अमुक एखाद्या खात्याचा मंत्री जर त्या खात्याशी आधीपासून संबंधित असेल
तर त्या मंत्र्यांचे काम अधिक सोपे होते फक्त विषय असतो सकारात्मक
वृत्तीचा, विचारांचा, जसे सुभाष देशमुख हे सहकार खात्याचे मंत्री झाले, पण ते मंत्री होण्यापूर्वीच सहकार क्षेत्रात अनुभवसिद्ध होते. अनुभवी नेते होते.
सहकार क्षेत्रात काम करण्याचा त्यांना तगडा अनुभव आहे, होता. आघाडीच्या
राजवटीत सहकार क्षेत्र गाजवून सोडणे तेवढे सोपे नव्हते पण अलीकडे वादग्रस्त
ठरलेल्या, पार बदनाम झालेल्या सोलापुरातील लोकमंगल सहकारी बँकेच्याच्या
माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविलेली असल्याने आपसूकच
त्यांच्याकडे ते मंत्री झाल्यानंतर सहकार खाते आले. त्यांना सहकार मंत्री करण्यात
आले. विशेष म्हणजे अमित शाह यांचे अत्यंत लाडके चंद्रकांत पाटलांकडून हे
खाते हिसकावून घेण्यात आले आणि सुभाष देशमुख यांना सुपूर्द करण्यात आले.
ज्या सहकार क्षेत्रात या राज्यातल्या आघाडीच्या बड्या धेंडांनी धुडघूस घालून
सरकार आणि सहकार लूट लूट लुटले त्या सहकार सम्राटांना श्रीमान चंद्रकांत
पाटील किंवा सुभाष देशमुख नाक घासायला लावतील असे भाजपातल्या दिग्गजांना
वाटले होते पण ते अजिबात घडले नाही याउलट सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात
या राज्यात भाजपशी संबंधित असलेले जे सहकार क्षेत्रात झोकून देणारे आहेत
ते देशमुख यांच्या सभोवताली फारसे फिरकतांना दिसत नाहीत पण सुभाष देशमुख
आणि त्यांचा बेरकी स्टाफ आघाडीच्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप खूप
प्रेमाने जवळ घेतो असे दृश्य सतत बघायला मिळते किंबहुना असे सतत जाणवते.
सुभाष देशमुख यांना भाजपातून नव्हे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातून जणू
मंत्रिपद मिळाले आहे असे सतत वाटत राहते. अजून त्यांच्या कामाची चांगली अशी
किंवा विरोधकांच्या नाकात दम आणणारी झलक बघायला मिळालेली नाही, कौतुक
करावे असे अजिबात घडले नाही. उलट नोटा बंदी नंतर त्यांची बदनामीच अधिक झाली.
याउलट अगदी अतिसामान्य कुटुंबातून पुढे विद्युत मंडळात कंत्राटदार म्हणून पुढे आलेल्या
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री किंवा आमदार होण्याआधी आपली विद्युत मंडळातली
कंत्राटदार सोडली आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी वीज खात्याचे मंत्री म्हणून जे अप्रतिम
स्ट्रोक किंवा फटके मारणे सुरु ठेवले आहे, त्याचा परिणाम म्हणजे जे खाते अजित पवार किंवा
सुनील तटकरे यांनी अक्षरश: रांड करून सोडले होते, त्या वीज खात्याला वठणीवर ताळ्यावर
आणण्याचे कर्तव्य, मोठे काम मोठ्या खुबीने बावनकुळे पार पाडताहेत ज्याचा अभिमान
नागपूरकर मुख्यमंत्र्यांनाही आहे…