प्रदेशाध्यक्षपद : इश्य ! आज केले उद्या राहिले : असे नाही : पत्रकार हेमंत जोशी
सध्या काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून म्हणाल तर अस्वस्थता आहे, बऱ्यापैकी आपापसात स्पर्धा आहे कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हणे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे पुढला प्रदेशाध्यक्ष कोण, त्यावर म्हणाल तर कुजबुज आणि म्हणाल तर काही नेत्यांमध्ये धुसफूस आहे, पण काँग्रेसमध्ये घाई घाईत काहीही होत नसते तेथे घाई करायची देखील नसते, त्यांचे उतावीळ नवऱ्यासारखे काहीही नसते म्हणजे मधुचंद्राच्या रात्री एका दमात खूप वेळा आटोपले आणि दुसरेच दिवशी नववधूला दिवस गेले असे त्यांच्याकडे अजिबात नसते, काँग्रेसवाले लग्न आज करतील मधुचंद्र पुढल्या वर्षी साजरा करतील आणि तिसऱ्या वर्षी पोर जन्माला घालतील या पद्धतीने त्यांचे सारे काही स्लो असते. उतावीळ नव वधूसारखे, आज काहीही कितीही करा पण उद्या मला दिवस जायलाच हवेत म्हणण्यासारखे असे त्यांचे अजिबात नाही, नसते त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि उद्या उतावीळ उत्सुक अस्वस्थ एकाच भागातले विधान सभाध्यक्ष नाना पटोले किंवा मंत्री विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमल्या गेले असे तेथे ना घडते ना घडेल विशेष म्हणजे जो सर्वाधिक उतावीळ तो मागे राहण्याची स्पर्धेतून बाद होण्याची काँग्रेस मध्ये दाट अधिक शक्यता असते त्यामुळे स्पर्धेतील सारे बाद आणि तिसराच कोणीतरी प्रदेशाध्यक्ष असेच तेथे घडेल घडणार आहे. सध्यातरी दूरदूरपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही पण जेव्हा ते सत्तेत असायचे किंवा होते, दरवेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेली, विलासराव देशमुख रामराव आदिक प्रतिभाताई पाटील बाळासाहेब चौधरी सुशीलकुमार शिंदे रणजित देशमुख माणिकराव ठाकरे इत्यादी सारी नावे मागे पडायची आणि स्पर्धेत नसलेला किंबहुना त्या स्पर्धेत फिट न बसणारा एखादा निलंगेकर मुख्यमंत्री पदी विराजमान होत असे…
सुशीलकुमार शिंदे ते मंत्री असतांना अनेक तरुण बायकांना किंवा माझ्यासरख्या बहुसंख्य घाबरट पुरुषांना त्यांना एकांतात गाठण्याची भेटण्याची भीती यासाठी वाटत असे कि एकतर त्यावेळी जानी दुश्मन सिनेमा नुकताच येऊन गेला होता किंवा त्याकाळात रामसे ब्रदर्सचे खलनायकाचा अतृप्त आत्मा दाखवणारे अनेक सिनेमे निघत असत, त्यादिवसात अतृप्त आत्मा एकदम भेसूर दिसायला लागतो आणि एखाद्याचा तो जीव घेतो, असे ते कथानक असायचे, दरवेळी सुशीलकुमार शिंदें यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पण ऐनवेळी शपथविधी भलत्याच नेत्याचा होत असे त्यामुळे त्यांचेही जानी दुश्मन मधल्या अतृप्त संजीवकुमार सारखे होत असल्याचे माझ्यासारखे अनेक खाजगीत गमतीने म्हणायचे अर्थात मी सांगितले तसेच पुढे घडले म्हणजे स्लो स्लो यथावकाश अतृप्त सुशीलकुमार विलासराव किंवा अन्य काही राज्याचे मुख्यमंत्री एकदाचे झाले. यावेळी देखील तसेच नक्की होणार आहे आणि काँग्रेस मध्ये नेमके नेहमी तेच होते म्हणजे जरी आज बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला