माझ्या मैत्रिणी : पत्रकार हेमंत जोशी
माझ्या मैत्रिणी हे दोन शब्द तसे रोमँटिक आहेत आपल्या अंगावर पटकन रोमांच उभे राहते आणि इतरांच्या अंगावर जेलसीतून काटा उभा राहतो. माझ्या मैत्रिणींची यादी मोठी आहे लांबलचक आहे टप्प्याटप्प्याने त्यावर नक्की लिहीत राहीन पण महिला दिनानिमित्ते सुरुवात केली आहे. ज्या मैत्रिणींवर लिहिणार आहे बिनधास्तपणे सत्य तेवढेच मांडणार आहे. १९८७ मध्ये मी मुंबईला आलो तेव्हा व्यवसायात मोठे अपयश आल्याने केवळ पाचशे रुपये खिशात होते आणि त्याआधी मिळविलेले पैसे कुठेतरी अडकल्याने व्यवसायाचे आणि व्यक्तिगत आयुष्याचे मोठे वाटोळे झालेले होते पण आजतागायत अनेक संकटे आली वादळे आली निदान अद्याप तरी न घाबरल्याने प्रत्येक प्रसंगावर मात करतो पुढे जातो. १९८७ दरम्यान मुंबईत आल्यानंतर खिशात केवळ ५०० रुपये होते आणि पहिले काही अंक काढण्यासाठी किमान २० हजार रुपये हवे होते. मुंबईत एक गुजराथी एयर होस्टेस मैत्रीण होती तिची माझी कधीतरी मुंबई ते दिल्ली प्रवासा दरम्यान छान ओळख झालेली होती. विमानातून उतरल्यानंतर देखील आम्ही एकमेकांशी छान मैत्रीचे संबंध जोपासले होते, आश्चर्य म्हणजे माझ्या या कठीण काळात याच मैत्रिणीने त्याकाळी मला एका झटक्यात वीस हजार रुपये काढून दिले आणि त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितले नाही पुढे यथावकाश तिचे पैसे परत केले, तिने दुबईतल्या उद्योगपतीशी पुढे लग्न केले पण नंतर दुर्दैवाने ती कर्करोग झाल्याने देवाघरी गेली. आजही इतक्या वर्षानंतर ती व तिचे उपकार आठवण झाली कि मला अस्वस्थ करतात…
स्त्रियांच्या बाबतीत मैत्री करतांना माझे विशेषतः लबाड पुरुषांना हेच सांगणे असते कि बाई दिसली आणि मैत्री झाली कि मैत्रीची सुरवात तिच्या छातीकडे बघून करू नका आपली नजर आणि नियत साफ ठेवा आणि अमुक एखादीच्या प्रेमात पडायचे असेल तर समाजाला घराला न घाबरता प्रेम करून मोकळे व्हा, धनंजय मुंडे मला यासाठी भावले कि त्यांनी संजय राठोड यांच्यासारखी आपली प्रेम प्रकरणे लपवून ठेवलेली नाहीत प्रसंगी बायको असतांना देखील धनंजय दुसऱ्या स्त्रीला गाम्हण ठेवून मुले पैदा करून मोकळे झाले म्हणून धनंजय यांनी चूक करूनही ती लोकांना भावली. पुरुषांना प्रेमात पडायचे असते आणि घरी बायकोला पण खुश ठेवायचे असते जे चुकीचे आहे असते. एकीकडे बायकोला बाहुपाशात घ्यायचे आणि मोलकरणीच्या उरोजांना देखील सोडायचे नाही हे कसले गाढव प्रेम हि तर एकाचवेळी बायकोची व प्रेयसीची शुद्ध फसवणूक त्यामुळे बायकाही आता कमी नाहीत, एकदा का अमुक एक विवाहित पुरुष आपल्याला फसवतो आहे त्यांच्या लक्षात आले कि त्यादेखील मग अनेकदा अनेक ठिकाणी अनेक वेळा पुरुषांना ब्लॅकमेल करून मोकळ्या