आपण समस्त मराठी जन स्वतःला शिक्षित सुसंस्कृत सुविचारी समजतो तरीही आपणच सर्वाधिक चुका करून मोकळे होतो. आपल्याला दरदिवशी ज्या वस्तू लागतात विशेषतः मुंबईकरांना माझा हा प्रश्न, आपण त्या त्या वस्तू जे समाजकंटक आहेत समाजाला विशेषतः मराठींना घातक आहेत अशांकडून का म्हणून खरेदी करतो? या मुंबई शहराला चारही बाजूंनी ज्या अनेक बहुसंख्य समाजविघातक अमराठींनी अक्षरश: विळखा घातलेला आहे ज्यांनी आम्हा मराठी लोकांचे अस्तित्व महत्व नागरिकत्व धोक्यात आणले आहे त्यांच्याकडे खरेदीला जाणे म्हणजे माहित असतानाही स्वतःच्या ग्लासात विष ओतून ते पिण्यासारखे आहे, एड्स झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासारखे हे महाभयावह असे कृत्य आहे, विशेषतः मला हे त्या उद्धव ठाकरे यांना देखील तेच सुचवायचे आहे कि तुम्ही मराठी माणसाच्या निदान अद्याप तरी गळ्यातले ताईत असतांना केवळ सत्ता टिकवण्याच्या नादात का म्हणून समाजविघातक मंडळींना या मुंबईत या राज्यात अभय देताहात किंवा मंत्री तो ड्रग्सच्या विळख्यात किंवा धंद्यात असेल, मंत्री मग तो विविध मजबूर अडचणीतल्या स्त्रियांच्या घोळक्यात राहून त्यांची फसवणूक करीत असेल, मंत्री असे ज्यांच्यामुळे एक नव्हे अनेक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जात असतील किंवा त्यांना जीव गमवावा लागत असेल विशेषतः विविध शासकीय अधिकारी ज्यांच्या मालमत्ता कित्येक कोटींच्या घरात असतील ज्यांनी सरकारी तिजोरीवर दरोडे टाकून लुटालूट चालविली असेल, त्यांना वठणीवर आणण्याची तुमच्यात कुवत असतांना का म्हणून मराठी माणसाला उध्वस्त करण्याचे हे मोठे षडयंत्र खपवून घेतल्या जाते आहे आणि समस्त मराठींनो, अमुक एखादा नेता मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असेल जर तो आयाबहिणींना उध्वस्त करणारा आणि स्वतःच श्रीमंत होणार असेल तर का म्हणून तुम्ही अशांच्या पारड्यात आपली मते टाकून मोकळे होताहेत, तुमच्या पंचक्रोशीतील एखादा, खरोखरी समाजासाठी झटणारा निवडून आणायला तुम्हाला काय होते ? त्यातल्या त्यात समाजसेवी नजरेसमोर आणा आणि अशांना मते देऊन मोकळे व्हा कि. अलीकडे महाआघाडीतला काँग्रेसचा एक मंत्री अतिशय पोटतिडकीने जेव्हा अतिशय चुकलेल्या संजय राठोड यांची अगदी उघड बाजू घेत होता तेव्हा एका मराठी वाहिनीवर अँकरिंग करणाऱ्या गाजलेल्या व्यक्तीने मला फोन करून विचारले कि हा मंत्री आपली व आपल्या पक्षाची उरली सुरली इज्जत का गमावतो आहे तो का त्या गलिच्छ संजय राठोड यांची बाजू घेतो आहे त्यावर मी त्याला एवढेच म्हणालो कारण तो देखील याच संजय सारखा हुबेहूब एका बाईच्या प्रकरणी प्रेम प्रकरणी लवकरच गोत्यात येण्याची फार मोठी शक्यता असल्याने त्याचाही धनंजय मुंडे झाला आहे, म्हणून तो या अंगावर शहारे आणणाऱ्या प्रकरणी संजय राठोडची ओकारी यावी पद्धतीने बाजू घेतो आहे, थोडक्यात या मंत्रिमंडळात बहुतेक सदस्य हमाम मे नंगे. थोडक्यात आपला महाराष्ट्र खूपच खालची पातळी गाठतो आहे…