Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

घेवारेला आवरारे ६ : Patrakar Hemant Joshi

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

आमदार नितेश राणे यांनी मोठ्या पोटतिडकीने मीरा भायंदर मध्ये लफंग्या

नगररचनाकार दिलीप घेवारे याने घडवून आणलेले जमीन घोटाळा

प्रकरण नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मांडले पण का कोण जाणे,

डोळे मिचकावत हेच म्हणणेयेथे योग्य ठरेल कि नामदार रणजीत पाटलांनी

घेवारे आणि कम्पूला त्यादिवशी जणू पाठीशी घातले, वास्तविक दिलीप

घेवारे यास या अतिशय मोठ्या गंभीर जमीन घोटाळ्याप्रकरणी तेथल्या तेथे

नोकरीतून बडतर्फ करणे अत्यावश्यक होते पण ठोस कारवाई झाली नाही

आणि निदान त्याक्षणी दिलीप घेवारे सुटला, पण त्याला वाटते तेवढे हे

प्रकरण आणि त्याने केलेल्या अन्य भानगडी यातून त्याची सुटका झाली,

नाही, असे अजिबात नाही. मी ठरवलंय, अजिबात तोडपाणी न करणाऱ्या

यजुर्वेदी राव यांच्यासारख्या निधड्या  आरटीआय आक्टिविस्ट कडे घेवारे

संदर्भात माहिती पुरवायची आणि न्यायालयात घेवारे यांच्या अनेक भानगडी

सापुरावा सादर करून या अतिशय भ्रष्ट अधिकाऱ्याला धडा शिकवायचा…

आश्चर्य म्हणजे दिलीप घेवारे हे नगररचनाकार या पदासाठी शैक्षणिकदृष्ट्या

पात्र नाहीत असा अहवाल तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी

जोशी यांनी तीन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाने त्यावर

नेमकी चौकशी करून दिलीप घेवारे याला त्यापदावरून अजिबात हाकलून

न देता वरून जणू घेवारे यास सरकारचा जावई मानून त्याला आहे त्याच

पदावर अद्याप पर्यंत ठेवले आहे, कायम केले आहे. श्रीमती अश्विनी जोशी

यांचा तो खळबळजनक अहवाल लवकरच मी येथे मांडणार असून तो

अहवाल घेवारे प्रकरण न्यायालयात नेल्यानंतर जमीन घोटाळा केस अधिक

बळकट करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे….

दिलीप घेवारे सध्या आहे त्या नागररचनाकार पदावर काम करण्या लायक

नसतांना वरून त्याचे हेही गंभीर प्रकरण अत्यंत निर्मळ आणि बेधडक

रणरागिणी वृत्तीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जातीने

शासनाकडे विशेषतः नगरविकास विभागाकडे लावून धरले तरीही उपयोग

शून्य झाला म्हणजे या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदार मुलगा नितेश

राणे असो कि या राज्याची झाशीची राणी जिला अभिमानाने म्हणावे त्या

अश्विनी जोशी असोत, अजिबात त्या हरामखोर राज्यबुडव्या दिलीप घेवारे

यास फरक पडला नाही, तो आहे तेथेच आहे, नेमके कुठे कोणती लालूच

दाखवली कि प्रकरण अगदी सहज मिटते त्याला ठाऊक असल्याने तो आता

कोणालाही जुमानेसा झाला आहे, जणू दिलीप घेवारे याचा बालही बाका

करण्याची हिम्मत या शासनात नाही. दिलीप फिदीफिदी हसत त्यादोघांकडे

म्हणजे जोशी आणि राणे यांना माकडासारख्या वाकुल्या दाखवत आहे त्याच

पदावर धम्माल मजा करतोय….