असला तरी लगेच उद्या एखादा इच्छुक किंवा अतृप्त त्यांच्याजागी नेमला जाईल असे अजिबात होणार नाही घडणार नाही वरून कदाचित त्यांनाच सांगितले जाईल, यु प्लिज कंटिन्यू किंवा याउलट गोंधळ घालणारे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या रडारवर येतात असतात आणि अशा गोंधळ घालणाऱ्यांचे नाव नक्की शर्यतीतून बाद होते मागे पडते त्यामुळे वडेट्टीवार पटोले सारख्या उत्सुकांनी व इच्छुकांनी गोंधळ न घातलेला बरा. त्यांना शांत बसून गम्मत बघणे वाट बघणे फायद्याचे ठरणारे आहे अन्यथा यांचे विधान सभा अध्यक्षपद व त्यांचे मंत्रिपद काढल्या गेल्याचे आणि नवखा एखादा, भलताच कोणीतरी प्रदेशाध्यक्ष झाल्याचे तुमच्या आमच्या कानावर पडेल…
सर्व श्री राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, विद्यमान प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, श्रीमती बाईमाणूस यशोमस्ती नव्हे यशोमती ठाकूर, अविनाश पांडे असे अनेक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्षपद याबाबत बोलायचे झाल्यास एखाद्या मधुमेह झालेल्याच्या तोंडात आपण समजा साखर कोंबली तर ती त्याला कडू का लागते किंवा सुंदर व सेक्सी पत्नी लाभलेल्या पुरुषाच्या खोलीत थेट मसाज करणाऱ्या एखाद्या चालू तरुणीला पाठवले तर तो तिच्याकडून राखी तर नक्कीच बांधून घेणार नाही ती देखील त्याला गॉड लागेल तसे या थोरातांकडे असलेल्या पदाचे, त्यांच्याकडे एकाचवेळी मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद आहे म्हणून ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत असे अजिबात नाही, बायकोबरोबर मेहुणी फ्री, कोणाला आवडणार नाही, ताजे उदाहरण तर त्यांच्याच मंत्रिमंडळात आहे, त्यामुळे थोरात हेच पुढले काही वर्षे कंटिन्यू झाल्यास मला खरेच अजिबात नवल वाटणार नाही. इतर जंटलमन नाहीत असे मी म्हणणार नाही पण प्रदेशाध्यक्ष होणे निदान काँग्रेसच्या या कठीण दिवसात राजीव सातव व पृथ्वीराज चव्हाण या दोघांनाही कदाचित पेलवणारे व परवडणारे नाही आणि तसेही वर श्रेष्ठींकडे, या दोघांपैकी एकालाही हे पद देऊ नये, असा आग्रह सार्वजनिक बांधकाम खात्याचे विद्यमान मंत्री माजी यशस्वी प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नक्की धरतील. काहीही झाले तरी राजीव सातव यांच्या रूपाने तगडा स्पर्धक आपल्या भागात निर्माण होऊ नये असा अशोक चव्हाण यांचा नक्की व नेहमी प्रयत्न असतो आणि त्यात ते जसे आजतागायत यशस्वी ठरले आहेत पुढेही तसे ते यशस्वी ठरण्याचे अंदाज आहेत. आपल्यानंतर आपल्यावर मनापासून प्रेम करणारे पृथ्वीराज चव्हाण आपल्या जागी नेमले जावेत हाच बाळासाहेब थोरात यांचा मनापासून प्रयत्न असेल त्यात त्यांना यश मिळू शकते. बघूया, पुढले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नागपूर भागातले नाना पटोले, अविनाश पांडे कि विजय वडेट्टीवार कि अन्य कोणी, आत्ता नेमके नाव सांगणे कठीण आहे, उद्या पक्ष श्रेष्ठींच्या मनात आले तर ते अभय देशपान्डे किंवा उदय तानपाठक या दोघांपैकी एखादा, नेमून मोकळे होतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी