आपल्यातले जे कोणी मुंबईत राहायला आहेत, त्यांना गावाकडून आलेल्या पाहुण्यांकडून एक फरमाईश हमखास असते, सिनेमात
काम करणार्यांना आम्हाला बघायचे आहे….मी तर पत्रकार त्यामुळे आलेल्या, येणाऱ्या पाहुण्यांना वाटते, प्रशांत दामले माझ्या घरी गाद्या घालायला होता, रमेश भाटकर माझ्या घोड्याची देखभाल करायला असावा, सिनेमात येण्यापूर्वी रीमा लागू माझ्या मुलांना शिकवण्या द्यायला येत असावी, काही काम मिळत नसतांना हेलन मला नृत्य शिकवायला येत असावी, वास्तविक असे काहीही नसते म्हणजे राजकारणावर लिहिणाऱ्या पत्रकाराचा तसा चित्रपटसृष्टीशी फारसा कधी संबंध येत नाही आणि मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा तर दुरान्वयेही सिनेमात काम करणाऱ्या नटनात्यांशी ओळख नसते, काही काम पडत नाही, त्यामुळे आलेले पाहुणे जेव्हा तुम्हाला विचारतात कि त्यांना सिनेमात काम करणार्यांना बघायचे आहे तेव्हा त्यांना म्हणावे, नटरंग सिनेमात अमुक एका नृत्यात अमृताच्या मागे उभ्या राहून ज्या आठ दहा मुली नाचायला आहेत,त्यातली एक माझ्या ओळखीची आहे, चल, तिची भेट घालवून देतो किंवा तमुक एका सिनेमात शक्ती कपूर जेव्हा अभिनेत्रीवर बलात्कार करतो, बाहेर जे चार पाच गुंड उभे असतात, त्यातल्या एकाला मी ओळखतो, आपण त्याला जाऊन सही मागुया. २४ तास ऑन ड्यूटी या मराठी सिनेमात ज्याने गृहमंत्र्याचा रोल केला आहे, चला त्याला भेटूया, पण येथे तुमची फजिती होणार नाही कारण ती दोन मिनिटाची प्रदीर्घ, आयुष्यातली पहिली आणि शेवटची भूमिका खरोखरी वठवली आहे, पत्रकार उदय तानपाठक यांनी. अर्थात हि अशी उत्तरे दिलीत कि मला नाही वाटत आलेले पाहुणे तुमच्याकडे आग्रह धरतील, नट नट्या दाखवा म्हणून…मित्रहो, तुम्ही अगदीच तरुण असाल तर आजच ठरवा कि एक आकर्षण म्हणून अमुक एखाद्याला बघायचे आहे असे सांगण्यापेक्षा लोकांनी तुम्ही कसे मोठे आहात हे बघण्यासाठी धडपड करायला हवी. राजकीय नेत्यांची पुढली पिढी जेव्हा जेव्हा आपली स्वत:ची ओळख निर्माण करते, मला वाटते तो खरा स्वालंबी नेता आणि त्याचे कामातून मोठे झालेले नेतृत्व. क्षेत्र मग ते कुठलेही असो, बाप से बेटा सवाई ठरावे, बापाची ओळख सांगत फिरण्यापेक्षा तुमच्या कर्मातून बापाची ओळख व्हायला हवी असे तुम्ही कार्य करायला हवे….
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण शब्दप्रभू, नामांकित, अग्रगण्य, बहाद्दर, बहाद्दूर,वस्ताद, वाकबगार, मुरब्बी, अभ्यासू, शब्द्पंडीत, लोकमान्य, लोकप्रिय, धुरंधर, निष्णात, नावाजलेले पत्रकार श्रीमान कुमार केतकर यांनी या राज्यातल्या विविध वृतपत्रांमध्ये मोठ्या पदावर काम केलेले आहे. विशेषत: त्यांची लोकसत्ता मधली संपादक म्हणून कारकीर्द अविस्मरणीय. ज्या बोटावर मोजण्याएवढ्या मंडळींनी लोकसत्ता वृत्तपत्र गाजवून सोडले त्यातले पहिल्या पाचातले एक श्रीमान कुमार केतकर, येथे त्यांचा उल्लेख यासाठी कि कुमार जेव्हा अमुक एखाद्या वृत्तपत्रातून बाहेर पडतात ते पुन्हा त्या वृत्तपत्रात नोकरी म्हणून पाउल ठेवत नाहीत आणि हा किस्सा त्यांनी स्वत: मला सांगितलेला आहे. त्यांच्या पुढे आणखी एक पाउल त्यांच्या एका प्यारा दुश्मनचे, म्हणाल तर ती व्यक्ती आणि कुमार या दोघात अनेकदा काही तात्विक मतभेद होतात पण त्यांचेही तेच म्हणजे एकमेकात त्यांचे पटत नाही आणि त्यांना एकमेकांशिवाय करमतहि नाही, अजब गजब दोस्ती त्या दोघांची, पण जेव्हा त्या दबंग व्यक्तिमत्वाला एकाचवेळी सिंगापूरला मोठ्या हुद्द्याची नोकरी पकडायची कि येथे मुंबईत आलेली संधी धरून ठेवायची, प्रश्न पडला तेव्हा त्याने बायकोच्याही आधी सल्ला घेतला कुमार केतकर यांचा आणि कुमार त्यांना म्हणाले येथेच राहा, आभाळाला गवसणी घालून येशील, त्यांनी तो सल्ला मानला, कुमार म्हणले तेच खरे ठरले, आज जगातला असा एकही मराठी माणूस, व्यक्ती नसेल जो झी वाहिनीच्या उदय निरगुडकर यांना ओळखत नाही. झी वृत्त वाहिनी जगात अनेक ठिकाणी दिसते आणि आवडीने बघितल्या जात असल्याने जो तो दर्शक हमखास उदय निरगुडकर यांना बघतो, आणि आपोआप हा चेहरा त्या सार्यांच्या लक्षात राहतो, थोडक्यात उदय यांनी आपल्या मित्रांचा सल्ला त्यावेळी ऐकला आणि सिंगापूरच्या एका मोठ्या
विद्यापीठात चालून आलेले कुलगुरूपद त्यांनी नाकारले, जेव्हा नाकारले तेव्हा झी पेक्षा तेथे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नीला कितीतरी अधिक वेतन मिळणार होते पण आमच्या व्यवसायात उतरलेले हे महाशय म्हणजे सिनेमातले जणू राजकुमार, निरगुडकर म्हणजे स्वत:च्या मस्तीत जगणारा मस्त कलंदर, त्यांनी पैसा नव्हे करिअर कायम महत्वाचे मानले, त्यात त्यांनी आणि त्यांच्या उच्चशिक्षित कुटुंबाने कायम रस घेतला, आज ते एखाद्या सध्या गाडीतून फिरत असतील पण त्यांचे नाव पदरी शंभर गाड्यांचा ताफा ठेवणाऱ्या उद्योग्पतीपेक्षा खूप मोठे आहे, नावाजलेले उदय निरगुडकर खरोखरी एक अफलातून माणूस आहे, त्यांच्याशी बातचीत, गप्पा
म्हणजे त्या त्या वेळी सापडलेला तो एक खजिना असतो. त्या खजिन्यात जगातल्या विविध अनुभवांचा साठा आहे कारण जेवढे तुम्ही तुमच्या सासरी गेला नसाल त्यापेक्षा कितीतरी अधिकवेळा उदय निरगुडकर यांनी जग पालथे घातलेले आहे, त्यांचे वय फारसे नसले तरी ते एक अनुभव समृध्द असे व्यक्तिमत्व आहे, उदय स्क्रीनवर वयाने काहीशे मोठे वाटतात पण प्रत्यक्षात….कतरिना कैफने जर उद्या त्यांना मागणी घातली तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, आणि कुमार केतकर असोत कि उदय निरगुडकर किंवा आम्ही स्वत: its God gift आम्ही वयापेक्षा अधिक तरुण दिसतो आणि आहोतही कारण आमचे मन प्रसन्न आहे…..
वर जे मी तुम्हाला म्हणालो म्हणजे उदय हे केतकर यांच्यापेक्षा आणखी काही पावले पुढे, उदय यांनी आजतागायत जगभरात विविध क्षेत्रात काम केलेले आहे, विशेष म्हणजे ते अमुक एखाद्या क्षेत्रातली नोकरी जेव्हा सोडतात, पुढल्या नोकरीचे कामकाज,पूर्णत: भिन्न असते. आमच्या पत्रकारितेत म्हणजे झी वाहिनीचे सर्वेसर्वा म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांचे या राजकीय क्षेत्राशी अजिबात देणे घेणे नव्हते, विलासराव जेव्हा त्यांना म्हणाले, वर्षा बंगल्यावर या, तेव्हा उदय म्हणाले, हा बंगलाकुठे आहे, असा हा आयुष्यभर विविध आव्हान स्वीकारून त्यात हमखास यश मिळविणारा अफलातून अत्यंत तल्लख, बुद्धिमान माणूस. सलाम त्याच्या कर्तुत्वाला हजारवेळा….
शिस्त, निर्व्यसनी वृत्ती, सतत नवीन शिकण्याची जिद्द, परमेश्वराने बहाल केलेली तल्लख बुद्धी, हजरजबाबी स्वभाव, बोलण्याची उत्तम कला, टापटीप राहण्याची सवय, माणसे ओळखण्याची शैली, जगभरात कुठेही जाण्याची मानसिकता, मित्र जोडण्याची वृत्ती, इतरांना मनापासून सहकार्य, मदत करण्याची मानसिकता, इत्यादी विविध गुणांच्या भरवशावर जगभरातल्या मराठी माणसात श्रीमान उदय
निरगुडकर यांना पोहोचणे शक्य झाले. जेव्हा उदय यांनी झी वाहिनीची सूत्रे या क्षेत्रातला शून्य अनुभव असतांना देखील स्वीकारली offtherecord सांगतो, तेव्हा या वाहिनीचे आर्थिक गणित बिघडलेले होते आणि कर्मचार्यांना जेमतेम पगारवर समाधान मानावे लागत होते, उदय आले आणि बघता बघता झी वाहिनी आर्थिक भरभराटीला केवळ उदय यांच्या आर्थिक नियोजनामुळे आली,परवा मला आमचा लाडका सुनील घुमे सांगत होता, निरगुडकरसाहेब येथे रुजू झाल्यानंतर आम्हाला जी वेतनवाढ झाली, निरगुडकर यांनी आमचे हे
केलेले काम विसरता येणे अशक्य. विशेष म्हणजे जवळपास ८०० कर्मचारी, अधिकारी, पत्रकार आणि इतर येथे काम करतात, त्या सार्यांना निरगुडकर नावानिशी ओळखतात, आवाज देतात, मी म्हणालो तेच खरे, उदय यांची बुद्धिमत्ता, त्यावर करावे तेवढे कौतुक कमी…ह्या चार ओळी त्यांच्यावर पुरेशा नाहीत, मला ठाऊक आहे, म्हणून जेव्हा केव्हा माझ्या लिखाणातून या राज्यातल्या सर्वगुणसंपन्न व्यक्तींचा उल्लेख मी करेन तेव्हा तेव्हा हमखास उदय निरगुडकर हे नाव लिहितांना मला मनापासून आनंद होईल….
In English by Vikrant Joshi
He is the man who after coming 1st in his 12th examination, dint know what to do. He chose Chemistry. Became a Chemical Engineer and today is leading Maharashtra’s no 1 channel along with a newspaper. He is a proud grandson of grandfather, who on just one advice from the great Lokmanya Tilak didn’t have sugar all his life till he passed away in 1987. He is the man who even at 46, will give any young actor/anchor a run for his money with his sheer enthusiasm about life. He is the man who loves chemistry and knows his reactions even at this age which he learnt in Class 12. He is the man, who came to Mumbai to give his father news about his achievements whilst he graduated from Pune, but as soon as he left for Pune again, his father had left him forever. He is the man who knows many foreign languages, has travelled the world (America 86) a zillion times and whose passport is the size of dictionary. He is man who has changed his career path in 5 Industries; Not before, he mastered them and acquired greatness. He is the man whose son has rejected London School of Economics admission just because it dosen’t have a football ground, but has admissions from the top Universities of the World. He is the man who has entries in his personal dairies, whom he met some 10 days ago, what the opposite person as wearing and what were his views on a situation or a person he had spoken about then. He is a record keeper. He has collection of Indian Classical Music CD’s that if you start today, it will get over after 3 years. He has a room full of record 13000 books. When this man speaks even the most powerful person in our State, just listens. He is the man who finally got his Doctorate in 2006 after Mother nature failed it twice. He is the Man to his lady, who is a leading cardiologist in Thane. He is the man who came to NSCI and being a Maharshtrain Brahmin gave a lecture on English classical music to the Christians and Parsis. He is the man who has successfully come in the IT Industry, conquered it and left it at a salary where a normal person even dreams to earn. He has travelled India on roads wherein very few of us might have ever heard of. He is the man, whose family consists of 18 Doctors. He is the man who has dedicated his weekends to the IIM and the IIT’s for lecturing. He is the man at the age of 26 travelled to many countries with late Pramod Mahajan not as a political analyst, but as an IT professional. He is the man who was offered a ‘job’ of a DEAN at Singapore (with a very FAT salary) but one lecture wherein Zee honcho Subhash Goyal attended changed his life. In 2012, the world of Marathi News, which was Wagle dominated got a man with emphatic voice and articulate analysis on Politics. He is none other than Dr. Uday Nirgudkar! Wow!! Is he real??
Yes my friends, he is! Pleasure was all mine when my father asked me on a boring ongoing sessions day at Vidhan Bhavan to come and join me at Zee’s office in Worli. I along with dad were meeting Dr. Uday Nirgudkar. I thought it will be a very formal meeting, but I didn’t know when the time clock shifted from 5pm to 720pm. Generally when I and dad meet, it is we who take the dominance in speaking, but we were so awestruck by this gentleman’s achievements, that we hardly spoke. Shahrukh’s FAN movie is about to release. I think more than SRK, of whose I’m diehard fan, my ideologies have changed. Yes, I admit, people of this intelligence and giving nature do exists in this world. Mind you he is selfless! When Doctor took the reigns of this marathi news channel Zee 24 taas, the channel was in doldrums both financially and the content. Today, the channel has topped the charts in terms of TRP’s and the salaries of 800 employees, whom by the way doctor knows by names, has increased 3 times. So a great achiever, a scholar, mentor to many and a great philosopher. He believes in bringing in change. Recently when ZEE group acquired DNA in 2007, Doctor was given the responsibility of heading the print also, which he is doing with equal attention. So Maharashtra is not all about film-stars, cricketers, and the scams, it is also about having people like Dr Uday Nirgudkar’s in the society. May you grow from strength to strength Doctor!!