विषयांतर करतो,

काल मी न्हाव्याकडे ( डोक्याचे ) केस कापायला गेलो होतो, माझ्या एक

खुर्ची सोडून बरेचसे टक्कल पडलेला एक माणूस केस कापून घेत होता,

सोबत त्याने त्याच्या ७-८ वर्षांच्या मुलीलाही आणले होते ती पण तेथल्या

एका खुर्चीवर बसलेली होती. वास्तविक न्हाव्याने ज्यांचे अर्धवट टक्कल

पडलेले असते त्यांच्याकडून दुप्पट दाम घ्यायला हवे कारण न्हाव्याला

आधी केस शोधावे लागतात नंतर ग्राहकाच्या डोक्याला इजा न होऊ देता

मोठ्या खुबीने केस कापावे लागतात कारण असे केस कैचीत पटकन येत

नाहीत, ते लहान मुलांसारखे इकडून तिकडे दुडू दुडू पळतात. तो माणूस केस

कापून घेत असतांना समोर अचानक झुरळ आल्याचे बघून त्याने क्षणार्धात

झुरळाला घाबरून अख्खे पार्लर डोक्यावर घेतले, त्याची मुलगी मात्र शांत

बसून फिदी फिदी बापाच्या या गांडूगिरीवर हसत होती. झुरळ त्याच्या

मागे आल्यानंतर हे महाशय पार्लर मध्ये काम करणाऱ्या एका गोऱ्यागोमट्या

छोरी मागे जाऊन उभे राहिले, झुरळ आणखी जवळ आले असते तर कदाचित

ते सहा फुटी ग्राहक मागे धर्मेंद्र जसा त्याच्या आईचे सिनेमात काम करणाऱ्या

नटीला झिंग चढल्यानंतर ‘  माँ ‘ म्हणून मध्यरात्री नको त्या अवस्थेत झोंबला

होता ते तसे या माणसांचेही झाले असते, तो देखील पार्लरमधल्या पोरीला

लहान मुलासारखे घट्ट पकडून मोकळा झाला असता…..

बायका पाल झुरळ किंवा कुत्र्या मांजरीला घाबरतात एकवेळ आपण समजू

शकतो पण मर्दासारखे मर्द देखील या छुटपूट प्रकाराला घाबरतात हे जरा

अतीच वाटते. मागे एकदा मी आणि मित्र एकाच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या

घरातला कुत्रा अनोळखी म्हणून आमच्याकडे भुकांत आल्यानंतर माझा तो

मित्र मला एवढे घट्ट बिलगला कि क्षणभर मला माझा कारण जोहर झाल्या

सारखे वाटले. आता मी ठरवलंय एखाद्या झक्कास पोरीला एकदा त्या

मित्राकडे सहजच म्हणून घेऊन जायचे….

मित्रहो, एक घरगुती सोप्पा उपाय सांगतो. तुमची बायको उठसुठ तुमच्या

अंगावर लाटणे घेऊन धावून येणारी असली तर तुम्हीही एक कुत्रे घरात

बांधून ठेवा, ती अंगावर आली कि कुत्र्याला समोर करा, बघा दररोजच्या

मार खाण्यातून तुमची कशी सुटका होते ते….

मला हे काळात नाही माणसे कुटुंब सदस्यांपेक्षा पाळलेल्या प्राण्यांवर का

अधिक प्रेम करतात. माझ्या शेजारी एक चाळिशीतल्या बाईंनी छोटे कुत्रे

पाळलेले आहे, त्या बाईंनी आजतागायत जेवढ्या वेळ नवऱ्याला किस केले

नसेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ती त्या कुत्र्याला किस करत असते.

देवा, पुढल्या जन्मी तरी मला त्या बाईचा कुत्रा कर. अमेरिकेत पटेल आडनावे

माझे मित्र आहेत, चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांची उफाडी विवाहित मुलगी

पाळलेल्या कुत्र्यावर महिन्याकाठी लाखभर रुपये खर्च करते, नवरा पलीकडल्या

पलंगावर आणि पाळलेले कुत्रे तिच्या कुशीत शांत झोपलेले असते, येथेही तेच,

देवाकडे मागणे, पुढल्या जन्मी मला….

क्रमश:

Previous Post

OFF THE RECORD review of some of headlines…

Next Post

OFF THE RECORD review on some of todays headlines….

tdadmin

tdadmin

Next Post

OFF THE RECORD review on some of todays headlines....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.