जय जय जयराज ठक्कर : पत्रकार हेमंत जोशी
मी ज्या सांताक्रूझ जुहू परिसरात राहतो तो विविधतेने नटलेला ग्लॅमर असलेला विविध फिल्मस्टार मोठे व्यवसायिक पंच तारांकित होटल्स चौपाटी जगाचे पर्यटन स्थळ ठरलेला उत्तमोत्तम रेस्टोरंटस फॅशन किंवा विविधांगी क्षेत्राने मढलेला असा परिसर ज्याचे जगाला आकर्षण आहे अख्य्या हिंदुस्थानला कौतुक आहे. आमच्या या सांताक्रूझ पार्ले जुहू पश्चिम परिसरात गर्वाने ज्याचे नाव घ्यावे किंवा ज्याचे करावे तेवढे कौतुक कमी पडावे असा शिक्षण सम्राट नव्हे तर शिक्षण महर्षी किंवा तपस्वी राहतो ज्याचे नाव जो तो आदराने घेतो त्याच्या शिस्तीचे आदर्शाचे उदाहरण दिल्या जाते आणि ते नाव आहे जयराजभाई ठक्कर म्हणजे आमच्या परिसरातील सर्वोत्तम जमनाबाई शाळेचे सर्वेसर्वा मालक व चालक….
कितीतरी लोकांना दिलदार जयराजजी या कानाचे त्या कानाला न कळू देता मदत करतात सहकार्य करतात. त्यांची हि दिलेर वृत्ती कधीकाळी एका लबाड राजकीय कुटुंबाने ओळखली त्यांच्याशी आधी या कुटुंबाने जवळीक साधली आणि एक दिवस जयराजजींना अंधारात ठेवून फसवून त्यांची केवढी मोठी शैक्षणिक संस्था हडप केली अर्थात पुढे त्या शैक्षणिक संस्था हडपणाऱ्या कुटुंबाला देवाने फार मोठी शिक्षा दिली खरी पण त्यांनी मात्र जयराजभाईंचे मोठे मानसिक व सामाजिक नुकसान केले. आमच्याच परिसरात माझे एक जवळचे उद्योगपती मित्र सुभाष अग्रवाल राहतात. त्यांचा विवान नावाचा नातू आणि याच जमनाबाई शाळेतून यावर्षी दहावीला अख्ख्या शाळेतून दहावीला दुसरा आला विशेष म्हणजे पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या मनाचे जयराजभाई मोठी म्हणजे लाखात रक्कम देऊन शाळेत दरवर्षी सत्कार घडवून आणतात यावर्षी या बक्षिसांचा मानकरी अर्थात विवान ठरला. जयराजभाई म्हणाले, आमच्या शाळेतली पारीख आडनावाची एक मुलगी तर कोणतीही शिकवणी न लावता ९९.७५% गूण मिळवून मोकळी झाली. अनेक फिल्मी स्टार्स ची मुले मुली या शाळेत आहेत पण माझेही दोन नातू याच शाळेचे विद्यार्थी असल्याने जयराजभाईंची शिस्त कशी करडी मला ते उत्तम ठाऊक आहे. जयराजभाईंवर खरेतर कोणीतरी पुस्तक काढावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी