मगरीचे अश्रू : पत्रकार हेमंत जोशी
दैनंदिन जीवनात प्रत्येक कामाचे आपण मोल मोजतो, घरी येऊन मुलांची शिकवणी घेणारीला तिची फी मोजतो, मोलकरणीला तिचा महिन्याचा ठराविक पगार देतो, उत्तम सेवा दिली कि हॉटेल मध्ये वेटरच्या हातावर भरगोस टीप ठेवतो, केस कापणे झाल्यावर न्हाव्याला पैसे मोजतो थोडक्यात मिळणाऱ्या प्रत्येक सेवेचे आपण सारेच दरक्षणी पैसे मोजतो, आणि तेच आपण शासनकर्त्यांच्या बाबतीतही करतो. जो उठतो तो म्हणतो आम्ही हे केले आम्ही ते करून दाखविले, पण कोणीही काहीही फुकट केलेले नाही, या राज्यात जे म्हणतात, आम्ही हे करवून दाखविले त्यांच्यातल्या एकानेही काहीही फुकट केलेले नाही म्हणजे एखादा शिवाजीराव मोघे किंवा अशोक चव्हाणांचा किंवा अन्य कुठल्याही नेत्याचा किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याचा समर्थक जर म्हणत असेल कि ह्यांनी अमुक केले तमुक केले अश्विनी जोशी, तुकाराम मुंडे, अण्णा हजारे, पोपटराव पवार, चंद्रकांत दळवी, श्रीखर परदेशी, दीपेंद्रसिंह कुशवाह, दिवंगत आर आर पाटील यांच्यासारखे अगदी बोटावर मोजण्याएवढे ज्यांनी समाजासाठी, राज्यासाठी जे केले किंवा जे करताहेत ते सारे अपेक्षाविरहित, बाकीच्या साऱ्यांनी आपल्याकडून केलेल्या आमच्या मोबदल्यात लाच म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारलेली आहे, घरी नेलेली आहे, कधी काळी भिकारीसाले, आज हे हरामखोर अतिशय श्रीमंत आहेत, त्यांच्या पुढल्या कित्येक पिढ्या मजा मारणार आहेत. हे सारेच अशोक चव्हाण किंवा रमेश कदम किंवा अंकुश चव्हाण आहेत ज्यांनी नेते किंवा अधिकारी म्हणून आपल्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत त्यामुळे आम्ही अमुक एक केले असे जेव्हा एखाद्या बड्या नेत्याच्या समर्थनार्थ कोणी म्हणतो तेव्हा वाटते हेच सांगावे कि बाबारे तुझ्या आवडत्या नेत्याने, मंत्र्याने, मुख्यमंत्र्याने, अधिकाऱ्याने फुकट काहीही केलेले नाही, आम्ही मराठींनी त्याची जबरी किंमत आजतागायत मोजलेली आहे, बघा मग असे समर्थक कसे ढुंगणाला पाय लावून तुमच्यासमोरून पळ काढतात. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या बाबतीत टीका करतांना लिहिला होता, ज्याचा धागा पकडून सेनेच्या विरोधक उमेदवारांनी त्यादरम्यान तो मुद्दा प्रचार करतांना भाषणातून हमखास वापरला होता. मुद्दा असा कि जो तो बडा नेता उठतो कि आम्ही अमुक करून दाखविले तमुक करून दाखविले.
एकदम मान्य कि जे सत्तेत असतात ते विविध विकासाची कामे करून नक्की मोकळे होतात पण जी कामे ते करतात त्याचा दर्जा तपासल्यास असे लक्षात येईल कि विकासकामांचा दर्जा शत प्रतिशत अतिशय हीन असतो, अजिबात दर्जेदार नसतो. समजा उद्या राष्ट्र्वादीतला एखादा उठून म्हणाला कि बघा आम्ही किती अवाढव्य असे महाराष्ट्र सदन दिल्लीत उभे केले आहे त्यावर आपण अगदी सहज म्हणू कि उभे केलेल्या महाराष्ट्र सदनाचा दर्जां काय किंवा अमुक एखादी चार आण्याची वस्तू तेथे वापरली असेल तर कागदोपत्री त्याची किंमत मात्र एक रुपया लावून सदन उभारणारे मोकळे झाले असतील, उरलेले ७५ पैसे ते खिशात टाकून मोकळे झाले असतील….
या लिखाणाच्या निमित्ताने मला फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर लिहितांना हे सांगायचे आहे कि ज्या शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आघाडीचा काळात सतत १५ वर्षे म्हणजे २००० ते २०१५ फक्त आणि फक्त पैसे खाण्याचे काम केले आहे असे वाटले होते अशा अधिकाऱ्यांना विशेषतः मंत्रालयात महत्वाची पदे अडवून बसलेल्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना फडणवीस सरकार हुसकावून लावेल, त्यांच्या चौकशा सुरु होतील पण आघाडी सरकारला जसा अधिकाऱ्यांमधल्या रांडा आवडायच्या तेच युतीचेही झाले आहे म्हणजे माधव काळे सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याला भलेही मंत्रालयातून हुसकावून लावल्या गेले असेल पण बघतो तर काय त्याला अलीकडे राज्याच्या एसटी परिवहन महामंडळाचे सरव्यवस्थापक हे अत्यंत खादाड पद बहाल करून राज्यकर्ते मोकळे झाले आहेत. मला कोणीतरी म्हणाले कि ज्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बऱ्यापैकी वठणीवर आणले होते त्या भ्रष्ट नसलेल्या प्रशासकीय अधिकारी सौनिक यांना हटवून त्याठिकाणी कोणत्याही क्षणी मी ज्याचे डिसमिस करण्याचे सारे पुरावे शासनाला देऊ शकतो अशा एका वादग्रस्त अधिकाऱ्याला म्हणे संबंधितांनी एक कोटी रुपये घेऊन पोस्टिंग दिले आहे. ज्या अधिकाऱ्याकडे केवळ विविध कंपनीचे शेअर्स १०० कोटी रुपयांचे असतील त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कमाईचे पद मिळविण्यासाठी एक कोटी रुपये मोजणे म्हणजे वेटरला टीप देण्यासारखे, अर्थात माझी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी भेट अद्याप झाली नाही, ते पूर्वी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचे, आजही तसेच असतील, अशी मनाशी आशा धरून नक्की मी त्यांच्याकडून या एक कोटींच्या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेणार आहे, त्या अधिकाऱ्याला एक कोटीचे पन्नास शंभर कोटी करायला फारसा वेळ लागणार नाही, बघूया नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती….
खरोखरी माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री मंडळाला आघाडीचे पाप धुवून काढायचे असेल तर त्यांनी निदान उरलेल्या या अडीच वर्षात क्रीम पोस्टवर ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्याचे महत्वाचे काम करावे आणि सुरुवात आपल्या कार्यालयापासून करावी म्हणजे पूर्वीच्या मंत्र्यांकडे ज्यांची वृत्ती नागपुरातल्या गंगा जमाना मधल्या वेश्यांसारखी होती त्या स्टाफला आधी साऱ्याच मंत्र्यांनी कार्यालयाबाहेर काढावे, अन्यथा आधीचे तर दरोडेखोर होतेच, अपवाद पृथ्वीराज पाटलांसारखे चार दोन सज्जन सोडून, पण युतीच्या मंत्र्यांमध्येही तीच दरोडेखोर वृत्ती फोफावली, मी आरोप करून मोकळा होईल. वेश्यांच्या गल्लीत सतत फेरफटके मरणाऱ्याला असे कोणीही विचारणार नाही कि अरे महादेवाचे मंदिर शोधतोय का, तद्वत युतीच्या मंत्र्यांचेही, जर त्यांच्याच कार्यालयात पूर्वीचे ठाण मांडून बसलेले असतील तर बघणारे हेच म्हणतील, तुमचेही आघाडीच्या पावलावर पाऊल…