होतात. एकदा का लैंगिक कार्यभाग उरकला कि पुढल्या क्षणी एकमेकांकडे पाठ करून झोपणारे प्रियकर व प्रेयसी, कसले आले त्यात प्रेम, हि तर त्या पुरुषाकडून शुद्ध फसवणूक असे माझे ठाम मत आहे. मागेही मी तुम्हाला हा किस्सा सांगितला होता कि जेव्हा केव्हा माझा एक सरकारी अधिकारी मित्र त्याच्या पत्नीसंगे सेक्स करायचा त्यावेळी नेमका रंगात आल्यावर तो बायकोला म्हणायचा कि मला तुझ्यात सेक्स करतांना शेजारची अचलाभाभी दिसते, त्याची बायको पण कमी नव्हती, एक दिवस न राहवून ती त्याला म्हणाली, मला पण तुमच्यात अशावेळी तुमचे मित्र दयानंद चिंचोलीकर दिसतात. आमच्यातल्या अशा विकृत व लबाड पुरुषांना अशीच उत्तरे हवीत. आपली बायको आपली माधुरी दीक्षित आणि आपला नवरा हाच आपला ह्रितिक रोशन हे आपापसातील प्रेम व अंडरस्टॅण्डिंग कायम महत्वाचे ठरते, असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे…
प्रत्येकाला माझे हात जोडून सांगणे आहे कि बाप डाकू असेल किंवा आई वेश्या असली तरी त्यांना अपमानित करू नका, त्यांचा पाणउतारा करून त्यांना त्यांचे आयुष्यातले दोष दाखवून त्यांना मान खाली घालायला भाग पाडू नका कारण ते जे काय बरेवाईट कामे करून पैसे मिळवितात त्यात त्यांचा उद्देश केवळ पोटच्या मुलांना उपाशी न ठेवता घडविणे मोठे करणे हा एकमेव असतो आणि मोठी झाल्यानंतर विशेषतः सिंगल पॅरेण्ट असलेल्या आई वडिलांची मुले मात्र मायबापांना मोठी अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे जीवन उतारवयात देखील नकोसे करून ठेवतात. जेव्हा पैसे मिळविण्याचे मार्ग चहूबाजूंनी खुंटतात तेव्हा कसेही करून माय किंवा बाप पैसे प्रसंगी काही चुका करून, वाममार्गाने मिळवून घरी आणतात जे पोटच्या मुलांना दिसत असते आणि तीच मुले मुद्दाम जेव्हा या पैशांवरून आपल्या आई वडिलांना तुम्ही कसे नीच असे सुनावतात अशावेळी आई वडिलांना जिवंतपणी नरक बघायला मिळतो. म्हणून मी विशेषत: स्त्रियांना हेच सांगतो कि लग्न करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा पण एकदा का जोडीदार निवडल्यानंतर आणि जोडीदारापासून मूल झाल्यांनतर कृपया घटस्फोट घेऊन सिंगल पॅरेण्ट होऊ नका कारण त्यानंतर सिंगल पॅरेण्ट तरुण स्त्रीचे आयुष्य जगणे नक्की कठीण होऊन बसते. मी हे केले म्हणून तुम्हाला सांगितले. आपल्या भाव भावना बाजूला ठेऊन पैदा केलेल्या मुलांसाठी आयुष्य कंठायचे असते, मुलांना वाऱ्यावर सोडून सिंगल पेरेंट्सनी स्वतःची तेवढी चैन करून घ्यायची नसते. डोन्ट बी पॅनिक, मी नक्की पुढे केव्हातरी माझ्या मैत्रिणींविषयी अगदी त्यांच्या नावांसहित तुम्हाला त्यांची व माझी गुपिते उघड करणार आहे कारण त्यात लफडी नाहीत आहेत त्या मस्त आठवणी आणि निखळ मैत्री…