अफवांचा बाजार थापांचे पीक : पत्रकार हेमंत जोशी
म्हणाल तर आमदार संजय कुटे यांचा कार्यकर्ता म्हणाल तर स्वयंघोषित नेता आणि धम्माल गप्पा मारणारा अनिल गावंडे, त्याच्याशी गप्पा मारतांना शरद पवारांशी गप्पा मारण्याचे फील येते म्हणजे हा जे सांगतो नेहमी नेमके उलटे घडते. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यापासून कतरिनाला दिवस गेले आहेत, असे जरी त्याने सांगितले तरी त्याच्यावर विश्वास बसतो कारण बोलतांना सांगतांना त्याचा आत्मविश्वास दांडगा असल्याने क्षणभर नवख्या माणसाचा नक्की त्याच्यावर क्षणात विश्वास बसतो आणि अंगाला घाम फोडणाऱ्या बातम्या सांगून तो मोकळा होतो. काल तर त्याने सांगितले, महिन्याभरात आशिष शेलार शम्भर टक्के राष्ट्रवादी मध्ये प्रवेश कारताहेत, पवार शेलार फ्रेंडशिप जगजाहीर आहे त्यामुळे विश्वास बसायला संधी आहे. मला देखील राहवले नाही, मी शेलारांना फोन लावला, ते दिल्लीत होते, ते कॉन्फिडन्टली नाही म्हणाले, संघ स्वयंसेवक असे भलते सलते काही करीत नसतात ते म्हणाले. आजपर्यंत अनिलने दिलेल्या सांगितलेल्या बातम्या, कायम त्याउलट घडले आहे पण तरीही मी विश्वास ठेवतो आणि अनेकदा तोंडावर पडतो. शरद पवारांचेही तेच, पर्वा म्हणाले, सरकारला पाच वर्षे अजिबात धोका नाही त्याचवेळी त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायला नक्की आवडेल. समजा भाजपा मधून, जयंतराव सांगतात तसे काही आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागले तर जयंत पाटलांची इच्छा पूर्ण होऊ शकते, या सरकारला पाच वर्षे धोका नाही पवार जे म्हणाले त्याच्या नेमके उलटे घडेल किंवा घडू शकते ज्यांचे आमदार जास्त त्यांना तो अधिकार आपोआप प्राप्त होतो, भाजपाचे आमदार फाटून जयंत पाटील मुख्यमंत्री होतात कि …
ज्या धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्याशी कमालीचे सौख्य असल्याने उद्या अजितदादा सद्य मंत्रिमंडळातून बाहेर पडून नव्याने सरकार स्थापन करून त्यांना भाजपा बाहेरून पाठिंबा देईल, नजीकच्या काळात करोना ओसरल्याने आता असे नक्की काहितरी घडणार आहे, मोठे संख्याबळ पाठीशी असलेले भाजपा नेते स्वस्थ व शांत बसतील असे अजिबात वाटत नाही तिकडे काँग्रेस मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, का कोण जाणे पण त्यांनी सत्तेत राहू नये महाआघाडीतून लगेच बाहेर पडावे असे जो तो नेता मंत्रिमंडळ सदस्यांना सांगतो आहे पण मंत्रिपद सहजासहजी सोडण्यास एक वडेट्टीवार सोडल्यास इतरांना अजिबात वाटत नसल्याने त्यांचे आपापसातले मतभेद वाढू लागले आहेत हे नक्की आहे. जरी महा आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी वेगळी होणार नाही, तुटणार नाही त्यामुळे ते येणाऱ्या महत्वाच्या महापालिका निवडणुका एकत्र लढतील एक होतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्या एकत्र राहण्याचा मोठा फायदा इकडे मनसेला होतो आहे कारण मुस्लिम धार्जिण्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करणे बहुतेक शिवसैनिकांना ते रुचले आवडलेले नाही त्यामुळे प्युअर मराठी बाणा समोर ठेऊन वाटचाल करणाऱ्या मनसेकडे अनेक असंख्य शिवसैनिकांचा सध्या ओढा आहे जे सेनेच्या दृष्टीने चांगले नाही, फार मोठी राजकीय किंमत त्यातून शिवसेनेला चुकवावी लागणार आहे..
जाता जाता : कोरोना लस ढुंगणाला नाही तर हाताला दंडाला टोचायची आहे त्यामुळे ज्यांना फोटो काढून मिरवण्याची प्रचंड हौस असते अशा या राज्यातल्या काही महत्वाच्या नेत्यांनी कोरोना लस टोचून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकून यासाठी मोकळे व्हावे कि ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यावर विश्वास बसेल, हि लस घेतल्याने दुष्परिणाम उद्भवत नाहीत असे एकदा सामान्यांना वाटले कि जो तो उठेल आणि लस टोचून घेईल अन्यथा कोणीही लस रचून घ्यायला धजावणार नाही पुढे येणार नाही त्यामुळे झपाट्याने कोरोना नियंत्रणात येणार नाही, नेत्यांनो मंत्र्यांनो बघा कसे जमते ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी