी अग्रेसर होती विशेष म्हणजे ब्राह्मणांच्या मालकीची होती. समजा विश्वनाथ म्हणतात तसे जर सकाळ हे दैनिक ब्राम्हण विरोधी असेल तर इतर ब्राम्हणेतर मालक असलेली लोकमत सारखी दैनिके वृत्तपत्रे ब्राम्हणांना डोक्यावर घेऊन नाचणारी आहेत का त्यावरचे उत्तर शम्भर टक्के नकारात्मक आहे आणि या राज्यात एखादा अपवाद सोडल्यास अमुक एका ब्राम्हणाचे परिपूर्ण व स्पर्धेत यशस्वी ठरलेले दैनिक अपवादानेच बघायला मिळेल. आणि माझ्यासारखे असे किती ब्राम्हण संपादक या राज्यात आहेत जे अगदी उघड ब्राम्हणांची बाजू घेणारे आहेत, चुकून कोणी ब्राम्हणांवर टीका केली तर अशा हलकट व नालायक मंडळींची चड्डी सोडण्यात मला कधीही आजतागायत भीती वाटलेली नाही अर्थात याठिकाणी मला वादग्रस्त प्रताप किंवा अभिजित यांची किंवा त्यांच्या सकाळ दैनिकाची अजिबात बाजू घ्यायची नाही पण ब्राम्हणांनी सकाळ दैनिकावर बहिष्कार टाकून त्यातून ब्राम्हणांचे काही भले साधले जाईल असे अजिबात वाटत नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे कोरोना काळात केवळ सकाळ दैनिकाने त्यांच्याकडच्या ब्राम्हणांना काढले असे अजिबात नाही इतरही विविध वाहिन्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये तसे घडलेले आहे, अनेकांचे पगार निम्म्यावर आल्याने अगदी अलीकडे पत्रकार उदय तानपाठक यांनी चार घरच्या फावल्यावेळेत पोळ्या लाटण्याचे म्हणे ठरविले होते…
आजकालची अमुक एखादी मीडिया मग ती वाहिनी असेल किंवा वृत्तपत्र तमुक एखाद्या प्रेरणेतून चालविली जाते असे अजिबात नाही किंबहुना आपले काळे वाईट व्यवसाय धंदे बिनबोभाट चालावेत म्हणून बहुतेक ठिकाणी असे शेठजी विविध मीडिया क्षेत्रात उतरल्याचे दिसते व घडते देखील. मीडिया चालविण्यासाठी सरकारी जमिनी हडपून त्या विकणे हा तर या राज्यातल्या बहुतांश मीडियाचा विशेषतः वृत्तपत्रांचा राजरोस काळा धंदा आहे ज्यातून मीडिया मालकांनी पुढल्या कित्येक पिढ्यांची आर्थिक तजवीज करून ठेवलेली आहे म्हणजे जेथे सरकारी जागा त्यावर लोकमत चा डोळा अशी म्हण मध्यंतरी विशेषतः दिवंगत जवाहरलाल आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्र मंत्री असतांना प्रचलित होती अर्थात एकट्या दर्डा शेठला दोष देऊन उपयोगाचे नाही ज्याच्या हाती ससा कि सत्ता तो पारधी पद्धतीने या राज्यातल्या बहुसंख्य दैनिकांनी मोठ्या सरकारी जमिनी आधी हडपल्या कि मिळविल्या आणि नंतर बाजारभावाने विकून मोठी आर्थिक कमाई त्यावर केली, गडगंज संपत्ती त्यातून मिळविली म्हणजे सरकारी जमिनी आणि मीडिया असे कुभांड जर एखाद्या बाहेर काढले तर कितीतरी मीडिया मालक गजाआड जातील, हलकट आणि हरामखोर कुठले. आपल्या भानगडी बाहेर निघायला नकोत म्हणून सत्तेतले सारे या अशा लबाड हलकट मंडळींना मीडियाला टरकून दचकून घाबरून असतात पण एखादा जर का वस्ताद आम्हा मीडियाला वृत्तपत्रांना नडणारा अंगावर घेणारा भेटला तर आमच्यातल्या बदमाषांची पळता भुई थोडी होईल आणि असा एखादा वस्ताद जन्माला येणे या राज्याची राष्ट्राची नितांत गरज आहे. अमुक एखाद्या विचाराशी किंवा असामान्य व्यक्तीशी नेत्याशी निष्ठा हे वाक्य आता मीडियातून कायमस्वरूपी गायब झाले आहे म्हणजे जिकडे सरशी तिकडे मीडिया अशी वेश्यावृत्ती मीडियातून जागोजाग बघायला मिळते जसे कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सभोवताली मीडियातले जे असंख्य केवळ वैयक्तिक फायद्यासाठी घोळका करून असायचे बसायचे ते जेव्हा मी आता महाआघाडी भोवताली चिकटलेले बघतो, बघून माझीच मला लाज वाटायला लागते कि केवळ फायद्यासाठी आम्ही मीडिया देखील सडकछाप रांडेसारखे वागतो…
अपूर्ण : पुन्हा कधीतरी नक्की : हेमंत जोशी