Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

गिरीश ‘ कुबेर आणि भिकेची डोहाळे ‘ लागलेला लोकसत्ता :पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

धडपड करूनहि हवे ते क्रीम पोस्टिंग मिळत नाही, निवृत्त होईपर्यंत आता मिळते आहे त्या पोस्टिंगवर समाधान मानावे असा सारासार विचार लेखक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी करून सतत सवंग प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या या नवश्रीमंत प्रशासकीय अधिकार्याने जणू पिंजर्यातल्या मास्तरच्या भूमिकेत शिरून म्हणजे आपण कोण आहोत हे भान विसरून ढोलकीच्या तालावर एकदा पुन्हा त्यांचा मूळ स्वभाव या कार्यक्रमानिमित्ते मराठी जगतासमोर आणला आहे. या कार्यक्रमात नजरेतून किंवा बोलण्यातून आपण या राज्याचे जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहोत, याचे त्यांना विस्मरण होत असावे. खरे आहे ते, माणूस कुठेही असला किंवा बसला तरी आपला मूळ स्वभाव, शरीरात भिनलेली वृत्ती कधीही विसरत नाही, कुत्राच्या शेपटीसारखे ते असते. मागे एक चुटका तुम्हाला सांगितला होता कि शहरातल्या पोरी एकदम चालू अशी खुणगाठ मनाशी बांधलेला तरुण एका खेड्यातल्या तरुणीशी लग्न केल्यानंतर जेव्हा हनिमून साजरा करण्यासाठी तिला काश्मीरला नेतो, ७-८ दिवस तेथे मजेत घालविल्यानंतर ती त्याला विचारते, आपण सारे काही बघितले पण तुमचे ते हनिमून काय ते बघितलेच नाही, तिच्या या इनोसंट वाटलेल्या प्रश्नावर तो तिला म्हणतो, अग, रात्री जे काय चालायचे ना, त्यालाच हनिमून म्हणतात, आणि हे ऐकताच ती फिदी फिदी हसत म्हणते, आधीच सांगायचं कि, मी अन गावचा अनंत पाटील शेतात भेटलो कि हेच…थोडक्यात माणसाची वृत्ती त्याच्या वागण्यातून नेहमी उमटते, तो कुठेही पोहोचला तरी. लोकसत्ता या राज्यातले मोठ्या खपाचे मोठे दैनिक आहे, त्याचा वाचकवर्ग मोठा आहे, लोकसत्तेत छापून आलेल्या बातमीचा हवा तो परिणाम साधल्या जातो. वयानुपरात्वे अनेक संपादक या वृत्तपत्रात आले, निवृत्त झाल्यानंतर नवीन आले. त्या त्या संपादकांचे विश्वास पाटील यांच्यासारखे होते म्हणजे अंगात त्यांच्या जे गुण अवगुण होते, ते त्यांच्या लिखाणातून उतरायचे आणि त्यांच्या त्या वृत्तीनुसार लोकसत्ता दैनिकाचे रूप रंग बदलायचे अर्थात ते अपेक्षितच असते, सोडून गेलेला जुना प्रियकर हुबेहूब नवीन प्रियकरासारखा कसा असेल…? म्हणजे उद्या समजा 

चौफुल्याच्या नंदाबाई जवळकर लोकसत्तेच्या संपादक झाल्या तर नक्कीच त्या, लावणी आणि लावणीच्या नादि लागून बरबाद झालेले अनेक कसे श्रेष्ठ, मराठी माणसाला आपल्या लिखाणातून जवळकरबाई नक्कीच पटवून देतील किंवा समजा सुनील तटकरे उद्या या वृत्तपत्राचे संपादक झालेत तर लोकसत्ता दैनिकातून वारंवार अशा माणसांना प्रसिद्धी देण्यात येईल कि जे काळ्या पैशांच्या माध्यमातून नवश्रीमंत झाले आहेत. अर्थ असा कि जेव्हा लोकसत्तेचे संपादक अरुण टिकेकर होते तेव्हा हे दैनिक वाचतांना अनेकांना अनेकदा असे वाटायचे कि कोणीतरी आपल्याला सुनील शेट्टीचा डोक्यावरून गेलेला ‘ भाई भाई ‘ सिनेमा बघायला बसविलेले आहे किंवा माधव गडकरी संपादक असतांना महिन्यातून एखादी भानगड तरी ते बाहेर काढतील, ठरलेले असायचे, कुमार केतकर संपादक असतांना लोकसत्तेचा लोगो एकदिवस हाताचा पंजा होतो कि काय, अनेकांच्या मनात तशी पाल चुकचुकून जायची. सध्या गिरीश कुबेर लोकसत्तेचे संपादक आहेत, त्यांची लेखणी अर्थ विषयाकडे कायम झुकलेली असते. व्यापार, अर्थकारण असे बोजड विषय त्यांच्या आवडीचे, आणि आपल्याला जे आवडते तेच मराठी वाचकांना आवडायला हवे, असे कुबेरांना वाटत असावे. जसे पिणाऱ्या माणसाला वाटते, समोर बसलेल्या माणसाने देखील घ्यावी….स्वाभाविकपणे लोकसत्ता दैनिकाचे हे हिटलरछाप संपादक दररोज न चुकता त्यांच्या आवडीचे ‘ अर्थकारण ‘ लोकसत्तेची अनेक पाने वापरून वाचकांवर लादतात, इतरही विषय ते मांडतात पण असे विषय म्हणजे दारूच्या बाटलीसोबत चार पाच शेंगदाणे घेऊन बसल्यासारखे….

लोकसत्ता त्यामुळे बहुतेक वेळा बोजड, डोईजड, डोक्यांवरून जाणार्या विषयांना वाहून घेतलेले वृत्तपत्रे अलीकडे कुबेर संपादक झाल्यानंतर वाटू लागलेले आहे, विशेष म्हणजे कुबेर यांचा चेहरा जसा कायम आक्रस्ताळा वाटतो तसे त्यांचे लिखाण देखील म्हणजे असे वाटते कुबेर विनाकारण अमुक एखाद्या व्यक्तीवर किंवा विषयावर तुटून पडलेले आहेत. त्यांचा नेमका स्वभाव कस वाटतो त्यावर फार पूर्वी उद्धव ठाकरे यांचे अलिकडले ‘ नार्वेकर ‘ हर्शल प्रधान यांने सांगितलेला एक चुटका सांगतो…अमुक एखादी व्यक्ती जर निर्जन ठिकाणी ठेवली तर त्या व्यक्तीमध्ये कसे कसे बदल घडतात त्यावर अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना अभ्यास करायचा असतो म्हणून ते तीन वेगवेगळ्या पुरुषांना समुद्राच्या मध्यभागी एका निर्जन बोटीवर ठेवायचे असे ठरवितात. ठरल्याप्रमाणे ते पहिल्या माणसाला सांगतात, सहा महिने त्या बोटीवर राहतांना तुला काय हवे आहे, तो म्हणतो, खूप खूप खायला ठेवा, त्याची मागणी मान्य केली जाते, त्याला त्या निर्जन ठिकाणी असलेल्या बोटीवर ठेवून बोटीचे दर बंद करून शास्त्रद्न्य परत फिरतात, सहा महिन्यानंतर जेव्हा बोटीचा दरवाजा उघडल्या जातो, तो माणूस अगदी जाडजूड होऊन बाहेर पडतो. नंतर दुसर्याला विचारतात, तुला काय हवे आहे, तो म्हणतो, मला दारू हवी आहे, त्याचीही इच्छा पूर्ण करण्यात येते, सहा महिन्यानंतर जेव्हा बोटीचे दार उघडल्या जाते तेव्हा अतिशय खंगलेल्या अवस्थेत तो माणूस बाहेर पडतो कारण दारू ढोसून ढोसून त्याचे लिव्हर निकामी होते आणि तो खंगतो. शेवटी तिसर्या व्यक्तीला विचारल्यानंतर तो म्हणतो, अपुनको तो सिगारेट्स मंगता है, त्याचीही इच्छा पूर्ण करण्यात येते, सिगारेट्सचे कित्येक कार्टून्स त्या बोटीवर ठेवल्यानंतर त्याला आता ढकलून दरवाजा बंद करण्यात येतो, सहा महिने उलटल्यानंतर जेव्हा बोटीचा दरवाजा शास्त्रद्न्य उघडतात, बाहेर आलेला तो माणूस जवळच पडलेला एक लोखंडी रॉड हातात घेऊन शास्त्रज्ञांना बडवायला लागतो. ते विचारतात, आम्हाला का मारतो आहेस त्यावर मारता मारता तो म्हणतो, बोटीवर माचीस, आगपेट्या का ठेवल्या नाहीत हरामखोरांनो…? हा असा वैतागला माणूस मला सांगा तुम्हाला त्या गिरीश कुबेर यांच्यात दिसत नाही का….कायम चिडलेले, जणू प्रेयसी दुस्र्यासंगे पळून गेलेली आहे असा चेहरा करून बसलेले ते वाटतात. आपण तेवढे चांगले, शुद्ध, क्लीन, नीट, सरळमार्गी आणि उरलेले अख्खे मराठी विशेषत: राजकारणी एकदम वाईट, असा काहीसा अपसमज करून ते दिवसभर वावरतात, असे नाही का वाटत गिरीश कुबेर यांच्याकडे बघितल्यानंतर….

