एक चुटका तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेला आहे, पुन्हा एकदा तो रिपीट करतो…
मुजफ्फर रूबेन म्हणजे त्या ऑफिसमधला एक श्रीमंत,
काहीसा रंगीला, दिसण्यात रुबाबदार बॉस,
काही जागा रिक्त असल्याने मुजफ्फरच्या ऑफिसमध्ये
मुलाखती घेणे सुरु होते, मुलाखत द्यायला सुंदर सेक्सी
मुली, तरुणी, सौन्दर्यवती आल्या होत्या…
सर्वप्रथम आलेल्या ३० वर्षाच्या लाजऱ्या प्रियाला
बॉसने विचारले,
आजपर्यंत काय कसे काय….?
सर, मी अतिशय धार्मिक आणि तत्वांना चिटकून
चालणारी सुसंस्कृत तरुणी. सभयता आणि
प्रामाणिकपणे काम करत राहणे माझे ध्येय..
बेल दाबून मुजफ्फर यांनी सूचना केल्या,
प्रियाला कार्यालयाची प्रमुख करा…
नंतर तिशीतलीच मिता आली. काय कसे काय
वागलात आजवर….?
हे विचारल्यावर मुजफ्फर यांच्या भेदक नजरेला
लाजून उरोजांवरचा साडीचा पदर नीट करीत
मिता म्हणाली, सर, सुरुवातीला कॉलेज शिकत
असतांना मी काहीशी चंचल होते, धमाल मस्ती
केली पण नंतर मात्र नको ते चंचल वागणे, मी
देवासमोर शपथ घेतली आणि चांगले जीवन
जगू लागली…
मुजफ्फर यांनी बेल दाबून सांगितले,
अरे, या मिताला प्रियाच्या नेक्स्ट पोस्ट द्या.
शेवटी नटखट चंचल सावळी अतिशय सेक्ससी,
उफाडी तोकड्या कपड्यातली बबिता आत येताच
तिने मुजफ्फरला हाय म्हणून त्याचा हातात हात
घेत करकचून शेखहॅन्ड केला. मुजफ्फर खुर्चीवर
सावरून बसत २५/२६ वर्षे वय असलेल्या बबिताला
विचारता झाला,
आजवरचा तुझा प्रवास…?
बबिता बिनधास्तपणे बोलती झाली,
आहे अगदी तसाच,
डिस्को, मौजमस्ती, ड्रिंक्स, मित्र अधिक
त्यांच्याबरोबरीने रात्री उशिरापर्यंत धमाल
मस्ती, मग केव्हातरी घरी जाणे…
मुजफ्फरने आधी आवंढा गिळला, नंतर
नेहमीप्रमाणे बेल दाबत त्याने सूचना केल्या,
बबिता आजपासून माझी सेक्रेटरी,
तिला माझ्या केबिनला खेटून टेबल द्या,
आणि हो,
ती माझ्याकडे आत असतांना बाहेर
भूकंप जरी झाला तरी मला आत
सांगायला यायचे नाही….
मीरा भायंदर महापालिकेत तब्बल २२ वर्षे नगररचनाकार म्हणून ठाण मांडून बसलेल्या मराठवाड्यातील मूळ लातूरच्या आणि सासुरवाडी
देखील लातूरच्या आसपास असलेल्या दिलीप घेवारे मध्ये आणि वर चुटक्यात सांगितलेल्या बबिता मध्ये हे असेच कमालीचे साम्य आहे.
मुख्यमंत्री महोदय, तुम्ही भ्रष्ट हलकट दुष्ट शासकीय अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाता, या घेवारेचे काही, संपूर्ण नाही, कारनामे विधानसभेत, हिवाळी अधिवेशनात उघड करणाऱ्या तुमच्या राजकीय विरोधकाला म्हणजे आमदार नितेश नारायण राणे आणि मला विश्वासात घेऊन नेमका घेवारे कसा तंतोतंत समजावून घ्या आणि काही भ्रष्ट अधिकारी कसे दूर फेकलेत तोच निर्णय घेवारे बाबतही घ्या. घेवारे म्हणजे आजवरच्या नगरविकास खात्याशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचा, राज्यमंत्र्यांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा, मीरा भायंदर परिसराशी जमीन जुम्ल्याशी संबंध येणाऱ्या आमदारांचा, ठाणे जिल्ह्यात पालक मंत्री म्हणून काम केलेल्या मंत्र्यांचा,पुढाऱ्यांचा, आमदारांचा पुढाऱ्यांचा, बिल्डर लॉबीचा दलालांचा अतिशय लाडका अधिकारी, जणू चुटक्यात सांगितलेल्या बबितासारखा म्हणजे जमीन व्यवहारांना चटावलेल्या प्रत्येकाचा लाडका जणू चुटक्यातला बबिता. आमदार नितेश राणे यांना घेवारे प्रकरण सभागृहात आणू नका म्हणून त्यांना विविध प्रकारे प्रेशर आणण्यात आले, लालूचही दाखवण्यात आली पण निर्भीड आणि तृप्त राणे यांच्यासमोर घेवारे आणि कंपूचे काही एक चालले नाही आणि घेवारे याने मीरा भायंदर परिसरात बिल्डर लॉबीला हाताशी धरून कसा जमीन घपला, घोटाळा केला ते त्यांनी उजेडात आणले. आता पुढले काम मी करतो, घेवारे नेमका कसा कोट्याधीश आणि महा बिलंदर तुमच्यासमोर, मुख्यमंत्री महोदय, नेमके मांडतो. अतिशय सावध राहून कमावलेल्या काळ्या पैशांची विल्हेवाट लावणाऱ्या दिलीप घेवारेला सहजासहजी जाळ्यात अडकवून नेमकी माहिती घेणे प्रसंगी आयकर विभागाला किंवा सक्त वसुली संचनालयाला देखील शक्य झाले नसते, निदान आज तरी वाटते, घेवारे याचे दिवस भरले आहेत, तुम्ही मात्र घेवारे आडनावाचा हा महाबिलंदर सहजासहजी कोणत्याही दबावाला बळी न पडता, कृपया त्याला सोडू नका, त्याची जागा त्याला दाखवा…
नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करतांना भास्कर जाधव आणि उदय सामंत यांची अवस्था घेवारे बाबतीत बबिताच्या बॉससारखी, मुजफ्फर सारखीच झाली होती, त्या दोघांना घेवारेशिवाय क्षणभर करमत नव्हते, त्यांच्या या लळा लागलेल्या स्वभावाचा नेमका मोठा गैरफायदा घेवारेने स्वतःसाठी करवून घेतला, घेवारे आणखी श्रीमंत झाला. वास्तविक उदय सामंत आणि भास्कर जाधव यांचे आपापसात विळ्याभोपळ्याचे सूत. भास्कर जाधव रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात आदळआपट करायचे आणि काहीसे मिश्किल पण चतुर उदय सामंत त्यांना हळूच चिमटा काढून गम्मत बघत बसायचे. उदय सामंत यांच्या मदतीला नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणूनच राजकीय करिअर सुरु करणाऱ्या सुनील तटकरे यांची उदय सामंत यांना कधी आतून तर कधी उघड मदत असायची, दोघे मिळून मग भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द कशी संपेल, एकमताने खेळी खेळायचे. त्यात हे दोघे यशस्वी झाले, भास्कर जाधव चिडक्या स्वभावातून अलीकडे राजकारणातून जवळपास बाहेर फेकल्या गेले. पण ज्या भास्कर जाधव नगरविकास राज्यमंत्री असतांना त्यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून किंवा त्यांचा उजवा हात म्हणून बिलंदर महाचोर घेवारे जाधवांच्या कार्यालयात ठाण मांडून बसला होता, जाधव यांचे राज्यमंत्रीपद गेल्यानंतर आणि त्यांच्या कट्टर राजकीय शत्रूकडे ते आल्यानंतर पुन्हा एकवार पैसे कसे मिळवायचे यांचे नेमके तंत्र ठाऊक असलेल्या घेवारेला कुठलाही मागला पुढला विचार न करता, नव्याने नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होताच, श्रीमान उदय सामंत यांच्या कार्यालयातील ‘ बबिता ‘ म्हणून घेवारे रुजू झाला, आणखी आणखी नेहमीप्रमाणे श्रीमंत होत गेला….
क्रमश: