आपण सारेच सध्या प्रचंड तणावाखाली आहोत, ज्याची त्याची बायको देखील तणावाखाली आहे, चिडलेली आहे, काळजीत आहे,तिला पडलेला प्रश्न हाच कि उशांखाली, साडीच्या घडीत, माहेरी आईकडे, चहा साखरेच्या डब्यात, मैत्रिणींकडे पै पै करून जो पैसा तिने दडवून ठेवला होता, तो अचानक नवऱ्याला काढून द्यावा लागला, पुढे तो परत मिळेल किंवा नाही शिवाय बिंग फुटल्याने झालेली फजिती ह्या बायका विसरलेल्या नाही त्यामुळे विवाहित नवऱ्याला जेवढ्याशिव्या त्यांनी आजपर्यंत हासडल्या नसतील तेवढ्य शिव्या अलीकडे त्या, बायको जवळ नसलेल्या मोदींना देऊन मोकळ्या होताहेत आणि आम्हा पुरुषांची अवस्था तर अतिसाराचा, हागवणीचा आजार लांबलेल्या रोग्यासारखी झालेली आहे, आमचे प्रत्येकाचे चेहरे मूळव्याधीच्या रोगाने बेजार झालेल्या माणसासारखे अलीकडे दिसू लागलेले आहेत, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही….
जो तो जणू दारावर बसायला आले आहेत अशा पद्धतीने एकमेकांना भेटतो, अन्न गळ्याखाली उतरत नाही आणि कसेबसे झोपतो पण दोघेही एकमेकांकडे पाठ करून, मोदींनी आयुष्यातली जणू गम्मत घालवली आहे, पण हि तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे भाई…नरेंद्र मोदी यांनी बंद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा खरा मोठा फटका बसलाय तो या राज्यातल्या, या देशातल्या कर भरण्यात जाणून बुजून पिछाडीवर स्वतःला ठेवणाऱ्या मुसलमानांना. दडवून ठेवलेल्या नोटा आता काढायच्या कशा आणि रिचवायच्या, बदलाच्या कशा या विवंचनेत जसे मुसलमान आहेत तसे परेशान आहेत या राज्यातले सरकारी नोकरीत काम करतांना प्रचंड काळा पैसा विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दडवून ठेवणारे सरकारी अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी. येथे भारतात राहतांना कुराणाचा दाखला देऊन कर न भरणारे मुसलमान पाश्चिमात्य देशात मात्र झक मारून कसे सुतासारखे सरळ वागतात, कर भरण्यात तेथे मात्र आघाडीवर असतात, थोडक्यात त्यांना येथे वाटत होते, गरिबकी जोरू सबकी भाभी, पण मोदी खमके निघाले म्हणून बरे झाले, द्या आता उत्तरे साऱ्याच भारतीयांनी सरकारला कि काळा पैसा आणला कोठून….?
खरी गम्मत तर पुढल्या काही महिन्यात येणार आहे, जेव्हा तुम्ही आम्ही जर बेनामी मालमत्ता जमा केली असेल तर त्यावर उत्तरे देतांना. एक काल्पनिक उदाहरण देतो, समजा मनोरमा कल्याणकर नावाच्या बाईचा पुण्याला बाणेर परिसरात एक प्लॉट आहे, ज्या प्लॉटची किंमत खरेदी करतांना देखील पाच कोटी रुपये होती, आता मनोरमाला सरकारी यंत्रणा विचारेल कि ती काय करते, मनोरमा सांगेल, मी गृहिणी आहे आणि माझा नवरा प्राथमिक शिक्षक आहे, मग हा प्लॉट घेतला कसा, त्यावर घाम फुटलेल्या चेहऱ्याने ती सांगेल, साहेब हा माझा प्लॉट नाही, सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर जे नरेंद्र कल्याणकर आहेत, त्यांनी माझ्या नावाने गुंतवलेला हा पैसा आहे, जे माझे दूरचे नातेवाईक आहेत. थोडक्यात बेनामी मालमत्ता जमविलेल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना किंवा इतर कोणालाही, कितीही दूर पळू द्या, यापुढे वामार्गाने पैसे जमा केलेल्या कुठल्याही भारतीयांची सुटका नाही. गम्मत म्हणजे जो उठला त्या प्रत्येकाने एकतर सोने किंवा डायमंड खरेदी केले किंवा सी ए ला हाताशी धरून मोदी यांच्या घोषणेनंतर कलकत्ता पॅटर्न ज्याला म्हणतात, त्यापद्धतीने आपल्या सी ए कडे सारा पैसा जमा केला, यातही सुटका नाही, ज्या सी ए मंडळींनी असे पैसे मोठे कमिशन घेऊन ताब्यात घेतले ते सारे पुढल्या काही महिन्यात त्यांच्या अशीलांसहित बिहाइंड द बार असतील आणि दाम दुप्पट भावाने सोने चांदी डायमंड विकणारया व्यपाऱ्यांना आज आनंद झाला आहे कि त्यांनी कसे लुटलेले आहे या दिवसात त्यांच्या ग्राहकांना, डोन्ट वारी, हे सारे व्यापारीही पुढल्या काही दिवसात तुम्हाला सुतासारखे सरळ झालेले दिसतील, त्यांना मोदी नक्की पळता भुई थोडी होणार आहे. सामान्य माणसाची मात्र जी फजिती होते आहे, ते मात्र चुकीचे, त्याची किंमत नक्कीच भाजपा आणि मोदी यांना मोजावी लागणार आहे…
आता तो दिवस फार दूर नाही कि तुमच्या घरी येणारी कामवाली, तिच्या मालकीच्या कार मधून येतेय किंवा शेतात राबणारा मजूर आपली बाईक घेऊन येतोय, यापुढे कुठलाही भारतीय असुरक्षित फील करणार नाही, त्याचे वय ६० पुढे झाले कि सरकार त्याला साऱ्या सुविधा आणि वरून निवृत्ती वेतन देऊन मोकळे होईल, विशेष म्हणजे या देशातल्या सुशिक्षित बेरोजगाराला देखील मोठ्या रकमेचे वेतन देण्यात येईल, जेणेकरून तरुणाला वाटणार नाही कि आपण बापाच्या भरवशावर जगतोय….
सरळमार्गी माणसाला वाटायचे, सरकार दरबारी काळा पैसा जमा होणे आवश्यक आहे, मोदींनी ते केले, आणखी आणखी ते करताहेत. आजपर्यंत आपण श्रीमंत अमेरिका आणि प्रगत चीन बघायला जात होतो, नजीकच्या भविष्यात नक्की वेगळे घडेल, ते येतील सुजलाम सुफलाम भारत बघायला..
अपूर्ण.