कुबेर आणि भिकेचे डोहाळे लागलेला लोकसत्ता २ : 

बबनराव नावाचे एक नेते आहेत, त्यांनी दारू सोडली, सिगारेट सोडली, चिकन-मटन खाणे सोडले थोडक्यात कुठलेहि अभक्ष 

भक्षण करणे सोडले, सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या…कुणासाठी, 

आईसाठी……….नाही,

बापासाठी……….नाही, 

बायकांपासून झालेल्या मुलांसाठी…..नाही, नाही…

पहिल्या बायकोसाठी……….नाही, 

दुसर्या बायकोसाठी……….नाही,

मग काय……….

मुंबईत नव्याने ठेवलेल्या बाईसाठी……….अजिबात नाही.

मराठवाड्यातल्या गर्लफ्रेंड साठी………शक्यच नाही.

मग कोणासाठी……….

…..

…..

…..

…..

…..

फक्त आणि फक्त 

मुळव्याधीसाठी……….!! 

थोडक्यात, 

जिभेचे चोचले बुडाला टोचले…


तसेच लोकसत्ता दैनिकाचे लोकप्रिय ठरलेले होते ते रुपडे बदलवून जेथे तेथे फक्त आणि फक्त अर्थकारण, असे सामान्य मराठी माणसाला न रुचणारे, मनापासून अजिबात न आवडणारे रुपडे कुबेर संपादक म्हणून येताच कोणासाठी बदलविण्यात आले,वाचकांसाठी….

नक्कीच नाही, केवळ आणि केवळ दस्तुरखुद्द गिरीश कुबेर यांना त्या विषयाची आवड आहे म्हणून….

नशीब आमचे, कुबेर यांना नाच गाणे, लेडीज बार, तमाशे इत्यादी वाईट ठरलेली व्यसने नाहीत किंवा या अशा विषयात त्यांना 

रस नसावा, अन्यथा….

शासनाने दिलेला मोक्याचा भूखंड नेमक्या कारणासाठी म्हणजे केवळ वृत्तपत्र चालविण्यासाठी न वापरता, त्या भूखंडाचा मतलबी वापर करणारे, त्यातून महिन्याकाठी करोडो कमाविणारे आम्ही मराठी वाचक ‘ गोयंका ‘ नाहीत, त्यामुळे सतत अर्थकारण डोक्यात न ठेवता, आमचा कल बौद्धिक भूक भागविण्याकडे असतो, त्यामुळे लोकांचे हे वृत्तपत्र आता केवळ गोयंका छाप वृत्तीच्या शेठजी लोकांसाठी हल्ली हल्ली छापल्या जाते कि काय, मनास शंका येऊ लागलेली आहे….केतन तिरोडकर यांच्यासारखा एखादाच बेधडक RTI Activist न्यायलयात किंवा शासकीय दरबारी विचारण्याची हिम्मत ठेवेल कि या राज्यात विशेषत: मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात शासनाने जे मोक्याचे भूखंड, वृत्तपत्र चालविणाऱ्या विविध शेठजी वृत्तीच्या, असे अर्थात काही मराठीतले देखील शेठजी वृत्तीचे आहेत, तेही येथे स्पष्ट करतो, वृत्तपत्र मालकांना शासनाने अल्प दरात उपलब्ध करून दिले होते, आज नेमके त्या जागेवर काय चालते म्हणजे फक्त आणि फक्त तेथे वृत्तपत्राचे कार्यालय आहे कि ज्या कारणासाठी हे भूखंड देण्यात आले होते ते कार्यालय कुठेतरी स्वस्त जागेत स्थलांतरित करून शासनाने स्वस्तात उपलब्ध करून दिलेल्या भूखंडांवर वृत्तपत्र मालकांनी बक्कळ पैसा मिळवून देणार्यांना अशा जागा भाड्याने दिल्या आहेत…..माझी माहिती तर अशी आहे कि काही वृत्तपत्र मालकांनी शासनाने दिलेले भूखंड बिल्डर्स मंडळींना विकून त्यातून करोडो रुपये पदरात पडून घेतलेले आहेत….!! बघूया नेमक्या विषयाची हिंट दिल्यानंतर कोण असा मायचा लाल पुढे येउन या अशा वृत्तपत्र मालकांना तुमची नेमकी जागा कोणती, दाखवून मोकळा होतो…दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण किंवा स्वत: फाटकी चड्डी नेसून, इतरांना न चुकता, तुझी फाटकी तुझी फाटकी, सांगत फिरतो, त्याला अलीकडे, मला वाटते एखाद्या वृत्तपत्राचा मालक किंवा संपादक म्हटल्या जाते. इतरांनी फक्त वाईट धंदे करावेत आणि वृत्तपत्रात काम करणार्यांनी ते करू नयेत असे मी अजिबात म्हणणार नाही पण एखादा गुंड जसे कबुल करतो कि होय, मी गुंड आहे तसे वृत्तपत्रात काम करणाऱ्या मंडळींनी देखील सांगून टाकावे कि होय, आम्ही वाईट वृत्तीची माणसे आहोत तरीही आम्ही तुम्हाला ज्ञान पाजणार आहोत म्हणजे विषय संपतो….

आमच्या वृत्तपत्र सृष्टीत आबा माळकर किंवा भाऊ तोरसेकर यांच्यासारखे बोटावर मोजण्याएवढे जे काही निरपेक्ष वृत्तीने पत्रकारिता करतात, अशा मंडळींकडे देखील अनेकदा उगाचच संशयाने बघितल्या जाते थोडक्यात पूर्वी फोर्हास रोडवर राहणाऱ्या चांगल्या घरातल्या स्त्रियांकडे देखील जसे संशयाने बघितल्या जायचे किंवा या परिसरात राहणाऱ्या घरंदाज घरातल्या मुलींचे लग्न जुळवतांना त्यांच्या मायबापाला जो मानसिक त्रास विनाकारण व्हायचा ते तसे आमच्यातल्या अनेकांचे या अशा ढोंगी प्रवृत्तीमुळे होते. जसे पतंगराव कदम यांनी हो, मला दोन तीन बायका आहेत, अगदी जाहीर सांगून देखील त्यांना मतदारांनी वर्षानुवर्षे निवडून दिले, लोकमान्य नेता अशी लोकप्रियता त्यांना मिळाली किंवा डी वाय पाटील देखील दोन दोन बायका करून या देशात राज्यपाल झाले तसे आमच्यातल्या बद्माशांनी अगदी जाहीर सांगून मोकळे व्हावे कि आम्ही वाईट आहोत तरीही आम्ही तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजणार आहोत, आम्ही मराठी वाचक मनाने सुधृड आहोत, तुमची वाईट वृत्ती खपवून घेऊ वरून तुमच्या लिखाणावर फिदा राहू पण तुम्ही ढोंग पांघरून वरून उगाच डांगोरा पिटत फिरू नका, लोकसत्ताच्या गोखले आडनावे संपादकाला दोन बायका होत्या तरीही ते संपादक, मला वाटते, आजतागायत झालेल्या संपादकांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय होते.आम्ही चांगले आहोत, असा विनाकारण डांगोरा पिटत राहू नका, तुम्ही आहात तसे स्वीकारायला मराठी वाचक तयार असतो. लोकमत दैनिक सर्वाधिक खपाचे आहेच कि. सज्जन आहोत, खोटे सांगू नका, सब्कुछ दिखता है….या अशा बाबतीत मला निखिल वागळे यांची भूमिका कायम पटत आलेली आहे म्हणजे मी स्वत: असो किंवा भाऊ तोरसेकर यांच्यासारखा निर्भीड वृत्तीचा पत्रकार, अनेकदा आम्ही वागळे यांची त्यांनी आयुष्यात केलेल्या चुकांवर खिल्ली उडवलेली आहे किंवा नेमक्या चुका सपुरावा वाचकांसमोर मांडल्या आहेत, पण आमचे सत्य लिखाण वागळे यांनी आजतागायत कायम अतिशय खिलाडू वृत्तीने स्वीकारले, लोकांचे दोष कायम उघड करणारे निखिल त्यांची उघडी पडली म्हणून कधीही अस्वस्थ होतांना दिसले नाहीत. नीलकंठ खाडिलकर यांनी देखील कधी इन्कार केला नाही कि ते बातम्या छापण्याचे पैसे घेत नाहीत, तरीही नवाकाळ टिकून आहे, लोकांना कळते, वृत्तपत्र चालविण्यासाठी पैसा लागतो, फक्त त्यांना ढोंगी पत्रकार रुचणारे नसतात, त्यांचा मग ‘ मोतेवार ‘ होतो. तोंडात विष्ठा ठेवून श्रीखंड चघाळतोय, सांगत फिरू नये, वास्तव सांगावे…

Previous Post

व्यक्तिविशेष २ : डॉ. रणजीत पाटील

Next Post

स्वाभिमानी संघटना आणि हिरवे हिरवे दिसे नेत्यांना १: पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post

स्वाभिमानी संघटना आणि हिरवे हिरवे दिसे नेत्यांना १: पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.