दर्जाहीन मराठी वाहिन्या : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे विशेषतः बातम्या देणाऱ्या काही मराठी वाहिन्या विकायला निघाल्या आहेत, अलीकडे साऱ्याच बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचा घसरलेला दर्जा बघता हळूहळू क्रमाक्रमाने साऱ्याच बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्या विकायला निघाल्यास तुम्ही आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. बहुतेक वाहिन्यांमध्ये अमुक एखाद्या वाहिनी पेक्षा मी स्वतः नावाने चेहऱ्याने आणि पैशाने कसा श्रीमंत होईल अशीच माणसे फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतांना आपल्या बातम्या देणार्या मराठी वाहिन्यांना दिल्लीची सर श्रीमन्ती येणे अशक्य आहे. मुंबई २४ हि बातम्या देणारी वाहिनी आम्ही चालवत असतांना ती वाहिनी कशी मोठी करता येईल याकडे आमचा सतत कल असे त्यामुळे त्या वाहिनीला अल्पावधीत यश मिळाले होते. केवळ काही टेक्निकल अडचण आल्याने आम्हाला मुंबई २४ वाहिनी बंद करावी लागली. इथे महाराष्ट्रात कोणत्याही बातम्या देणारी मराठी वाहिनीकडे त्या त्या वाहिन्यांचे मालक ओनर जातीने लक्ष देत नसल्याने किंवा त्यांच्या केवळ व्यवसायासाठी या वाहिन्यांचा ते बहुतेकवेळा उपयोग करून घेत असल्याने येथल्या वाहिन्यांचा दर्जा सुधारणे वाढणे लोकप्रिय होणे कठीण आहे अशक्य आहे. मुंबईत महाराष्ट्रात घडणाऱ्या सुशांत सिंग दिशा सालियन सारखी गंभीर प्रकरणे मराठी वाहिन्या उघड करून त्या विरोधात लढतांना हल्ली दिसतच नाहीत त्याचे प्रमुख कारण एकतर व्यक्तिगत फायदे करून घेणे असावे किंवा राज्यकर्त्यांना घाबरणाऱ्या आपल्या मराठी बातम्या देणार्या वाहिन्या असे तरी तयांचे वर्णन करावे लागेल…
विशेष म्हणजे ज्याकडे दर्जेदार लढवय्यी धडाकेबाज वैचारिक वाहिनी म्हणून बघावे अशी मराठी वाहिनी अलीकडे बघायला मिळत नसतांना विशेष म्हणजे त्यात नवनवीन बातम्या देणार्या वाहिन्यांची भर पडणार आहे पडू लागलेली आहे. झी बातम्या देणार्या वाहिनीचा आशिष जाधव अलीकडे या सुशांत सिंग प्रकरणी जेव्हा न्यायालयाने सिबीआयला अधिकार दिले अगदी अस्वस्थ होऊन आणि घसा फाडून जेव्हा वाहिनी प्रमुख म्हणून सांगत होता कि आता हि लढाई राज्यातली महाआघाडी विरुद्ध भाजपा अशी झालेली आहे त्याच्या या बोलण्यावर हसावे कि रडावे कळत नव्हते. जणू काही आशिष हा या राज्यातल्या महाआघाडीचा प्रवक्ता असल्यासारखे या पद्धतीने बोलत असतो. उद्या हे असे आशिष यदाकदाचित राज्यात भाजपाची सत्ता आली आणि त्यांची बाजू घेतांना मांडतांना आक्रमक वाटले तर मला अनुभवावरून त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. अर्थात केवळ आशिष जाधवला मूर्ख ठरविणे योग्य नाही कारण साऱ्याच बातम्या देणार्या मराठी वाहिन्या निव्वळ पोरखेळ खेळण्यात मग्न आहेत विशेष म्हणजे या वाहिन्यांमध्ये मोक्याच्या विविध पदांवर काम करणाऱ्यांचा आणि वाहिन्यांच्या मालकांचाही व्यक्तिगत फायदा करवून घेण्याकडे मोठा कल असल्याने बातम्या देणाऱ्या साऱ्याच मराठी वाहिन्यांचा टीआरपी व दर्जा असाच वेगाने घसरत जाणार आहे हे निश्चित….
तुम्ही जर एखादे प्रकरण समोर कोण आहे हे न घाबरता किंवा न बघता लावून धरणार असाल तरच यापुढे बहुसंख्य हुशार अनुभवी चतुर अभ्यासू दर्शक तुमची वाहिनी बघणार आहेत अन्यथा ते ढुंकूनही तुमच्याकडे बघणार नाहीत. विविध विषयांवरच्या मराठी वाहिन्यांचे उदंड पीक सध्या आलेले आहे पण दर्जेदार बघावे अशी एकही मराठी वाहिनी दूरदूरपर्यंत दिसत नाही आणि हीच ती वेळ आहे विशेषतः बातम्या देणाऱ्या एखाद्या नवीन वाहिनीला येथे या राज्यात एस्टॅब्लिश होण्याची, बघूया कोणाला या सुवर्ण संधीचा फायदा घेता येतॊ ते. मी स्वतः अगदी आत्ता आता पर्यंत बातम्या घेण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वाहिनी क्वचित बघत असे पण मराठी बातम्या देणार्या वाहिन्यांमध्ये ज्या वेगाने लिंगाची वयानुसार यावी तशी शिथिलता आल्यानंतर ते ढिले व मलूल पडू लागल्यानंतर मी या काहीशा पुचाट ठरू लागलेल्या मराठी वाहिन्या बघण्याऐवजी आक्रमक धाडसी लढवय्या हिंदी व इंग्रजी वाहिन्या बातम्या साठी सुरुवात केली आहे. राज्यात दररोज अनेक राजकीय मान्यवरांशी विविध बड्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे होत असते विशेष म्हणजे त्यांच्याही बोलण्यातून ते अलीकडे इंग्रजी व हिंदी वाहिन्यांना प्राधान्य देत असल्याचे जाणवते समजते. जशी मुंबई पोलिसांनी राज्यात व जगभर आपली विश्वासहर्ता पूर्णपणे गमावलेली आहे तेच वेगाने झपाट्याने बातम्या देणार्या मराठी वाहिन्यांचे होते आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बदनामीत आणखी भर पडू लागलेली आहे जे स्वाभिमानी मराठी माणसाला लाजिरवाणे वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी